Current Affairs 21 March 2018
1) 60 विद्यापीठांना UGC कडून स्वायत्तता
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील 60 विद्यापीठांना ऑटोनॉमी अर्थात स्वायत्तता प्रदान केली आहे. यातील 5 केंद्रीय विद्यापीठ, 21 राज्य विद्यापीठ, 24 अभिमत (डीम्ड) विद्यापीठ आणि 2 खासगी विद्यापीठांचा यामध्ये समावेश आहे. त्यासोबतच 8 महाविद्यालयांनाही स्वायतत्ता प्रदान करण्यात आली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी याची माहिती दिली.
कोणकोणत्या विदयापीठांना स्वायत्तता
केंद्रीय विद्यापीठ : जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ, अलीगड मुस्लिम विद्यापीठ, हैदराबाद केंद्रीय विद्यापीठ, तेलंगणाचे इंग्लिश आणि फॉरेन लँगवेज विद्यापीठ यांचा समावेश आहे.
स्टेट यूनिव्हर्सिटी : सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठ, जाधवपूर विद्यापीठ, कोलकाता, अलगप्पा विद्यापीठी (तामिळनाडू), नाल्सर यूनिव्हर्सिटी ऑफ लॉ (तेलंगना), आंध्र विद्यापीठ (विशाखापट्टनम), नॅशनल लॉ यूनिव्हर्सिटी (दिल्ली) यांच्यासह 21 विद्यापीठ.
खासगी विद्यापीठ : सोनीपत येथील ओपी जिंदल यूनिव्हर्सिटी, गुजरातमधील पंडित दीन दयाल पेट्रोलियम यूनिव्हर्सिटी यांचा समावेश आहे.
2) अॅट्रॉसिटी कायद्यात SC चे नवे दिशा-निर्देश
अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांच्या अटकेसंबंधी सुप्रीम कोर्टाने मंगळवारी नवे दिशा-निर्देश दिले आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आदर्श गोयल आणि जस्टीस यू.यू. ललित यांच्या खंडपिठाने मंगळवारी एका प्रकरणाच्या सुनावणीत म्हटले आहे, की या कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर सरकारी कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना तत्काळ अटक करता येणार नाही. आधी आरोपांची चौकशी होईल, तसेच अटकपूर्व जामीनही मिळू शकतो. पोलिस उपअधीक्षक पदापेक्षा खालच्या रँकचा अधिकारी ही चौकशी करु शकणार नाही. अधिकृत अधिकाऱ्याच्या मंजुरीनंतरच सरकारी कर्मचाऱ्याला अटक करता येईल, असे कोर्टाने म्हटले आहे.
दोन वर्षांपूर्वी झाली महत्त्वाची सुधारणा
अॅट्रॉसिटी कायद्यात 2016 मध्ये महत्त्वाची सूधारणा करण्यात आली आहे. जानेवारी 2016 मध्ये या कायद्यात नवीन तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार अशा प्रकरणातील खटला आरोपपत्रानंतर 60 दिवसांत निकाली काढणे बंधनकारक आहे.
कायद्यात एकूण पाच प्रकरणे
अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती (अत्याचारविरोधी) अधिनियम 1989 म्हणून हा कायदा ओळखला जातो. हा कायदा सर्वप्रथम दोन जुलै 1992 रोजी भारतीय राजपत्रात आला. या कायद्यात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांचे अर्थ तसेच अत्याचार म्हणजे काय हे विस्ताराने दिलेले आहे. यात एकूण पाच प्रकरणे आहेत. या कायद्यात वेळोवेळी दुरुस्त्या देखील झाल्या आहेत.
3) ३९ भारतीयांची इसिसच्या अतिरेक्यांकडून हत्या
इराकच्या माेसूलमध्ये ४ वर्षांपूर्वी अपहृत ३९ भारतीयांची इसिसच्या अतिरेक्यांकडून हत्या झालेली आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी संसदेत ही माहिती दिली. शरीरांचे अवशेष मोसूलच्या बदूश गावात एका टेकडीवरील सामूहिक कबरींत सापडले. डीएनए चाचणीद्वारे त्यांची ओळख पटली. ३८ अवशेषांचा डीएनए भारतातून पाठवलेल्या नमुन्यांशी जुळला. मृत लोक हे बांधकाम कंपनीत काम करत होते. पैकी २७ पंजाब, ६ हिमाचल, ४ हिमाचल व २ प. बंगालचे आहेत.
4) भारतात प्रथमच इन्स्टाग्राम पुरस्कार घोषित
फोटो शेअरिंग अॅप्लिकेशन इन्स्टाग्रॉमने भारतात पहिल्यांदा इन्स्टाग्राम पुरस्काराची घोषणा केली आहे. विराटला सर्वात व्यग्र सेलिब्रिटी (मोस्ट एंगेज्ड सेलिब्रिटी) म्हणून निवडण्यात आले. विराटने केलेल्या पोस्टवर नेटिझन्स सर्वाधिक लाइक आणि कमेंट करतात. अनुष्कासोबत ११ डिसेंबरला झालेल्या विवाहाचा फोटो विरोटने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्याला ४५ लाखांवर लाइक्स आणि दीड लाखापर्यंत कमेंट आल्या होत्या. अभिनेत्री दीपिका पदुकोनचे इन्स्टाग्रामचे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. दीपिकाचे २ कोटी २४ लाख फॉलोअर्स आहेत. २ कोटी २१ लाख फॉलोअर्ससह प्रियंका चोप्रा दुसऱ्या क्रमांकावर आहे. अभिनेत्री आलिया भट्ट आणि श्रद्धा कपूरचे इन्स्टाग्रामवर २ कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्या दोघींना पुरस्कार देण्यात आला. विराटचे एकूण १ कोटी ९८ लाख फॉलोअर्स आहेत. इतर देशांमध्येही इन्स्टाग्राम अशा प्रकारचे पुरस्कार देत आहे. भारतात इन्स्टाग्रामचे युजर्स वाढत असल्याने पहिल्यांदाच हा पुरस्कार घोषित करण्यात आला. जगात इन्स्टाग्रामचे जवळपास ८० कोटी युजर्स आहेत. यातील जवळपास पाच कोटी युजर्स एकट्या भारतात आहेत.
5) रोल्स रॉइस जर्मनीतील प्रकल्प भारतात हलविणार
भारतातील फोर्स मोटार्स व जर्मन रोल्स रॉइस यांनी मेक इन इंडियाअंतर्गत ३०० कोटी रुपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार मंगळवारी केला. या इंजिनांसाठी रोल्स रॉइस त्यांचा जर्मनीतील प्रकल्प भारतात हलविणार आहे. कार्स व इंजिनाचे उत्पादन करणाऱ्या रोल्स रॉइसचा ‘एमटीयू’ हा इंजिनाचा ब्रॅण्ड आहे. ‘एमटीयू १६००’ मालिकेच्या इंजिनाचा उपयोग ऊर्जा प्रकल्प व रेल्वेगाड्यांसाठी होतो. प्रत्येकी दीड टन वजनाची वर्षाला २००० इंजिने रोल्स रॉइस जर्मनीत तयार करते. फोर्स मोटार्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रसन फिरोदिया यांनी सांगितले की, मेक इन इंडिया हा या कराराचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. रोल्स रॉइसच्या या इंजिनांना जगभरातील विविध रेल्वे कंपन्यांकडून मागणी आहे.
MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.