मेक्सिकोची अँड्रिया मेझा २०२० वर्षांतील विश्वसुंदरी
मेक्सिकोची अँड्रिया मेझा ही २०२० या वर्षांतील विश्वसुंदरी ठरली असून भारताची मिस इंडिया अॅडलाइन कॅस्टेलिनो या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर आली आहे.
६९ वी विश्वसुंदरी स्पर्धा रविवारी रात्री हॉलिवूडमधील रॉक हॉटेल अँड कॅसिनो येथे घेण्यात आली.
२०१९ मधील विश्वसुंदरी दक्षिण आफ्रिकेची झोझिबिनी तुंझी हिने तिच्या डोक्यावर विश्वसुंदरीचा मुकुट चढवला.
ब्राझीलची ज्युलिया गामा (वय २८) उपविजेती ठरली, तर पेरूची जॅनिक मॅसेटा (वय २७) ही तिसऱ्या क्रमांकावर राहिली.
मेक्सिकोने विश्वसुंदरीचा बहुमान तिसऱ्यांदा पटकावला आहे.
याआधी झिमेना नॅवरेट व लुपिचा जोन्स यांनी २०१० व १९९१ मध्ये हा मान पटकावला होता.
पद्मश्री डॉ. केके अग्रवाल यांचे निधन
इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि हार्ट केअर फाऊंडेशनचे प्रमुख पद्मश्री डॉ. केके अग्रवाल (वय 62) यांचे निधन झाले.
डॉ.के.के.अग्रवाल हे त्यांच्या व्यवसायामुळे प्रसिद्ध होते.
२०१० साली अग्रवाल यांना पद्मश्री पुरस्काराने देखील गौरविण्यात आले होते.
इटालियन खुली टेनिस स्पर्धा :जोकोव्हिचला नमवून नदाल अजिंक्य
इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात नदालने कट्टर प्रतिस्पर्धी सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचचा पराभव केला.
दुसऱ्या मानांकित नदालने अग्रमानांकित जोकोव्हिचला ७-५, १-६, ६-३ असे तीन सेटमध्ये नमवले.
नदालचे हे कारकीर्दीतील १०वे इटालियन जेतेपद ठरले.
जनुकीय क्रमनिर्धारण पथकाच्या प्रमुखांचा राजीनामा
जनुकीय क्रमनिर्धारणासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘इन्साकॉग’ या संस्थेच्या प्रमुखपदाचा प्रसिद्ध विषाणूतज्ज्ञ डॉ. शाहीद जमील यांनी राजीनामा दिला आहे.
देशातील विषाणूंच्या प्रकारांची जनुकीय क्रमवारी निर्धारित करण्यासाठी काही वैज्ञानिक संस्थांचा मिळून ‘इन्साकॉग’ हा गट केंद्र सरकारने स्थापन केला होता.