⁠
Uncategorized

Current Affairs – 17 October 2018

सिक्कीम ठरलं जगातलं पहिलं Organic State,
संयुक्त राष्ट्रांकडून बहुमान

  • सिक्कीम राज्याने भारताची मान जगाच्या नकाशावर पुन्हा एकदा अभिमानाने उंच केली आहे. संयुक्त राष्ट्रांनी सिक्कीम राज्याला जगातलं पहिलं Organic State हा बहुमान प्रदान केला आहे. राज्यभरात केल्या जाणाऱ्या शेतीमध्ये सेंद्रीय पद्धतीचा अवलंब करुन पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक पाऊल उचलल्याने सिक्कीम राज्याला हा पुरस्कार दिला गेला आहे.
  • 25 विविध देशांमधून 51 राज्यांनी या पुरस्कारासाठी अर्ज केला होता, ज्यामध्ये सिक्कीमने बाजी मारली आहे.
  • ब्राझील, डेन्मार्क आणि इक्वेडोर यांना रौप्य पदकाचा मान मिळाला आहे. सिक्कीम राज्याने अवलंबलेल्या धोरणामुळे राज्यातील तब्बल 66 हजार शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारलं असून, राज्याच्या भेट देणाऱ्या पर्यटकांमध्येही वाढ झालेली आहे.
  • 2016 साली सिक्कीमने शेतीमधून रासायनिक खतं आणि किटकनाशकं यांचा वापर पूर्णपणे बंद केला. सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन चामलिंग यांनी हा पुरस्कार स्विकारला.

telegram ad 728

देशाच्या निर्यातीत २.१५ टक्क्यांची घसरण,
व्यापारी तूट ही ५ महिन्याच्या नीचांकावर

  • देशातील निर्यातीत सप्टेंबरमध्ये २.१५ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. तर व्यापारी तूटही मागील ५ महिन्यातील नीचांकी स्तरावर आली आहे. यामागे कच्च्या तेलाच्या वाढत्या दराची भूमिका महत्वाची असल्याचे म्हटले जाते. उद्योग मंत्रालयाकडून सोमवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण हे निर्यात घसरणीचे मुख्य कारण आहे.
  • वर्ष २०१७ च्या सप्टेंबरमध्ये डॉलरमध्ये सुमारे २६ टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली होती. जीएसटी लागू झाल्यामुळे आधीच्या किमतीमध्ये मोठी कपात करण्यात आली होती. त्यामुळे निर्यातीत मोठी तेजी दिसून आली होती.
  • आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये पेट्रोलियम उत्पादने, ऑर्गेनिक, इनऑर्गेनिक केमिकल्स, औषधे आदींच्या निर्यातीत सर्वाधिक तेजी राहिली. तर दुसरीकडे सप्टेंबरमध्ये आयातीत १०.४५ टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली. सप्टेंबरमध्ये व्यापारी नुकसान १३.९८ अब्ज रुपये झाले. जे मागील पाच महिन्यातील सर्वाधिक खालच्या स्तरावर आहे.

इराणकडे १२.५ लाख टन तेलाच्या मागणीची नोंद

  • अमेरिकेचे इराणवर आर्थिक र्निबंध लागू झाल्यानंतरही, देशाच्या खनिज तेल पुरवठय़ावर कोणताही परिणाम संभवणार नाही अशी ग्वाही देतानाच, भारतातील दोन सार्वजनिक तेल कंपन्यांनी इराणकडून नोव्हेंबरसाठी १२.५ लाख मेट्रिक टन तेलाची मागणीही नोंदविली आहे, अशी माहिती पेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान यांनी दिली.
  • इराणवरील र्निबधामुळे घटणाऱ्या तेलपुरवठय़ाच्या शक्यतेनेच खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनी प्रतिपिंप ८६.७४ डॉलरचा चार वर्षांपूर्वीच्या उच्चांकाला गवसणी घातली आहे.
  • या निर्बंधांमुळे इराणमधून खरेदी केलेल्या तेल व्यवहाराच्या भरपाईसाठी बँकिंगचा मार्ग अवरुद्ध होणार आहे, शिवाय या तेलावर प्रक्रिया करणाऱ्या भारतातील कंपन्यांना पुनर्विम्याचे संरक्षण मिळविणेही अवघड बनेल.

add header newनियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC

टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा – Mission MPSC Telegram Channel

Related Articles

One Comment

Check Also
Close
Back to top button