---Advertisement---

Current Affairs – 17 September 2018

By Rajat Bhole

Updated On:

isro
---Advertisement---

ISRO ने दोन विदेशी उपग्रहांचे केले यशस्वी प्रक्षेपण

  • भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) रविवारी पीएसएलव्ही सी ४२ च्या सहाय्याने दोन ब्रिटीश उपग्रहांना घेऊन झेपावले. श्रीहरिकोट्टा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून रात्री १० वाजून ८ मिनिटांनी अंतराळात झेपावले. हे पूर्णत: व्यावसायिक प्रक्षेपण असल्याचे इस्त्रोचे प्रमुख के. शिवन यांनी सांगितले. या उपग्रह प्रक्षेपणासोबत एकही भारतीय उपग्रह नव्हता.
  • या उपग्रहांचे एकत्रित वजन ८८९ कि.ग्रॅम आहे. या उपग्रहामुळे पृथ्वीवर होणारे पर्यावरणीय बदल, नैसर्गिक आपत्तीबाबतही माहिती घेणे शक्य होणार आहे. वनांचे मॅपिंग, पूर आणि नैसर्गिक आपत्तींवर लक्ष ठेवणे तसेच इतरही काही कामांसाठी यांचा उपयोग होईल. हे उपग्रह पृथ्वीपासून ५८३ किमी उंचीवर सोडण्यात येणार आहेत. ‘सरे सॅटेलाईट टेक्नॉलॉजीज’ लिमिटेडने हे उपग्रह विकसित केले आहेत.

telegram ad 728

केनियाच्या किपचोगेचा मॅरेथॉनमध्ये विश्वविक्रम

  • केनियाच्या एलिऊद किपचोगेने मॅरेथॉनमध्ये दोन तास, एक मिनिट आणि ४० सेकंद असा विश्वविक्रम नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली.
  • ३३ वर्षीय माजी ऑलिम्पिक विजेत्या किपचोगेने डेनिस किमेटोने चार वर्षांपूर्वी नोंदवलेला दोन तास, दोन मिनिटे आणि ५७ सेकंद हा विश्वविक्रम मोडला. त्याने येथे झालेल्या चुरशीच्या शर्यतीत २५ किलोमीटर अंतरापासून सातत्यपूर्ण वेग ठेवला व ही कामगिरी केली.
  • किपचोगेने २०१३मध्ये हॅम्बर्ग येथील मॅरेथॉन शर्यतीद्वारे या लांब अंतराच्या धावण्याच्या स्पध्रेला गांभीर्याने प्रारंभ केला. त्याने पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत २००३मध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेतील सुवर्ण, तर २००७मध्ये रौप्यपदक मिळवले होते. याच क्रीडा प्रकारात त्याने २००४ व २००८च्या ऑलिम्पिक स्पर्धेत अनुक्रमे कांस्य व रौप्यपदक जिंकले आहे. त्याने आतापर्यंत ११ वेळा विविध आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यती जिंकल्या आहेत. त्यामध्ये त्याने रिओ येथील ऑलिम्पिक स्पर्धा तसेच हॅम्बर्ग, रॉटरडॅम व शिकागो मॅरेथॉन शर्यतींचा समावेश आहे.

add header new

नियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC

टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा – Mission MPSC Telegram Channel

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now