युव्हेंटसचा अव्वल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याला अंतिम फेरीत छाप पाडण्याची संधीच मिळाली नाही. गोलशून्य बरोबरीत सुटलेल्या या लढतीत नापोलीने पेनल्टी-शूटआऊटमध्ये ४-२ अशी सरशी साधून सहाव्यांदा इटालियन चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
नापोलीकडून पेनल्टी-शूटआऊटमध्ये लॉरेंझो इनसाइन, मॅटेओ पॉलिटानो, निकोला मॅक्सीमोव्हिक आणि अर्कादिस्झ मिल्क यांनी गोल केले. ‘‘रोनाल्डो आपला पूर्वीचा वेग मिळवण्यासाठी धडपडत आहे. करोनामुळे इतक्या आठवडय़ांची विश्रांती मिळाल्यानंतर खेळावरील पकड सैल होणे स्वाभाविक आहे,’’ असे युव्हेंटसचे प्रशिक्षक मॉरिझियो यांनी सांगितले.
राज्यात २५०० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार
राज्यात २५०० मेगावॅटचा महत्वाकांक्षी सौर उर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी महानिर्मितीने जागेचा शोध घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिले.
हा प्रकल्प महानिर्मिती आणि एनटीपीसीच्या संयुक्त प्रयत्नातून राबवण्यात येणार आहे. नागपूर येथील विद्युत भवनात आयोजित व्हि.सी. व्दारे आयोजित बैठकीवेळी राऊत यांनी ही माहिती दिली.
महा निर्मिती आणि महाऊर्जाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना राऊत यांनी पुढे सांगितले, एनटीपीसीने हा सौरऊर्जा प्रकल्प तयार करण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे.
अमरावती जिल्ह्यातील गव्हाणकुंड येथील१६ मेगावॅटच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची माहिती त्यांनी घेतली. या प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्यात अाहे. तसेच यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील दोंडाईचा येथे २५० मेगावॅटच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा आढावाही त्यांनी घेतला.
डॉ. मदन देवकर्ण, सुनंदा गोरे, वानखडे, जगदाळे, दुगडूमवार यांना ‘मसाप’ पुरस्कार
सन २०२० या वर्षासाठीच्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कारांची घोषणा गुरुवारी झाली. मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी ही घोषणा केली. मसापच्या वतीने दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या विविध वाङ््मय प्रकारांमधील उत्कृष्ट ग्रंथांना हे पुरस्कार देण्यात येतात. यंदा नरेंद्र मोहरीर वाङ््मय पुरस्कारासाठी औरंगाबाद शहरातील डॉ. मदन देवकर्ण यांच्या “मराठवाड्यातील साहित्य आणि संशोधन’ व डॉ. बाळू दुगडूमवार यांच्या “बाबा आमटे : व्यक्तित्व, कवित्व व कर्तृत्व’ या ग्रंथांना विभागून मिळाला आहे.
या पुरस्काराचे स्वरूप ५ हजार रुपये असून हा दोन वर्षांतून एकदा देण्यात येतो, तर नरहर कुरुंदकर वाङ््मय पुरस्कारासाठी मनोज बोरगावकर यांच्या “नदीष्ट’ ची निवड झाली. या पुरस्काराचे स्वरूप ३० हजार रुपये आहे. प्राचार्य म. भि. चिटणीस वाङ््मय पुरस्कार चंद्रकांत वानखडे यांच्या “गांधी मरत नाही’ या ग्रंथाला मिळाला. कै. कुसुमताई देशमुख काव्य पुरस्कारासाठी “असो आता चाड’ या कवितासंग्रहाची निवड करण्यात आली आहे.