मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.
1978–84 या कालावधीत ते उत्तर प्रदेश विधानपरिषदेचे सदस्य होते. तर 1996 ते 2009 दरम्यान सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले. बसप-भाजप युती सरकारमध्ये मायावतींच्या नेतृत्वात त्यांनी उत्तर प्रदेश मंत्रिमंडळात नगरविकास मंत्री म्हणूनही काम पाहिले होते.
लालजी टंडन यांनी बिहारचे राज्यपालपदही भूषवले आहे.
संयुक्तअरब अमिरातीच्या यानाची मंगळाकडे झेप
संयुक्तअरब अमिरातीचे अवकाशयान मंगळाच्या दिशेने झेपावले. ‘अल अमल’ असे या अवकाशयानाचे नाव असून ते जपानच्या प्रक्षेपण तळावरून सोडण्यात आले.
अरब जगतातील कुठल्याही देशाने आतापर्यंत अशी आंतरग्रहीय मोहीम राबवली नव्हती.
‘अल अमल’ याचा अर्थ ‘आशा’ असा आहे. हे यान १.३ टन वजनाचे असून ते जपानमधील तानेंगिशिमा येथील अवकाशतळावरून स्थानिक वेळेनुसार पहाटे १.५८ वाजता सोडण्यात आले.
यानाची दूरसंचार यंत्रणा कार्यान्वित केली असून त्याच्याकडून पहिले संदेश मिळाले आहेत. त्याच्या सौरपट्टय़ा उघडण्यात आल्या असून मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज प्रक्षेपण सेवेने यान प्रक्षेपित केले आहे.
सौरपपट्टय़ा विद्युत भारित झाल्याने अवकाशयान ४९ कोटी ५० लाख कि. मी. चे मंगळापर्यंतचे अंतर पार करणार आहे.
२०० दशलक्ष डॉलर्सचा हा प्रकल्प असून अरब जगतातील आंतरग्रहीय योजना पहिल्यांदाच यशस्वी झाली आहे. या मोहिमेसाठी अमिरातीच्या १३५ अभियंत्यांनी सहा वर्षे परिश्रम केले होते.
हे अवकाशयान फेब्रुवारी २०२१ मध्ये मंगळावर पोहोचणार असून त्यावेळी अमिरातीच्या स्थापनेचा पन्नासावा वर्धापन दिन आहे.
मेसीला सातव्या वेळेस पिचिची पुरस्कार
ला-लीगा फुटबॉलमधील अखेरच्या सामन्यात लिओनेल मेसीने दोन गोल करत बार्सिलोनाला विजय मिळवून दिला. मात्र सलग सातव्या मोसमात सर्वाधिक गोलची नोंद करत मेसीने विक्रमी जेतेपद पटकावले.
मेसीने यंदाच्या मोसमात २५ गोलची नोंद केली. रेयाल माद्रिदच्या करीम बेन्झेमापेक्षा त्याने चार गोल अधिक लगावले.
सात विविध मोसमांत सर्वाधिक गोल लगावणारा मेसी हा ला-लीगामधील एकमेव फुटबॉलपटू ठरला आहे.
मेसीने सलग चार मोसमांत सर्वाधिक गोल करत ह्य़ुगो सांचेझच्या कामगिरीशी बरोबरी साधली. ‘‘वैयक्तिक कामगिरीला माझ्यासाठी दुय्यम स्थान असते.
सलग तिसऱ्या मोसमात सर्वाधिक २१ वेळा त्याने गोलसाहाय्यकाची जबाबदारी निभावली.