‘नासा’ची महिला अंतराळवीर राहणार ३२८ दिवस अंतराळात
- सलग ३२८ दिवस अंतराळात एकाच अवकाशयानात महिला अंतराळवीराने राहण्याचा विक्रम ‘नासा’ची अंतराळवीर ख्रिस्तिना कोच करणार आहे. ही सर्व मोहीम नासाने तयार केलेल्या पृथ्वीच्या निम्नकक्षेत स्थित इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (आयएसएस) येथून पूर्ण केली जाणार आहे. ही माहिती नासातर्फे देण्यात आली.
- आयएसएसवरून नासा एकूण तीन मोहिमा राबवणार आहे. त्यासाठीचे वेळापत्रक व अंतराळवीर नुकतेच ठरवण्यात आले. या मोहिमांमध्ये जेसिका मेइर या महिला अंतराळवीराचे पहिले अवकाशयान आणि नासाचे अंतराळवीर अँड्रयू मॉर्गन यांचे अंतराळातील वास्तव्य यांचाही समावेश आहे.
- ख्रिस्तिना कोच ही महिला अंतराळवीर यावर्षी १४ मार्च रोजी आयएसएसवर दाखल झाली होती. नव्या वेळापत्रकानुसार ख्रिस्तिना पृथ्वीच्या कक्षेत फेब्रुवारी २०२०पर्यंत राहणार आहे. यापूर्वी २०१६-१७मध्ये पेगी व्हिटसन या महिला अंतराळवीराने सलग २८८ दिवस अंतराळात वास्तव्य केले होते. ख्रिस्तिना हा विक्रम मोडणार आहे.
- आपल्या अंतराळ वास्तव्यात ख्रिस्तिना नासाच्या ५९, ६० व ६१ या तीन अंतराळ मोहिमांमध्ये सहभागी होईल.
- नेपाळचे दोन शास्त्रज्ञ आभास मस्की आणि हरिराम श्रेष्ठ यांनी हा उपग्रह विकसित केला आहे.
नेपाळचा पहिला उपग्रह
- नेपाळने आपला पहिला उपग्रह ‘नेपालीसॅट-१’ अमेरिकेतील व्हर्जिनिया येथून अवकाशात सोडला. १.३ किलो वजनाचा हा उपग्रह निम्नकक्षीय उपग्रह आहे.
- श्रीलंकेच्या उपग्रहाचे नाव ‘रावण-१’असे असून, नेपाळच्या उपग्रहाचे नाव ‘नेपालीसॅट-१’ असे आहे. अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने या उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे.
- श्रीलंका आणि नेपाळ यांच्याबरोबरच जपानचाही एक उपग्रह यावेळी नासाने अवकाशात सोडला. बर्डस-३ नावाचे हे प्रक्षेपण यशस्वी झाल्याचे नासाच्या वतीने सांगण्यात आले. अमेरिकेच्या व्हर्जिनिया प्रांताच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रक्षेपण तळावरून तिन्ही उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले.
- या उपग्रहांमुळे श्रीलंका आणि नेपाळ या दोन्ही देशांनी जागतिक अंतराळ युगात प्रवेश केला आहे.
- श्रीलंकेचा रावण-१ हा उपग्रह १.०५ किलो वजनाचा असून, त्याचे आयुष्य सुमारे दीड वर्षाचे आहे.
भारताने नियंत्रण रेषेवरील पाकिस्तान सोबतचा व्यापार केला बंद
- भारत सरकारने उद्यापासून म्हणजे जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील पाकिस्तान सोबतचा व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने गुरुवारी यासंबंधीचा आदेश दिला. नियंत्रण रेषेवरील व्यापार मार्गाने पाकिस्तानातून शस्त्रास्त्र, ड्रग्स आणि बनावट नोटांची स्मगलिंग होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
- बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असलेले लोक नियंत्रण रेषेवरील व्यापारामध्ये सहभागी असल्याचे समोर आल्याचे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.