उत्तराखंडमधील पाणथळ रामसर यादीत
उत्तराखंडमधील विकासनगरच्या आसन पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत करण्यात आला असून आहे.
आसन हे रामसर दर्जा मिळवणारे उत्तराखंडमधील पहिले ठिकाण आहे.
००११९७१ मध्ये इराणच्या रामसर या शहरात रामसर जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करण्यात आली होती. हा सर्वात जुना आंतर सरकारी करार असून त्यात पाणथळ जागांचा विकास केला जातो.
पाणथळ जागा संवर्धन जाहीरनामा म्हणून रामसर जाहीरनाम्याची ओळख आहे. त्यामुळे जैवविविधतेला पाठबळ मिळून मानवी जीवन सुखकर होण्यास मदत होते.
रामसरने आसन या ठिकाणाचा समावेश यादीत केला असून भारतात अशी ३८ ठिकाणे आहेत.
जगात आतापर्यंत दोन हजार ठिकाणांना रामसर दर्जा मिळाला असून त्यांचे क्षेत्र २० कोटी हेक्टरचे आहे.भारताच्या १० पाणथळ जागांना जानेवारीत रामसर दर्जा मिळाला असून त्यात महाराष्ट्रातील नांदूर मधमेश्वर, पंजाबमधील बियास व नांगल, केशोपूर व मियानी, उत्तर प्रदेशातील नवाबगंज, पार्वती आग्रा, सामान, समासपूर,संदी, सरसाईनवार यांचा समावेश त्यात होता. इतर ठिकाणे राजस्थान, केरळ, ओडिशा, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, मणिपूर, गुजरात, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश येथे आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघ अन्न व कृषी संघटनेच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 75 रुपयांच्या विशेष नाण्याचे प्रकाशन
संयुक्त राष्ट्रसंघ अन्न व कृषी संघटना (FAO) याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त 16 ऑक्टोबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 75 रुपये एवढे मूल्य असलेल्या एका विशेष नाण्याचे प्रकाशन होणार आहे.
देशातल्या दुर्बल घटक आणि सर्वसामान्य जनतेला आर्थिक तसेच पोषक आहारादृष्ट्या अधिक मजबूत बनवण्यासाठी, अन्न आणि कृषी संघटनेने आजवर केलेले कार्य अतुलनीय आहे.
भारतीय सनदी अधिकारी डॉ. बिनय रंजन सेन यांनी वर्ष 1956-1967 मध्ये या संस्थेचे महासंचालक म्हणून जबाबदारी सांभाळली.
वर्ष 2016 हे डाळींसाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून आणि वर्ष 2023 हे बाजरीसाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करावे, अशा भारताच्या दोन्ही प्रस्तावांचे अन्न आणि कृषी संघटनेने स्वागत आणि कौतुक केले आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) मार्गदर्शनाखाली, कार्यरत राष्ट्रीय कृषी संशोधन संस्थेने गेल्या पाच वर्षात असे 53 वाण विकसित केले आहेत.
2014 पूर्वी असे बायोफोर्टीफाईड म्हणजेच, अधिक पोषणमूल्य असलेले केवळ एकच वाण विकसित झाले होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या कायमस्वरूपी प्रातिनिधिक संस्थांपैकी 16 ऑक्टोबर 1945 रोजी क्वेबेक (कॅनडा) येथे स्थापना झालेली ही पहिली संस्था आहे. FAOच्या सदस्य व सहसदस्य देशांची संख्या 197 आहे. भारत FAOचा स्थापनेपासूनचा सभासद आहे.
जगातल्या सर्व देशांमधल्या लोकांचे आहारपोषण व जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने तेथील कृषी, मत्स्योद्योग व वनोद्योगांचा विकास होत जाणार असे प्रयत्न करणे, हे FAOचे प्रधान उद्दिष्ट आहे.
लष्करप्रमुख नरवणे यांना मिळणार ‘जनरल ऑफ नेपाळ आर्मी’ सन्मान
भारताचे लष्कर प्रमुख मुकुंद नरवणे यांना नेपाळच्या नियोजित दौऱ्यात नेपाळ सरकार ‘ जनरल ऑफ द नेपाळ आर्मी’ ही मानद रँक देऊन त्यांचा सन्मान करणार आहे.
नेपाळ आणि भारत या दोन देशातील मजबूत सैन्य संबंधाची ओळख म्हणून हा परंपरागत सन्मान दिला जातो. भारत सरकार सुद्धा असा सन्मान नेपाळ लष्कर प्रमुखाना देत असते. मात्र सध्या नेपाळ आणि भारत याच्यात सीमा वादावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर नेपाळच्या राष्टपती विद्यादेवी भंडारी जनरल नरवणे यांना या सन्मानाने गौरविणार असल्याचे त्याला विशेष महत्व दिले जात आहे.
असा सन्मान देण्याची सुरवात १९५० साली झाली आहे. जनरल नरवणे नेपाळ दौऱ्यात तेथील सेना प्रमुख जनरल पूर्णचंद्र थापा व संरक्षण मंत्री ईश्वर पोखरेल यांच्या बरोवर महत्वाची चर्चा करणार असल्याचेही सांगितले जात आहे.
चिमणीने केले वर्ल्ड रेकॉर्ड, नॉनस्टॉप कापले १२ हजार किमी अंतर
बार टेल्ड गॉटविक जातीच्या चिमणीने न थांबता ११ दिवस सतत उड्डाण करून १२ हजार किमीचे अंतर कापून जागतिक रेकॉर्ड केले आहे. अलास्का ते न्यूझीलंड हे अंतर या चिमणीने काहीही न खाता पिता आणि क्षणाचीही विश्रांती न घेता पूर्ण केले. तिला ट्रॅक करण्यासाठी तिच्या मागच्या भागात सॅटेलाइट टॅग लावला गेला होता.
या चिमण्या अलास्का भागातच आढळतात आणि त्या स्थलांतर करून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड मध्ये जातात.
ही चिमणी १६ सप्टेंबर रोजी अलास्का भागातून उडाली आणि २७ सप्टेंबर रोजी न्यूझीलंड मधील ऑकलंड येथे पोहोचली.