Current Affairs 23 June 2020
नेपच्यूनच्या चंद्रासाठी नासाचे मिशन २०२५
- सौर मंडळातील सर्वात लांब अंतरावर असलेला वरुण (नेपच्यून) रहस्यमयी चंद्र ट्रायटनच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी २०१५ मध्ये नासा एक मिशन सुरू करणार आहे. तेथील पृष्ठभागावर समुद्र अाहे का, याचा तपास केला जाईल.
पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतोय स्टॅच्यु ऑफ लिबर्टीच्या ३ पट मोठा उल्कापिंड
- 24 जून रोजी पृथ्वी शेजारून एक फार मोठा लघुग्रह जाईल. हा लघुग्रह दिल्लीतील कुतुब मीनारपेक्षा चार पट मोठा आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा तीन पट मोठा आहे. या जूनमध्ये पृथ्वी जवळून जाणारा हा तिसरा लघुग्रह आहे. यापूर्वी 6 आणि 8 जून रोजी देखील लघुग्रह पृथ्वीच्या जवळून गेले होते.
- या उल्कापिंडाचे नाव जाणून घ्या
- नासाच्या मते, या उल्कापिंडाचे नाव 2010 एनवाय 65 असे आहे. हे उल्कापिंड पृथ्वीच्या दिशेने सुमारे 46,400 किलोमीटर वेगाने येत आहे. असे म्हटले जात आहे की 24 जून रोजी दुपारी 12 च्या सुमारास ही उल्का पृथ्वीच्या जवळून जाईल. ही उल्का पृथ्वीपासून सुमारे 37 दशलक्ष किलोमीटर अंतरावरून जाईल. नासाच्या मते, पृथ्वीपासून 75 लाख किलोमीटर अंतरावरून जाणार्या या सर्व उल्कापिंडांना आपल्यासाठी धोका मानतात.
नेपाळमधील नागरिकत्व कायदा भारतविरोधी
- नेपाळच्या नागरिकत्व कायद्यात भारताला प्रतिकूल असे बदल करण्यात येत असून नेपाळी नागरिकाशी विवाह करणाऱ्या परदेशी महिलेला सात वर्षांनंतर नैसर्गिक नागरिकत्व मिळणार आहे.
- नेपाळच्या विरोधी पक्षांनी या प्रस्तावाला विरोध केला असून त्यामुळे मधेशी लोकांची अडचण होणार असल्याचे म्हटले आहे. मधेशी लोक सीमावर्ती भागात राहतात त्यामुळे त्यांचे भारताशी रोटीबेटी व्यवहार आहेत.
- नागरिकत्व कायद्यातील प्रस्तावित सुधारणेनुसार एखाद्या परदेशी महिलेने नेपाळी व्यक्तीशी विवाह केला तर तिला सात अधिकार वापरता येतील. या महिलेला सात वर्षांनी नागरिकत्व मिळेल.
- रविवारी संसदीय समितीने या सुधारणा विधेयकास मंजुरी दिली
- या सुधारणानुसार या परदेशी महिलांना सात वर्षे नागरिकत्वाचे प्रमाणपत्र मिळणार नाही, पण त्यांना नेपाळमध्ये राहता येईल. त्यांचे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अधिकार अबाधित राहतील, त्यांना देशात उद्योग चालवता येईल. जन्म, मृत्यू, विवाह, घटस्फोट, स्थलांतर याची नोंदणी करता येईल. या महिलांना ओळखपत्रे देण्यात येतील.
- महिला संघटनांनी यावर टीका केली असून त्यांनी म्हटले आहे की, जे परदेशी पुरुषनेपाळी महिलेशी विवाह करतील त्याबाबत यात काहीही म्हटलेले नाही. सध्या एखाद्या परदेशी पुरुषाने नेपाळी महिलेशी विवाह केला तर त्याला नागरिकत्वासाठी १४ वर्षे वाट पाहावी लागते.
रिलायन्सचा आणखी एक विक्रम; १५० अब्ज डॉलर्स बाजार मूल्य असणारी पहिली भारतीय कंपनी
- मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (RIL) एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. १५० अब्ज डॉलर्स बाजार मूल्य (मार्केट कॅप) असणारी रिलायन्स इंडस्ट्रीज ही पहिली भारतीय कंपनी ठरली आहे.
- रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये सतत वाढ होत असल्याने मार्केट कॅपमध्येही वाढ होत आहे. सोमवारी सकाळी बीएसईमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार मूल्य 28,248.97 कोटी रुपयांनी वाढून 11,43,667 कोटी (150 अब्ज डॉलर्स) रुपये झाले. सोमवारी बाजार सुरू झाल्यानंतर बीएसईमध्ये रिलायन्सच्या शेअर्सनी 2.53 टक्क्यांची उसळी घेत 1804.10 रुपयांचा विक्रमी स्तर गाठला. तर, एनएसईमध्येही कंपनीच्या शेअर्सनी 2.54 टक्क्यांनी उसळी घेत 1804.20 रुपयांचा स्तर गाठला.
- यापूर्वी शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजने पुढील वर्षापर्यंत स्वत:ला पूर्णपणे कर्जमुक्त करण्याचे उद्दिष्ट आपल्या नियोजित वेळेपूर्वीच साध्य केल्याचे जाहीर केले.
- गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स जिओमध्ये अनेक परदेशी कंपन्यांनी गुंतवणूक केली. काही दिवसांपूर्वी सौदी अरेबियाच्या एका कंपनीनं रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक केली होती. ही रिलायन्स जिओमधील दहावी गुंतवणूक होती. रिलायन्स जिओच्या आतापर्यंत 24.70 टक्के हिस्स्याची विक्री करण्यात आली आहे. याद्वारे कंपनीनं 1.6 लाख कोटी रूपयांची रक्कम जमवली आहे.
रेयाल माद्रिद अव्वल स्थानी
- सर्जिओ रामोस आणि करीम बेंझेमा यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलमुळे रेयाल माद्रिदने ला-लिगा फुटबॉलमध्ये रेयाल सोसिएदादला २-१ असे नमवले. या विजयासह करोनाच्या काळात फुटबॉल सुरू झाल्यावर रेयाल माद्रिदने प्रथमच ला-लिगामध्ये बार्सिलोनाला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले आहे.
- रॅमोसने ५०व्या मिनिटाला पेनल्टीच्या संधीवर गोल केला. त्यापाठोपाठ बेन्झेमाने प्रभावी कामगिरी कायम ठेवत ७०व्या मिनिटाला गोल केला. या विजयामुळे रेयाल माद्रिदचे बार्सिलोनाप्रमाणेच समान ६५ गुण झाले आहेत. मात्र गोलांच्या सरासरीच्या फरकावर रेयाल माद्रिदने अग्रस्थान पटकावले.