⁠  ⁠

चालू घडामोडी : २३ मे २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

Current Affairs 23 May 2020

हर्षवर्धन आज ‘डब्ल्यूएचओ’च्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार

vdh02

भारताच्या करोनाविरोधातील लढाईत आघाडीवर असलेले केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी डब्ल्यूएचओच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. जपानचे डॉ. हिरोकी नाकातानी हे सध्या डब्ल्यूएचओच्या ३४ सदस्यीय कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष होते.

कार्यकारी मंडळावर भारताचा प्रतिनिधी नियुक्त करण्याच्या प्रस्तावावर १९४ देशांच्या जागतिक आरोग्य असेंब्लीने स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पदभार स्वीकारणार ही केवळ औपचारिकता आहे. डब्ल्यूएचओच्या दक्षिण-पूर्व गटाने कार्यकारी मंडळावर मे महिन्यापासून सुरू होणाऱ्या पुढील तीन वर्षांसाठी भारताची निवड करण्याचा निर्णय गेल्या वर्षी एकमताने घेतला.

डब्ल्यूएचओच्या २२ मे रोजी होणाऱ्या बैठकीत हर्षवर्धन यांची कार्यकारी मंडळावर निवड झाली. अध्यक्षपद प्रादेशिक गटांमध्ये एका वर्षांसाठी आळीपाळीने देण्यात येते आणि भारताचा प्रतिनिधी पहिल्या वर्षांसाठी मंडळाचा अध्यक्ष असेल असे गेल्या वर्षी ठरविण्यात आले होते. हे पद पूर्णवेळ नसून केवळ कार्यकारी मंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविणे गरजेचे आहे.

टाळेबंदी काळात कार्बन उत्सर्जनात भारतात २६, तर जगात १७ टक्के घट

करोना विषाणूमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण जगात १७ टक्क्य़ांनी कमी झाले असून भारतात ते २६ टक्क्य़ांनी घटले आहे. एप्रिल २०१९ व एप्रिल २०२० मधील कार्बनच्या प्रमाणाची तुलना करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

ब्रिटनमधील नॅशनल क्लायमेट चेंज या नियतकालिकाने म्हटले आहे, की कार्बन उत्सर्जनात टाळेबंदीमुळे जानेवारी ते एप्रिल या काळात जगभरात २०१९ च्या पातळीपेक्षा मोठी घट झाली आहे. ती या वर्षअखेरीपर्यंत ४.४ टक्के ते ८ टक्के राहील. दुसऱ्या महायुद्धानंतर कार्बन उत्सर्जनात प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे. टाळेबंदीचा हा परिणाम असून २०२० मध्ये कार्बन उत्सर्जनात सर्वाधिक निव्वळ वार्षिक घट नोंदली जाण्याची शक्यता आहे.

भारताशिवाय ब्रिटन- ३०.७ टक्के तर अमेरिका ३१.६ टक्के याप्रमाणे घट नोंदवली गेली आहे. चीनमध्ये २३.९ टक्के घट नोंदवली गेली आहे. ७ एप्रिलला टाळेबंदीचा सर्वोच्च काळ असताना दिवसाला कार्बन उत्सर्जन सतरा टक्के कमी झाले, याचा अर्थ जगात १७ दशलक्ष टन कार्बन कमी सोडला गेला. ही कार्बन उत्सर्जन पातळी २००६ मधील पातळीशी जुळणारी आहे. रस्ते वाहतुकीतून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनात ४३ टक्के, ऊर्जानिर्मितीमधील कार्बन उत्सर्जनात १९ टक्के, उद्योग व हवाई वाहतुकीतील कार्बन उत्सर्जनात अनुक्रमे २५ व १० टक्के घट नोंदली गेली आहे. २०२० अखेरीस कार्बन उत्सर्जनातील घट ४ ते ७ टक्के राहील असा अंदाज आहे. या अभ्यासात असे म्हटले आहे, की हे कार्बन उत्सर्जन कमी झाले असले तरी त्याचा हवामान बदलांवर फारसा परिणाम होणार नाही कारण ही घट फार किरकोळ आहे. आधीच मोठय़ा प्रमाणावर कार्बन वातावरणात साठलेला आहे. संशोधनाचे प्रमुख लेखक कॉरिनल क्वीयर यांनी म्हटले आहे. टाळेबंदीमुळे ऊर्जेचा वापर कमी झाला, त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी झाले आहे. त्यातून कुठलाही रचनात्मक बदल सूचित होत नाही.

नवी मुंबईला मिळाला ५ स्टार शहराचा दर्जा; स्वच्छ भारत मिशनमध्ये मानाचं स्थान

navi mumbai 1

केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी कचरामुक्त शहरांच्या स्टार रेटिंगचे निकाल जाहीर केले.
यामध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई या एकमेव शहरानं कचरामुक्त शहरांच्या यादीत ५ स्टार रेटिंग पटकावलं आहे.

नवी मुंबई व्यतिरिक्त छत्तीसगढमधील अंबिकापूर, गुजरातमधील राजकोट आणि सूरत, कर्नाटकमधील म्हैसूर आणि मध्य प्रदेशातील इंदूर या शहरांनीही ५ स्टार रेटिंगचा मान पटकावला आहे.
स्वच्छ भारत अभियानाद्वारे शहरांमध्ये स्टार-रेटिंग अंतर्गत विकसित केलेल्या स्वच्छता निर्देशकांच्या प्रकारांवर शहरांचे रेटिंग आधारित आहे. यामध्ये कचरा संग्रहण, कचर्‍याचे स्त्रोत वेगळा करणे, कचर्‍यावर वैज्ञानिक प्रक्रिया करणे, भूगर्भशास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करणे, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन, बांधकाम उपक्रमांचे व्यवस्थापन, डंप रेमेडिएशन आणि नागरिकांच्या तक्रारींच्या निवारण प्रणाली यांचा समावेश करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी केवळ ३ शहरांना ५ स्टार रेटिंग देण्यात आले होते. परंतु या वर्षी ६ शहरांना ५ स्टार रेटिंग देण्यात आले आहेत.

ही आहेत ३ स्टार रेटिंग शहरं
करनाल
नवी दिल्ली
तिरुपती
विजयवाडा
चंदीगड
भिलाई नगर
अहमदाबाद

Share This Article