⁠  ⁠

चालू घडामोडी : १८ जून २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

Current Affairs 18 June 2020

UNSC : आठव्यांदा भारताची तात्पुरत्या सदस्यपदी निवड

unsc new
  • भारताची आठव्यांदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिदेच्या (UNSC) च्या तात्पुरत्या सदस्यपदी निवड करण्यात आली.
  • दरम्यान, या विजयानंतर भारत २०२१-२२ या वर्षासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेचा तात्पुरता सदस्य बनला आहे. १९३ सदस्यीय संयुक्त राष्ट्र महासभेनं आपल्या ७५ व्या सत्रासाठी अध्यक्ष, सुरक्षा परिषदेचे तात्पुरते सदस्य आणि आर्थिक तसंच सामाजिक परिषदेच्या सदस्यांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पाडली होती. भारतासोबतच आयर्लंड, मॅक्सिको आणि नॉर्वे या देशांनाही सुरक्षा परिषदेत स्थान मिळालं आहे.
  • भारताला १९२ पैकी १८४ मतं मिळाली. “भारताची २०२१-२२ या वर्षासाठी संयुक्त राष्ट्राच्या तात्पुरत्या सदस्यपदी निवड झाल्यामुळे मी खुश आहे.

पोलीस सुधारणा आदेशावर अध्यक्ष ट्रम्प यांची स्वाक्षरी

trump
  • पोलिसांनी गुन्ह्य़ांच्या तपासात आदर्श पद्धतींचा वापर करावा तसेच उच्च व्यावसायिक मानकांचे पालन करावे यासाठी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पोलीस सुधारणांबाबतच्या कार्यात्मक आदेशावर स्वाक्षरी केली आहे.
  • आफ्रिकन अमेरिकन जॉर्ज फ्लॉइड याचा पोलीस कोठडीतील अत्याचारात मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेत आतापर्यंतच्या सर्वात हिंसक आंदोलनाचा आगडोंब उसळला होता त्यानंतर ट्रम्प यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली असली तरी वर्ण व वंशवादावर कुठलेही वक्तव्य किंवा टिप्पणी केलेली नाही. मिनियापोलिस येथे फ्लॉइड हा २५ मे रोजी पोलिसांनी गळ्यावर गुडघा दाबून धरल्याने श्वास कोंडून मरण पावला होता.
  • व्हाइट हाऊस येथील रोझ गार्डन येथे ट्रम्प यांनी सांगितले, पोलीस खात्याने देशपातळीवर योग्य व्यावसायिक मानकांचा वापर करावा यासाठी आपण पोलीस सुधारणांच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करीत आहोत. बहुतांश पोलीस अधिकारी हे नि:स्वार्थी लोकसेवक असतात असे आपले मत आहे.

बुंडेसलिगा फुटबॉल :बायर्न म्युनिकचे विक्रमी आठवे विजेतेपद!

Untitled 28 5
  • बायर्न म्युनिकने मंगळवारी विक्रमी सलग आठवे बुंडेसलिगा फुटबॉलचे विजेतेपद पटकावले. हंगामातील दोन लढती बाकी असतानाच बायर्नने वर्डर ब्रेमेनला १-० नमवत त्यांचे विजेतेपद निश्चित केले. करोनाच्या संकटात बुंडेसलिगा प्रेक्षकांशिवाय पुन्हा सुरू झाल्यावर बायर्नने सलग सातही सामने जिंकले.
  • ब्रेमेनला नमवल्याने बायर्नला दुसऱ्या स्थानावरील बोरुसिया डॉर्टमंडवर १० गुणांची आघाडी मिळवता आली. डॉर्टमंडने हंगामातील त्यांच्या उर्वरित तीनही लढती जिंकल्या तरी त्यांना ९ गुणच मिळतात. या स्थितीत बायर्नचे विजेतेपद निश्चित झाले. बुंडेसलिगा हंगामात सर्वाधिक गोल केलेल्या रॉबर्ट लेवान्डोवस्कीने ४३व्या मिनिटाला केलेला गोल बायर्नच्या विजयात मोलाचा ठरला. त्याला जेरोमी बोटँगच्या अप्रतिम पासवर हा गोल करता आला. लेवान्डोवस्कीचा हा बुंडेसलिगा हंगामातील ३१वा गोल ठरला. या लढतीत ७९व्या मिनिटाला अल्फान्सो डेव्हिसला सामन्यातील दुसरे पिवळे कार्ड दाखवण्यात आल्याने मैदान सोडावे लागले. त्यामुळे उर्वरित ११ मिनिटे बायर्नने १० खेळाडूंसह खेळून काढली. त्यात ११ मिनिटांत गोलरक्षक मॅन्यूयल न्यॉरने एक गोल होण्यापासून वाचवला.

इकॉनॉमिक फोरमच्या यादीत भारत

वर्ल्ड इकॉनॉमिक फाेरमने २०२० च्या १०० तंत्रज्ञान कंपन्यांची यादी जारी केली आहे. यामध्ये दोन भारतीय स्टार्टअप कंपन्या स्टेलअॅप्स आणि जेस्टमनी स्थान मिळवण्यात यशस्वी झाल्या आहेत. याआधी गुगल, एअरबीएनबी, किकस्टार्टर, मोझिला, स्पॉटिफाय, टि्वटर आणि विकिमीडियासारख्या कंपन्याही या प्रतिष्ठित यादीचा भाग राहिल्या आहेत.
वर्ल्ड इकाॅनॉमी फोरम १०० संस्थांची यादी तयार करते, जी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह जागतिक मुद्दे हाताळते. डब्ल्यूईएफने सांगितले की, निवडलेल्या १०० फर्म्सपैकी एक चतुर्थांश महिला नेतृत्वाच्या आहेत. या कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्तेपासून कार्बन कॅप्चरपर्यंत हवामान बदलाच्या संरक्षणासाठी नवोन्मेषाचा उपयोग करतात, आरोग्य सेवांमध्ये सुधारणा आहे तसेच समाजाला चांगल्या भवितव्याकडे नेण्यात मदत करतात.
डब्ल्यूईएफच्या निवेदनानुसार, या कम्युनिटीत समाविष्ट झाल्याने तंत्रज्ञान कंपन्या फोरमचा पुढाकार, अॅक्टिव्हिटीज, इव्हेंट्स होतात अशा ठिकाणी २ वर्षांचा प्रवास सुरू करतील.
जेस्टमनीची स्थापना लिजी चॅपमन, प्रिया शर्मा आणि आशिष अनंथरमण यांनी केली. हे स्टार्टअप ग्राहकाला कर्ज देतात. ज्यांच्याकडे कर्जाचा चांगला पूर्व इतिहास नसल्यामुळे क्रेडिट कार्ड किंवा अन्य औपचारिक वित्तीय पर्यायापर्यंत पोहोच नाही अशा युजर्सला सक्षम बनवणे हे स्टार्टअपचे उद्दिष्ट आहे.

Share This Article