---Advertisement---

चालू घडामोडी – २ जुलै २०१६

By Tushar Bhambare

Published On:

chalu-ghadamodi-current-affairs-in-marathi
---Advertisement---

क्रीडा

निर्मला शेओरन रिओसाठी पात्र
# भारताच्या निर्मला शेओरनने हैदराबाद मध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पध्रेत ४०० मीटर प्रकारात ५१.४८ सेकंदांची वेळ नोंदवून रिओ ऑलिम्पिकची पात्रता मिळवली. रिओचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या निर्मलाने कामगिरीत सुधारणा करताना हिटमध्ये नोंदवलेल्या ५२.३२ सेकंदांच्या वेळेहून चांगली कामगिरी केली. तसेच तने २०१४साली एम. आर. पुवम्मा यांनी नोंदवलेल्या ५१.७३ सेकंदांचा विक्रमही मोडला. रिओ ऑलिम्पिकची पात्रता मिळवणारी निर्मला २४वी अ‍ॅथलिट आहे. रिओत जागा निश्चित करण्यासाठी ५२.२० सेकंदांची पात्रता वेळ ठरवण्यात आली होती.

वेगाचा बादशाह उसैन बोल्टची रिओ ऑलिम्पिकमधून माघार
# बीजिंग (२००८) व लंडन (२०१२ ) या दोन्ही ऑलिम्पिकमध्ये १०० मीटर, २०० मीटर व ४ बाय शंभर मीटर धावण्याच्या रिलेमध्ये सुवर्णपदक जिंकणारा उसैन बोल्ट याने रिओ ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे. बोल्टच्या मांडीला दुखापत झाल्याने त्याने जमैकाच्या राष्ट्रीय चॅम्पियन्सशीपमधून माघार घेतली असून पुढील महिन्यात होणा-या ऑलिम्पिकमधील त्याच्या सहभागाबद्दलही साशंकता व्यक्त होत आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now