⁠  ⁠

चालू घडामोडी : १८ जानेवारी २०२०

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 3 Min Read
3 Min Read

Current Affairs 18 January 2020

‘जीसॅट-३०’चे यशस्वी प्रक्षेपण

‘इस्रो’ या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने जीसॅट-३० या दूरसंचार उपग्रहाचे दक्षिण अमेरिकेच्या कैरो बेटावरून शुक्रवारी पहाटे दोन वाजून ३५ मिनिटांनी यशस्वी प्रक्षेपण केले आहे.

यापूर्वी २०१५ मध्ये इनसॅट-४ ए या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. त्याची मर्यादा आता संपुष्टात आली असल्याने जीसॅट-३० हा दूरसंचार उपग्रह इस्रोने प्रक्षेपित केला आहे. इनसॅट-४ ए ऐवजी आता जीसॅट-३० हा उपग्रह काम करणार आहे.

जीसॅट-३० या दूरसंचार उपग्रहामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती होणार आहे, व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंकिंग, टेलिपोर्ट सेवा, डिजिटल सॅटेलाइट, डीएसएनजी, डीटीएच सेवा यासाठी या उपग्रहाचा वापर होणार आहे. जलवायुमध्ये होणारे बदल आणि हवामानाचा अंदाजही वर्तविण्यासाठी या उपग्रहाची मदत होणार आहे.

दक्षिण अमेरिकेत फ्रान्सच्या ताब्यातील कावरू येथील अवकाश तळावरून हा उपग्रह पहाटे २.३५ वाजता (भारतीय वेळेनुसार) यशस्वीपणे झेपावला. युरोपच्या एरिसयन स्पेसच्या एरियन ५ या प्रक्षेपकाने ३८ मिनिटे २५ सेकंदात हा उपग्रह अपेक्षित कक्षेत स्थापित करण्यात आला.

वर्षभरात २५ मोहिमा

इस्रोने ट्विट संदेशात म्हटले आहे, की जीसॅट ३० उपग्रह एरियन ५ प्रक्षेपकाच्या मदतीने यशस्वीरित्या सूर्यसापेक्ष कक्षेत स्थापित करण्यात आला आहे. एरियन स्पेसचे मुख्य  कार्यकारी अधिकारी स्टीफनी इस्राल यांनी सांगितले,की २०२० मधील सुरूवात जीसॅट ३०  उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात सोडून करण्यात आली आहे.  वर्षभरात एकूण २५ मोहिमा अपेक्षित आहेत.

‘जीसॅट ३०’ची वैशिष्ट्ये

* वजन ३३५७ किलो

* आय- ३ के यंत्रणेत सुधारणेने दूरसंचार सेवेत बदल

* १२ सी व १२ केयू ट्रान्सपाँडर्सचा समावेश

* इन्सॅट ४ ए उपग्रहाची जागा घेणार.

* कार्यकाल १५ वर्षे

* डीटीएच, टेलिव्हिजन अपलिंक व व्हीसॅट सेवांसाठी उपयुक्त

* एटीएम, स्टॉक एक्स्चेंज, इ-गव्हर्नन्ससाठी कनेक्टिव्हिटी सुधारणार

काश्मीर हा द्विपक्षीय प्रश्न असल्याची रशियाची  भूमिका

जम्मू काश्मीर बाबत भारताच्या भूमिकेला रशियाने भारताला पाठिंबा दिला असून तो भारत व पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय प्रश्न असल्याचे म्हटले आहे.

रशियाचे उप राजदूत रोमन बाबुशकिन यांनी सांगितले, की रशिया भारताला हवाई संरक्षणासाठी  २०२५ पर्यंत ‘एस ४००’ या क्षेपणास्त्र प्रणालीचे सर्व घटक देण्याची प्रक्रिया पूर्ण करील. एस ४०० क्षेपणास्त्रे देण्याची प्रक्रिया सुरू केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे २२ व २३ मार्च रोजी रशियाचा दौरा करणार असून ते रशिया-चीन यांच्यासमवेतच्या त्रिपक्षीय बैठकीस उपस्थित राहणार आहेत. जम्मू काश्मीरभेटीसाठी जे राजदूत गेले होते त्यात रशियाच्या राजदूतांना निमंत्रण देण्यात आले नव्हते, त्यावर त्यांनी सांगितले,की काश्मीरबाबत भारताच्या भूमिकेवर ज्यांना शंका आहे ते तेथे गेले. आम्हाला भारताच्या भूमिकेवर कुठलीही  शंका नाही.

सुरक्षा मंडळात चीनने काश्मीर प्रश्न उपस्थित करण्याचा जो प्रयत्न केला त्यावर विचारले असता ते म्हणाले, की काश्मीर प्रश्न हा द्विपक्षीय असून शिमला करार व लाहोर कराराच्या चौकटीतच त्यावर चर्चा करण्यात यावी. एस ४०० क्षेपणास्त्रे ही एस ३० क्षेपणास्त्रांचे सुधारित रूप असून ती आधी रशियन संरक्षण दलात तैनात करण्यात आली. या क्षेपणास्त्रांचे उत्पादन अलमाझ अँटे यांनी केले असून २००७ पासून ती रशियाच्या सेवेत आहेत.

Share This Article