1) सेल्फ ड्रायव्हिंग कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू
अमेरिकेत सेल्फ ड्रायव्हिंग कारच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. अॅरिझोना येथे झालेला हा अपघात सेल्फ ड्रायव्हिंग कारने झालेला पहिला जीवघेणा अपघात आहे. या दुर्घटनेनंतर उबरने समस्त उत्तर अमेरिकेत अशा प्रकारच्या कारच्या सेवा आणि टेस्टिंग बंद करत असल्याची घोषणा केली. उल्लेखनीय बाब म्हणजे, सेल्फ ड्रायव्हिंग कार ह्या सर्वात सुरक्षित कार असल्याचा दावा केला जात आहे. तसेच जगभरात विविध कंपन्या यांच्यावर चाचण्या घेत आहेत. त्यामध्ये टेस्ला, फोर्ड मोटर्स आणि वायमो अशा कंपन्यांचाही समावेश आहे.
2) प्रदूषणमुक्त नदी कार्यक्रमात महाराष्ट्रातील गोदावरी, तापी, कृष्णा, पंचगंगा, मुळा-मुठाचा समावेश
प्रदूषणमुक्त नद्यांसाठी राष्ट्रीय नदी संरक्षण कार्यक्रमात (एनआरसीपी) १४ राज्यांतील ३२ नद्यांचा समावेश करण्यात आला असून, यात महाराष्ट्रातील गोदावरी, तापी, कृष्णा, पंचगंगा आणि मुळा-मुठा नद्यांचा समावेश आहे. या प्रकल्पानुसार प्रतिदिन २६० दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया संयंत्र उभारले आहेत.
राज्यातील तीन शहरांत सांडपाणी प्रक्रिया संयंत्रांची क्षमता १२७ एमएलडी करण्यात आली आहे. कृष्णा नदीतील प्रदूषण कमी करण्यास कराड आणि सांगली येथे सांडपाणी नदीत सोडण्यापासून पायबंद घालणे आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी २८.७४ कोटी रुपये खर्च करून ५५ एमएलडीचे संयंत्र उभारण्यात आले आहेत.
3) लेन ड्रायव्हींगच्या नियमांची कठोरपणे अमलबजावणी
देशातील २५ शहरांत केंद्र सरकारने लेन ड्रायव्हींगच्या नियमांची कठोरपणे अमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने संबंधित शहरांशी चर्चेची तयारीही सुरू केली आहे. ज्या शहरांत ही योजना राबवली जाणार आहे त्यात दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, मुंबई, पुणे, नागपूर, नासिक, अहमदाबाद, सूरत आणि लुधियानाचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली, पुणे आणि नागपूरबरोबर इतर काही शहरांत योजना सुरू केली जाईल.
4) मुंबई लोकलसाठी स्वतंत्र कंपनी हवी, जागतिक बँकेची सूचना
मुंबईच्या उपनगरीय रेल्वेचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र प्रवासी रेल्वे कंपनी स्थापन करण्यात यावी, अशी सूचना जागतिक बँकेने केली आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या काही प्रकल्पांना जागतिक बँकेकडून निधी मिळाला आहे. त्यामुळे बँकेने ही सूचना केली आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेने दररोज ६ दशलक्ष प्रवासी प्रवास करतात. शहरात एकूण चार मार्गांवरून गाड्या धावतात. या सेवेचे व्यवस्थापन मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयामार्फत केले जाते. रेल्वेला मिळणाºया एकूण महसुलात उपनगरीय रेल्वेच्या महसुलाचा मोठा वाटा आहे. जागतिक बँक २00२ पासून मुंबईतील रेल्वे व्यवस्थेशी संबंधित आहे. दोन प्रकल्पांमार्फत प्रशस्त आणि अत्यंत कमी ऊर्जेवर चालणाºया दोन रेल्वे रेक्स प्रकल्पांना जागतिक बँकेने अर्थसाह्य केले आहे.
MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.