Current Affairs : 22 September 2020
‘ऑस्कर वर्ल्ड रेकॉर्ड’च्या न्यायाधीशपदी इंद्रजीत मोरे
जागतिक दर्जाच्या नामांकित मानल्या जाणार्या ऑस्कर वर्ल्ड रेकॉर्ड व विश्वविक्रम होणाऱ्या भारत सरकार व यु.एस ए मान्यताप्राप्त रेकॉर्डच्या सोलापूर जिल्हा मुख्य न्यायाधीश पदाचे कार्य इंद्रजीत मोरे यांच्या हाती आले आहे.
सांगोला तालुक्यातील इंद्रजीत मोरे सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्राशी निगडित आहेत.
त्याचबरोबर त्यांनी हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड , मार्वलस बुक ऑफ रेकॉर्ड , इंडिया रेकॉर्ड या जागतिक दर्जाच्या प्रमाणपत्रावर आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.
त्यांच्या कार्याचा आढावा घेऊनच ऑस्कर वर्ल्ड रेकॉर्डचे डायरेक्टर विश्वविक्रमवीर श्री नितीन गवळी सरांनी या कार्याचा आढावा घेऊन. ऑस्कर वर्ल्ड रेकॉर्ड’चे सोलापूर जिल्हा न्यायाधीश सोपविले आहे.
अमेरिकेचा गाेल्फपटू ब्रायसन यूएस ओपनचा किताब पटकावला
अमेरिकन गाेल्फपटू ब्रायसन डिचेंब्यूने यूएस अाेपनचा किताब पटकावला. त्याने सहा शाॅटच्या बळावर या स्पर्धेत चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. त्याच्या करिअरमधील हा पहिलाच मेजर किताब ठरला.
जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या ब्रायसनने या स्पर्धेत सरस खेळी करताना मॅथ्यू वाेल्फला पिछाडीवर टाकले. यासह ताे या स्पर्धेत किताबावर नाव काेरू शकला.
संसदेत साथरोग विधेयकला मंजुरी
संसदेमध्ये साथरोग (सुधारणा) विधेयक, २०२० मंजूर झालं आहे. यानुसार साथीच्या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना संरक्षण देणारे नियम अधिक सक्षम आणि कठोर करण्यात आले आहेत.
सरकारकडून मागील बऱ्याच काळापासून ‘राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य अधिनियम’ बनवण्याचं काम सुरु होतं, असं डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं.
यासंदर्भात राज्यांची मत जाणून घेण्याचा सल्ला कायदे विभागाने दिला होता.
“पहिल्या दोन वर्षांमध्ये आम्हाला केवळ चार राज्यांनी सल्ला दिला. यामध्ये मध्य प्रदेश, त्रिपुरा, गोवा आणि हिमाचल प्रदेशचा समावेश होता. आता आमच्याकडे एकूण १४ राज्यांनी दिलेले सल्ले आहेत,” असं सांगितलं.
भारताने मालदीवला केली 25 कोटी डॉलर्सची आर्थिक मदत
भारताच्या शेजारील देश मालदीवला सरकारने 25 कोटी डॉलर्सची आर्थिक मदत केली आहे.
चीन मालदीवमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढवत आहे. येथील परदेशी कर्जातील जवळपास 70 टक्के चीनचे कर्ज आहे.
मालदीव हिंद महासागरातील महत्त्वाच्या ठिकाणी आहे, त्यामुळे मालदीवमधील चीनचे वर्चस्व कमी करणे भारतासाठी आवश्यक आहे.
भारताकडून आर्थिक मदतीची घोषणा मागील आठवड्यात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि मालदीवचे परराष्ट्रमंत्री शाहिद यांच्यामध्ये झालेल्या व्हर्च्युअल बैठकीमध्ये करण्यात आली होती. हे कर्ज परत करण्यासाठी मालदीवकडे 10 वर्षांचा कालावधी आहे.
सौरऊर्जेवर देशातील पहिले खवा क्लस्टर कार्यान्वित
उस्मानाबाद जिल्ह्यात भूमचा खवा आता सौरऊर्जेवर तयार होईल.
जिल्हा योजनेतून त्यासाठी निधी देण्यात आला असून या खवा क्लस्टरने सौरऊर्जेवर चालणारा क्लस्टर होण्याचा देशात पहिला मान पटकावला आहे.
यातून जवळपास १७००० शेतकरी, महिला, तरुणांना कायमस्वरूपी रोजगाराची संधी निर्माण झाली आहे.
येथील लाकडावर चालणाऱ्या २५० भट्ट्या आता इतिहासजमा होतील. तसेच दरवर्षी ३ लाख वृक्षांची तोड थांबेल. हे वृक्ष वाचल्याने ६ कोटी किलोग्रॅम कार्बनची निर्मिती थांबवता येणार आहे.
तसेच त्या वृक्षांपासून ४ कोटी किलो ऑक्सिजनची निर्मिती होणार असल्याने तो ७७,००० लोकांना कायमस्वरूपी नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणार आहे.