1) ‘शिवछत्रपती’ पुरस्कार वितरण
अजिंक्य रहाणेसह रोहित शर्माला शिवजयंती दिनी महाराष्ट्र शासनाचा ‘शिवछत्रपती’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. गत तीन वर्षांच्या या पुरस्कारासाठी आतापर्यंत 195 जणांची निवड झाली. यामध्ये औरंगाबादची गुणवंत बुद्धिबळपटू साक्षी चितलांगे ही राज्य शासनाचा हा पुरस्कार पटकावणारी राज्यातील पहिली सर्वात युवा खेळाडू ठरली. 17 वर्षीय साक्षीने वयाच्या 15 व्या वर्षी 2014-15 चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार पटकावला. रमेश तावडे, डॉ. अरुण दातार, बिभीषण पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. तसेच टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मासह अजिंक्य रहाणे, औरंगाबादच्या अंकित बावणेला हा पुरस्कार जाहीर झाला. याशिवाय ऑलिम्पियन अॅथलीट ललिता बाबर, टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे, रोव्हर दत्तू भोकनळचीही या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
नामांकित खेळाडूंना पुरस्कार
– क्रिकेट : रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, अंकित बावणे
– अॅथलेटिक्स : ललिता बाबर
– टेनिस : प्रार्थना ठोंबरे
– रोइंग : दत्तू भोकनळ
– बुद्धिबळ : विदित गुजराती
– हॉकी : युवराज वाल्मीकी, देविंदर वाल्मीकी
– कबड्डी : नितीन मदने, अभिलाषा म्हात्रे, किशोरी शिंदे
– वेटलिफ्टिंग : ओंकार ओतारी, गणेश माळी
– एव्हरेस्टवीर : आशिष माने
– जलतरण : सौरभ सांगवेकर
– बॅडमिंटन : अक्षय देवलकर
– मार्गदर्शक : प्रवीण आमरे
– खाडी व समुद्र पोहणे : रोहन मोरे
– दिव्यांग खेळाडू : सुयश जाधव
जीवनगौरवचे मानकरी : – रमेश तावडे (अॅथलेटिक्स, 2014-15), डॉ. अरुण दातार (मल्लखांब, 2015-16), बिभीषण पाटील (शरीरसौष्ठव, 2016-17)
2) मुंबई ते पुणे धावणार जगातील पहिली हायपरलूप
जगातील पहिली हायपरलूप मुंबई ते पुणेदरम्यान धावणार आहे. तसे झाल्यास दोन्ही शहरांतील १५० किमीचे अंतर फक्त १४ ते २५ मिनिटांत कापले जाईल. सध्या हे अंतर गाठण्यासाठी तीन तास लागतात. रविवारी व्हर्जिन ग्रुप आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने मुंबई-पुणे हायपरलूप ट्रान्सपाेर्टेशन सिस्टिमला जोडण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. पहिला हायपरलूप रूट सेंट्रल पुणे यास मेगा पोलिसासोबत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास जोडण्यात येईल. याची कोनशिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी बसवण्यात आली. मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेदरम्यान व्हर्जिन ग्रुपचे चेअरमन रिचर्ड ब्रेनसन यांनी म्हटले, महाराष्ट्र सरकारसोबत करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. हायपरलूप रूट इलेक्ट्रिक यंत्रणा आहे. कंपनीचा दावा आहे की, या तंत्राने १ हजार किलोमीटर ताशी वेगाने प्रवास करणे शक्य आहे. यापूर्वी अांध्र प्रदेश सरकारने विजयवाडा व अमरावती ही शहरे हायपरलूपने जाेडण्यासाठी अमेरिकन कंपनीशी करार केला अाहे.
काय अाहे हायपरलूप
– टेस्लाचे संस्थापक इलाेन मस्क यांच्या कल्पनेतून ‘हायपरलूप’ हे तंत्रज्ञान विकसित झाले अाहे. त्यांनी २०१३ मध्ये या प्रकल्पाचे बेसिक डिझाइन तयार करून जगासमाेर सादर केले हाेते.
– हायपरलूप – ट्यूब ट्रान्सपाेर्ट टेक्नाॅलाॅजी : माेठमाेठ्या पिलरवर ट्यूबसारखी माेठी यंत्रणा उभारली जाते. यातून बंदुकीच्या गाेळीसारखे भव्य कॅप्सूल चुंबकीय शक्तीच्या गतीने चालविले जाऊ शकते. विजेबराेबरच साैर व पवनऊर्जेचा वापर शक्य.
– फायदा : विजेचा खर्च खूप कमी लागताे, प्रदूषण अजिबात हाेत नाही.
– वेळ हवाई प्रवासाच्या तुलनेत २० % कमी.
– विमान भाडे किंवा स्वतंत्र टॅॅक्सीच्या बराेबरीने प्रवास खर्च येऊ शकताे.
3) ‘समृद्धी’ साठी यूएईचे 7 अब्ज डॉलर
मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गापुढील आर्थिक अडचण आता संपुष्टात आली आहे. बिन झायेद इंटरनॅशनल एलएलसी संयुक्त अरब अमिरात यांनी या प्रकल्पासाठी सुमारे ७ अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्यास मंजुरी दिली आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कंपनीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये याबाबत एक संयुक्त करारही करण्यात आला. या कराराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
@MMCurrentAffairs स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा.
4) सौभाग्य योजनेअंतर्गत 500 रुपयांत वीज जोडणी
केंद्र सरकारने प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना, सौभाग्य या महत्त्वाकांक्षी योजना २५ सप्टेंबर २०१७ रोजी सुरू केल्या. याअंतर्गत महावितरणने ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत राज्यात १०० टक्के विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. प्रत्येक घरात वीज पोहोचावी यासाठी ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना अवघ्या ५०० रुपयांत वीज जोडणी देण्यात येणार आहे. शिवाय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थींना मोफत वीज जोडणी मिळेल. सौभाग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणानुसार ११ लाख ६४ हजार १३५ नागरिकांच्या घरात वीज नसल्याचे समोर आले आहे. या सर्वांना वीज जोडणी देण्यात येणार आहे. यापैकी ७ लाख ६७ हजार ९३९ लाभार्थींना पारंपरिक पद्धतीने, तर २१ हजार ५६ लाभार्थींना अपारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येणार आहे. दारिद्र्य रेषेखालील घरे व सौभाग्य योजनेत पात्र घरांना पूर्वी मंजूर झालेल्या पंडित दीनदयाळ ग्राम ज्योती योजनेंतर्गत राज्यातील ३ लाख ९६ हजार १९६ घरांना वीज जोडणी देण्याचे काम सुरू आहे. तसेच सौभाग्य योजनेत शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरण न झालेल्या घरांना वीज जोडणी देण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थींना मोफत वीज जोडणी देण्यात येणार असून इतर लाभार्थींना फक्त ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. हे ५०० रुपये लाभार्थीने त्याच्या बिलातून १० टप्प्यात भरावयाचे आहेत.
5) गारपिटीचा 3 लाख हेक्टरला फटका
११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे १९ जिल्ह्यांतील सुमारे १०२ तालुक्यांमधील ३७२४ गावांमधील २ लाख ९० हजार ३९५ हेक्टर क्षेत्राला फटका बसला. यात गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा व रब्बी हंगामामधील फळपिकांचे नुकसान झाले, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले. या जिल्ह्याच्या ५१० गावांमधील सुमारे ४६ हजार हेक्टरचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ बुलडाण्याच्या ३३० गावांतील ४१ हजार हेक्टर तर जालना जिल्ह्यातील ३३२ हजार हेक्टरचा समावेश आहे. बाधित जिल्ह्यांमध्ये बीड, जालना, परभणी, नांदेड, जळगाव, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली यांचा समावेश आहे. नुकसानीची जिल्हा, तालुका, गावनिहाय माहिती अशी (कंसात बाधित हेक्टर): बीड- माजलगाव, गेवराई, शिरूर- ४२ गावे (१०,६३२ हे.), जालना- जाफराबाद, मंठा, जालना, परतूर, अंबड- १७५ गावे (३२ हजार हे.), परभणी- सेलू व जिंतूर- २३ गावे (८५८९ हे.), लातूर – लातूर, रेणापूर, उदगीर, अहमदपूर, चाकूर, औसा, निलंगा, शि.अनंतपाळ- ३०८ गावे (१६,३६१ हे.) उस्मानाबाद- उमरगा व उस्मानाबाद- १२२ गावे (३०,११२ हे.).
6) कॅप्टन अमोल यादव व राज्य सरकारमध्ये 35 हजार कोटी रूपयांचा करा
कॅप्टन अमोल यादव व राज्य सरकारमध्ये 35 हजार कोटी रूपयांचा करार झाला आहे. या करारामुळे कॅप्टन अमोल यादव यांचं स्वदेशी विमान झेपावण्याचा मार्ग मोकळा झाला असून आता त्यांच्या विमान कारखान्यासाठी राज्य सरकारने जागाही दिली आहे. पालघरमध्ये एमआयडीसीमार्फत विमान कारखान्यासाठी जागा देण्यात येणार आहे. अमोल यादव यांचा महाराष्ट्रात सुरू होणारा कारखाना भारतातील पहिलाच स्वदेशी विमान तयार करणारा कारखाना असेल. 20 नोव्हेंबर रोजी डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन विभागाने अमोल यादव यांच्या विमानाचं रजिस्ट्रेशन करुन घेतलं होतं. मूळचे साताऱ्याचे रहिवासी असणाऱ्या अमोल यांनी तब्बल १७ वर्षांच्या मेहनतीनंतर भारतीय बनावटीचे विमान बनवले आहे. मुंबईत राहत असलेल्या इमारतीच्या गच्चीवरच त्यांचे हे प्रयोग सुरू होते. मुंबईतील ‘मेक इन इंडिया’च्या प्रदर्शनानंतर त्यांचा हा यशस्वी प्रयोग पहिल्यांदा जगासमोर आला. त्यानंतर अनेक देशांनी, राज्यांनी, कंपन्यांनी त्यांच्यासमोर विमाने बनविण्याचे प्रस्ताव ठेवले. पण आपल्या महाराष्ट्रातच कंपनी उभारायचे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने जागा देण्याचे आश्वासन दिले होते. कॅ. यादव यांनी अमेरिकेत वैमानिक होण्यासाठी प्रशिक्षण घेतलं आहे.
MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.