Current Affairs 21 December 2019
Flashback 2019: ‘मिशन शक्ती’, भारताने जगाला दाखवून दिली आपली ताकद

क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधनाच्या दृष्टीने यंदाचं वर्ष भारतासाठी खास ठरलं. या दोन्ही क्षेत्रात भारताने महत्वपूर्ण यश मिळवलं. चांद्रयान-२ मध्ये विक्रम लँडरचा अपवाद वगळता ही मोहिम यशस्वी ठरली.
मिशन शक्ती’मुळे भारत मोजक्या देशांच्या पंक्तीत स्थान मिळवणारा चौथा देश ठरला. यापूर्वी असे तंत्रज्ञान अमेरिका, रशिया आणि चीनने विकसित केलं आहे.
– बालकोट एअर स्ट्राइकनंतर बरोबर एक महिन्याने २७ मार्च २०१९ रोजी भारताने डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम बेटावरुन उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. भारताने ‘लो अर्थ ऑर्बिट’मध्ये भ्रमण करणारा आपला उपग्रह A-Sat क्षेपणास्त्राद्वारे पाडला. पृथ्वीपासून २ हजार किलोमीटरपर्यंतची कक्षा ‘लो अर्थ ऑर्बिट’मध्ये येते. अवकाशात पृथ्वीपासून ३०० किलोमीटरच्या कक्षेत भ्रमण करणारा आपलाच उपग्रह भारताने क्षेपणास्त्राद्वारे पाडला. डीआरडीओच्या नेृत्वाखाली ही संपूर्ण मोहिम पार पडली.
अमेरिकेने कधी केली चाचणी
१९८५ साली अमेरिकन हवाई दलाने एफ-१५ विमानातून A-Sat क्षेपणास्त्र डागून P78-1 हा संशोधन उपग्रह पाडला होता. पृथ्वीपासून हा उपग्रह ५५५ किलोमीटर अंतरावर होता. २००७ साली चीनने आपणही या तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्याचे जगाला दाखवून दिले. चीनने SC-19 A-SAT क्षेपणास्त्राने निरुपयोगी बनलेला FY-1C उपग्रह पाडला.
भारतीय बुद्धिवंतांना अमेरिकेने रोखू नये

भारतातून येणाऱ्या बुद्धिमान लोकांचा प्रवाह अमेरिकेने थोपवू नये, कारण तो आर्थिक सहकार्याचा एक मोठा भाग असून दोन्ही देशातील धोरणात्मक सहकार्यातील सेतूबंध आहे, असे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी सांगितले. भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांना दिल्या जाणाऱ्या एच १ बी व्हिसाचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी द्विपक्षीय संबंधातील तो अग्रक्रमाचा भाग असल्याचे स्पष्ट केले.
एच १ बी व्हिसा हा अस्थलांतरित स्वरूपाचा असून अमेरिकी कंपन्या परदेशी कामगारांना हा व्हिसा देत असतात, त्यात माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांचा समावेश आहे. भारतातील जास्तीत जास्त माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक व तंत्रज्ञ अमेरिकेत काम करतात, त्यांच्यासाठी एच १ बी व्हिसा महत्त्वाचा आहे. भारतातील तंत्रज्ञान कंपन्यांच्या मार्फत कर्मचारी तिकडे जात असतात.
झारखंडमध्ये पाचव्या टप्प्यात ७०.८३ टक्के मतदान
झारखंड विधानसभेच्या निवडणुकीसाठी पाचव्या आणि अंतिम टप्प्यात शुक्रवारी शांततेत मतदान पार पडले. संध्याकाळी ५ वाजता मतदानाची वेळ संपल्यानंतर ७०.८३ टक्के मतदान नोंदवले गेले, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली.
वेटलिफ्टिंग : ताेराेखती दाेषी; लंडन अाॅलिम्पिक स्पर्धेमध्ये जिंकलेले सुवर्णपदक घेतले परत
यूक्रेनच्या वेटलिफ्टर ओलेकसी तोरोखतीला डाेपिंग करणे अाता चांगलेच महागात पडले अाहे. यामुळे त्याला लंडन अाॅलिम्पिक स्पर्धेत पटकावलेले सुवर्णपदक गमावावे लागले. डाेप चाचणीमध्ये ताेराेखती हा दाेषी असल्याचे समाेर अाले अाहे. यातूनच त्याच्यावर अांतरराष्ट्रीय अाॅलिम्पिक समितीने (अायअाेसी) कडक कारवाई केली. यासाठी अायअाेसीने ताेराेखतीने जिंकलेेले सुवर्णपदक हिसकावून घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याला हे पदक परत करावे लागणार अाहेत. याशिवाय त्याच्यावर दाेन वर्षांच्या बंदीची घाेषणाही करण्यात अाली.
लंंडन येथील स्पर्धेच्या दरम्यान घेण्यात अालेल्या डाेप टेस्टमध्ये ताेराेखतीने प्रतिबंधित असलेले स्टेराॅयड नावाचे अाैषध घेतल्याचे समाेर अाले. यातूनच त्याच्यावर ही कारवाई करण्यात अाली. डाेपिंगमध्ये अडकलेला हा जगातील पाचवा वेटलिफ्टर ठरला अाहे.
बँक ऑफ महाराष्ट्रला आर-सेटी संवर्गातील उत्कृष्ट बँकेचा पुरस्कार
महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण (आर-सेटी) संस्थेच्या माध्यमातून केल्या गेलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्रला २०१८-१९ वर्षाचा ‘आर-सेटी संवर्गातील बेस्ट परफॉर्मिंग बँक’ पुरस्कार मिळाला आला.
कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामीण विकास आणि पंचायती राज विभागाचे केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते बेस्ट परफॉर्मिंग बँकेचा पुरस्कार बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक हेमंत टम्टा यांनी स्वीकारला. या वेळी बँकेचे ग्रामीण विकास विभागाचे मुख्य व्यवस्थापक ए. डी. चव्हाण उपस्थित होते.
ग्रामीण युवा आणि महिलांना छोट्या छोट्या व्यवसायातून स्वयंरोजगार निर्मितीचे कौशल्य प्राप्त होण्याकरिता अानुषंगिक प्रशिक्षण देण्यासाठी बँकेने महाराष्ट्र राज्यात सात ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था स्थापन केल्या आहेत. या प्रशिक्षण संस्था पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, जालना, अमरावती आणि नागपूर येथे असून या संस्था उमेदवारांना प्रशिक्षण देतात. या सातही क्षेत्रीय स्वरोजगार प्रशिक्षण संस्थांना (आरसेटी) वर्ष २०१८-१९ साठी ‘एए’ दर्जा दिला गेला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने आरसेटी येथून प्रशिक्षण प्राप्त उमेदवारांसाठी बँकेच्या विभागीय कार्यालयांच्या समन्वयाने नवीन क्रेडिट लिंकेज योजना लागू केली. बँकेने ७ जिल्ह्यांतील दुष्काळी गावे / गटातील शेतकरी कुटुंबातील बेरोजगार तरुण यांच्यासाठी ‘महा शेतकरी आत्मनिर्भर योजना’ सुरू केली आहे. या योजनेत गरजांवर आधारित व संभाव्य क्षमतेच्या उपक्रमांची निवड करून युवकांना प्रशिक्षण दिले जाते तसेच या योजनेंतर्गत प्रशिक्षित उमेदवारांना त्वरित कर्जदेखील मंजूर केले जाते.