⁠
Uncategorized

चालू घडामोडी : २२ ऑक्टोबर २०१९

SBI मध्ये एक नोव्हेंबरपासून महत्त्वाचे बदल

– देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या बचत खात्यावरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी SBI च्या कोट्यवधी खातेदारांना मोठा धक्का बसणार आहे.

– तर व्याज दरातील कपात एक नोव्हेंबरपासून लागू होईल असं एसबीआयकडून सांगण्यात आलं आहे. बँक 1 लाख रुपयांच्या ठेवींवर पाव टक्क्यांनी कपात करणार आहे.

– तसेच परिणामी, नव्या नियमानुसार बचत खातेदारांना 1 लाख रुपयांच्या ठेवीवर मिळणारं व्याज साडेतीन टक्क्यांवरुन सव्वातीन टक्क्यांनी मिळेल. म्हणजेच व्याज दरात 0.25 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.

– यापूर्वी याच महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आपल्या रेपो रेटमध्ये कपात केली. त्यानंतर एसबीआयनेही आपल्या व्याज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला १८ नोव्हेंबरपासून होणार सुरुवात

– १८ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर या काळात हे अधिवेशन चालेल, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. हे अधिवेशन मोदी सरकारसाठी महत्वपूर्ण असणार आहे. कारण, या अधिवेशनात दोन महत्वाच्या अध्यादेशांचे रुपांतर कायद्यांमध्ये करण्यासाठी सरकारकडून पूर्णपणे प्रयत्न करणार आहे.

– सरकारने सप्टेंबरमध्ये प्राप्तिकर अधिनियम, १९६१ आणि वित्त अधिनियम २०१९ दुरुस्तीसाठी मांडले होते. याअंतर्गत अर्थव्यवस्थेतील सुस्ती कमी करण्यासाठी कॉर्पोरेटचे दर कमी करण्यात आले होते. तर दुसरा अध्यादेशही सप्टेंबरमध्ये काढण्यात आला होता. तो ई-सिगारेट आणि यांसारख्या उपकरणांच्या विक्री आणि साठ्यावर बंदीशी संबंधित होता.

– गेल्या दोन वर्षात हिवाळी अधिवेशन २१ नोव्हेंबरला सुरु होऊन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालले होते. मात्र, यंदाच्या अधिवेशनाचा कालावधी जवळपास एक महिन्याचाच असेल.

भारत २०२२ साली इंटरपोल महासभेचे आयोजन करणार

– सन २०२२ मध्ये ‘इंटरपोल’ या संस्थेच्या ९१ व्या महासभेचा आयोजक म्हणून भारताची निवड करण्यात आली आहे. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.

– भारताच्या केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक ऋषी कुमार शुक्ला यांनी भारताकडून याबाबत प्रस्ताव मांडला होता आणि प्रचंड बहुमताने हा प्रस्ताव मान्य करण्यात आला.

इंटरपोल बाबत

– आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना (INTERPOL) ही एक आंतरराष्ट्रीय पोलीस सहयोग संघटना आहे. जगभरात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना पकडण्याचे कार्य इंटरपोल करते. इंटरपोलचे मुख्यालय फ्रान्सच्या ल्योन या शहरात असून इतर 187 कार्यालये जगभरात आहेत.

– पोलीस क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्याचा १०० वर्षांचा अनुभव असलेल्या इंटरपोलचे 194 देश सदस्य आहेत.

– ही संघटना प्रामुख्याने सुरक्षा, दहशतवाद, संगठीत गुन्हेगारी, मानवता-विरोधी गुन्हे, पर्यावरण-विषयक गुन्हे, युद्ध-विषयक गुन्हे, शस्त्रास्त्र तस्करी, मानव तस्करी, अमली पदार्थांची तस्करी, संगणक-विषयक गुन्हे यावर काम करते.

चीनमध्ये ‘जागतिक लष्करी खेळ २०१९’ याचा आरंभ

– चीनच्या वुहान या शहरात १८ ऑक्टोबर २०१९ रोजी सातव्या ‘आंतरराष्ट्रीय लष्करी क्रिडा परिषद (CISM) लष्करी जागतिक खेळ’ या कार्यक्रमाला सुरवात झाली आहे.

– यावर्षी या कार्यक्रमात सुमारे २३ क्रीडा प्रकारात भाग घेण्यासाठी १०० देशांमधून जवळपास १० हजार लष्करी कर्मचारी एकत्र आले आहेत.

CISM बाबत

– १८ फेब्रुवारी १९४८ रोजी बेल्जियम, डेन्मार्क, फ्रान्स, लक्झेंबर्ग आणि नेदरलँड्स पाच संस्थापक राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय लष्करी क्रिडा परिषद (CISM) याची स्थापना केली. आज या संघटनेचे १३३ सदस्य राष्ट्र आहेत. त्याचे मुख्यालय ब्रुसेल्स (बेल्जियम) येथे आहे.

– सप्टेंबर १९९५ मध्ये रोममध्ये पहिल्या लष्करी जागतिक खेळांचे आयोजित करण्यात आले होते. तेव्हापासून दर चार वर्षांनी ही स्पर्धा खेळवली जात आहे. हा सर्वात मोठा क्रिडा कार्यक्रम देखील आहे.

के. पारसरन यांना ‘बहुचर्चित ज्येष्ठ नागरिक’ पुरस्कार मिळाला

– उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी आज माजी दिल्लीतील एका कार्यक्रमात माजी Attorney जनरल के. के. परशरन यांना सर्वात प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक पुरस्कार प्रदान केला.

– ज्येष्ठांच्या हितासाठी काम करणार्‍या एज एज केअर इंडिया या दिग्गज दिनानिमित्त के परसरन यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

– के पराशरण यांना अपवादात्मक व्यक्तिमत्त्व तसेच कायदा व न्यायाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या अपूर्व योगदानाबद्दल गौरविण्यात आले.

चालू घडामोडींच्या नियमित अपडेटसाठी तुम्ही Mission MPSC ला फेसबुक, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता.

Related Articles

Check Also
Close
Back to top button