---Advertisement---

चालू घडामोडी :२० फेब्रुवारी २०२०

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Current Affairs 20 February 2020

अहमदाबादचे मोटेरा मैदान जगातील सर्वात मोठ मैदान

Motera Stadium

आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर दबदबा असलेल्या भारताच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
अहमदाबादच्या मोटेरा मैदानाला आता जगातील सर्वात मोठ्या मैदानाचा सन्मान मिळणार आहे. २४ फेब्रुवारी रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मैदानाचं उद्घाटन होणार आहे.
आतापर्यंत ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट मैदान हे जगातलं सर्वात मोठं क्रिकेट मैदान मानलं जात होतं. मात्र एक लाखापेक्षा जास्त आसनक्षमता असलेलं मोटेरा मैदान या यादीत पहिल्या स्थानावर आलेलं आहे.
काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने या मैदानाचा एरिअर फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला होता. नेटकऱ्यांनी या फोटोला चांगलीच पसंती दर्शवली होती. यानंतर आता हे मैदान आतमधून कसं दिसतं हे दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे.

आशियाई कुस्ती स्पर्धा : आशू, आदित्य, हरदीपला कांस्यपदक

spt07

आशू, आदित्य कुंडू आणि हरदीप या भारताच्या कुस्तीपटूंनी आपापल्या गटात विजय मिळवत आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत बुधवारी कांस्यपदकाची कमाई केली.
भारताने ग्रीको-रोमन प्रकारात एकूण पाच पदके मिळवली. आशूने ६७ किलो वजनी गटात तर आदित्य आणि हरदीपने अनुक्रमे ७२ आणि ९७ किलो वजनी गटात कांस्यपदक मिळवले.
आशूने सिरियाच्या अब्दुलकरीम मोहम्मद अल-हसन याच्यावर ८-१ अशी सहज मात केली. आदित्यने अवघ्या दीड मिनिटे रंगलेल्या एकतर्फी लढतीत जपानच्या नाओ कुसाका याचा ८-० असा धुव्वा उडवला. त्यानंतर हरदीपने किर्गिजिस्तानच्या बेकसुलतान मखामादझानोव्हिच मखमुदोव्ह याला ३-१ असे हरवले.
भारताने या स्पर्धेत आतापर्यंत पाच पदके मिळवली असून त्यात सुनील कुमारच्या सुवर्णपदकाचा आणि अर्जुन हालाकुकरी याच्या कांस्यपदकाचा समावेश आहे.

चेतेश्वर पुजाराने इंग्लिश काउंटी टीम ग्लुस्टरशायरशी केला करार

Image result for cheteshwar pujara

भारताचा कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने इंग्लिश काउंटी चॅम्पियनशिपच्या पहिल्या सहा सामन्यांसाठी ग्लुस्टरशायरसोबत करार केला. त्याचा करार १२ एप्रिल ते २२ मेदरम्यान असेल. यापूर्वी पुजारा डर्बीशायर, यॉर्कशायर व नॉटिंगहॅमकडून खेळला आहे. १९९५ मध्ये भारताचा जवागल श्रीनाथ ग्लुस्टरशायरकडून खेळला आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now