Current Affairs : 21 September 2021
फेसबुकच्या सार्वजनिक धोरण संचालकपदी माजी सनदी अधिकारी राजीव अगरवाल
आपले सार्वजनिक धोरण संचालक म्हणून माजी सनदी अधिकारी व उबरचे माजी कार्यकारी प्रमुख राजीव अगरवाल यांची नेमणूक केली असल्याचे फेसबुक इंडियाने जाहीर केले.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हे पद सोडलेल्या अंखी दास यांची ते जागा घेतील. देशातील उजव्या विचारांच्या नेत्यांविरुद्ध द्वेषयुक्त भाषणांबाबतचे नियम लागू करण्यास विरोध केल्याच्या मुद्द्यावर त्या वादात अडकल्या होत्या.
अगरवाल हे धोरण विकास उपक्रमांची व्याख्या निश्चित करतील. व त्यांची अंमलबजावणी करतील. यात वापरकत्र्याची सुरक्षितता, डेटा संरक्षण व गोपनीयता यांचा समावेश असेल, असे फेसबुकने एका निवेदनात म्हटले आहे.
या भूमिकेत अगरवाल हे फेसबुक इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांच्या अखत्यारित काम करतील आणि भारतीय नेतृत्व चमूचा भाग असतील. यापूर्वी त्यांनी उबरसाठी भारत व दक्षिण आशियाचे सार्वजनिक धोरण प्रमुख म्हणून काम पाहिले आहे, याचाही निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे.
अगरवाल यांना भारतीय प्रशासकीय सेवेचे (आयएएस) अधिकारी म्हणून २६ वर्षांचा अनुभव असून, त्यांनी उत्तर प्रदेशात नऊ जिल्ह्यांमध्ये जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
‘एमी’ पुरस्कारांवर ‘दी क्राऊन’, ‘टेड लासो’ची मोहोर!
‘दी क्राऊन’ या नेटफ्लिक्सच्या मालिकेस सात एमी पुरस्कार मिळाले असून या मालिकेने या पुरस्कारात आपली मोहोर उमटवली आहे.
उत्कृष्ट नाट्य मालिका, उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारही या मालिकेस मिळाले असून राणी एलिझाबेथ २ च्या भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ऑलिव्हिया कोलमन हिला मिळाला आहे.
टेड लासो मालिकेतील फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेसाठी सुडेकिस यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. उत्कृष्ट विनोदी मालिकेचा पुरस्कारही या मालिकेस मिळाला आहे. याच प्रवर्गात हना वॅडिंगहॅम व ब्रेट गोल्डस्टेन यांना उत्कृष्ट सहायक अभिनयाचे पुरस्कार मिळाले. मेर ऑफ इस्टटाऊन या गुन्हेगारीविषयक मालिकेला एमीचे तीन अभिनय पुरस्कार मिळाले आहेत. त्यात केट विन्सलेटला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
२०२१ चे मानकरी
उत्कृष्ट नाट्य मालिका- दी क्राऊन
उत्कृष्ट मालिका दिग्दर्शन- दी क्राऊन
उत्कृष्ट मालिका लेखन- दी क्राऊन
मालिकेतील उत्कृष्ट अभिनेत्री ओलिव्हिया कोलमन (दी क्राऊन)
मालिकेतील उत्कृष्ट अभिनेता- जोश ओकोनर ( दी क्राऊन)
मालिकेतील उत्कृष्ट सहायक अभिनेत्री- गिलीयन अँडरसन ( दी क्राऊन)
मालिकेतील उत्कृष्ट सहायक अभिनेता- टोबियस मेन्झीस ( दी क्राऊन)
उत्कृष्ट विनोदी मालिका- टेड लासो
उत्कृ ष्ट दिग्दर्शन विनोदी मालिका- हॅकस
उत्कृष्ट विनोदी मालिका लेखन- हॅकस
उत्कष्ट अभिनेत्री विनोदी मालिका- जीन स्मार्ट (हॅकस)
उत्कृष्ट अभिनेता विनोदी मालिका- जॅसन सुडेकिस ( टेड लासो)
उत्कृष्ट सहायक अभिनेता विनोदी मालिका- ब्रेट गोल्डस्टेन (टेड लासो)
उत्कृष्ट मर्यादित मालिका – दी क्वीन्स गॅम्बिट
उत्कृष्ट दिग्दर्शन मर्यादित मालिका- आय मे डिस्ट्रॉय यू
उत्कृष्ट अभिनेत्री मर्यादित मालिका किंवा चित्रपट- केट विन्सलेट (मेर ऑफ इस्टओन)
उत्कृष्ट अभिनेता मर्यादित मालिका- इवान मॅकग्रेगॉर (हॉल्सटन)
उत्कृष्ट सहायक अभिनेत्री मर्यादित मालिका- ज्युलियनी निकोलसन (मेर ऑफ इस्टओन)
उत्कृष्ट सहायक अभिनेता मर्यादित मालिका- इव्हान पीटर्स (मेर ऑफ इस्टओन)
उत्कृष्ट स्पर्धा कार्यक्रम- रूपॉलस ड्रॅग रेस
उत्कृष्ट भाषण मालिका- लास्ट विक टुनाइट विथ जॉन ऑलिव्हर
उत्कृष्ट लेखन विविध मालिका- लास्ट विक टुनाईट विथ जॉन ऑलिव्हर.
उत्कृष्ट व्यक्तिचित्र मालिका- सॅटर्डे नाइट लाइव्ह
उत्कृष्ट विशेष कार्यक्रम- स्टीफन कोलबर्ट इलेक्षन नाइट २०२०- डेमोक्रसीज लास्ट स्टँड बिल्डिंग बॅक अमेरिका ग्रेट अगेन बेटर २०२०उत्कृष्ट वैविध्यपूर्ण मालिका (पूर्व ध्वनिचित्रमुद्रित) – हॅमिल्टन.
चरणजित सिंग चन्नी यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ!
चरणजित सिंग चन्नी यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना शपथ दिली.
चन्नी यांच्या व्यतिरिक्त पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी काँग्रेस नेते सुखजिंदर सिंग रंधावा यांना मंत्री पदाची शपथ दिली आहे.
राज्यात अकाली दल आणि भाजपाची सत्ता असताना चरणजित सिंग चन्नी विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. ते चमकौर साहिब मतदारसंघाचे आमदार असून त्यांनी मंत्री म्हणून तांत्रिक शिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षण, रोजगार निर्मिती आणि प्रशिक्षण आणि पर्यटन आणि संस्कृती व्यवहार विभागाची जबाबदारी सांभाळली होती.
डाॅ. नेमाडेंना साहित्य अकादमीची मानद फेलोशिप
ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. भालचंद्र नेमाडे यांना साहित्य अकादमीची सर्वोच्च मानद फेलोशिप जाहीर झाली आहे. डाॅ. नेमाडे यांना साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाच्या ज्ञानपीठ सन्मानाने याआधीच गौरवण्यात आले आहे.
साहित्य निर्मितीसह नेमाडे सरांनी देशात आणि विदेशांत दीर्घकाळ अध्ययन आणि अध्यापनाचे कार्य केले आहे. ‘कोसला’कार ते ‘ज्ञानपीठ’कार, असा नेमाडे सरांचा साहित्य निर्मितीचा सुदीर्घ प्रवास सर्वाधिक लक्षणीय आहे.
नेमाडे सरांसह या फेलोशिपसाठी देशातील महत्त्वाचे ज्येष्ठ कवी विनोदकुमार शुक्ल, तसेच शीर्षेन्दू मुखोपाध्याय, रस्किन बाँड, तेजवंतसिंग गिल, इंदिरा पार्थसारथी आणि स्वामी रामभद्राचार्य यांनाही फेलोशिप सन्मान जाहीर झाला आहे.