⁠
Uncategorized

Current Affairs – 23 September 2018

इराणमधून तेल आयात आता रुपयांमध्ये – रुपया मूल्यवर्धनाच्या दिशेने पाऊल

  • अमेरिकेने र्निबध लादलेल्या इराणमधून आयात होणाऱ्या खनिज तेलाची किंमत रुपयामध्ये चुकती करण्याचा व्यवहार भारताने निश्चित केला आहे. यापूर्वी या व्यवहाराकरिता युरो चलनाचा वापर होत होता.
  • भारताच्या यूको बँक व आयडीबीआय बँक या सरकारी बँकांच्या माध्यमातून हा चलन व्यवहार तेल आयातीकरिता होणार आहे. भारतातील सार्वजनिक तेल व वायू विक्री व विपणन कंपन्यांमार्फत इराणमधून आयात होणाऱ्या तेलाचे देयक ६० दिवसांत चुकते करावे लागते.
  • इराणसाठी तेल खरेदीदार म्हणून चीननंतर भारत हा दुसरा मोठा देश आहे. चालू वित्त वर्षांत भारत इराणमधून २.५० कोटी टन तेल आयात करेल. अमेरिकेने इराणवर लादलेले र्निबध ४ नोव्हेंबरपासून अंमलात येणार आहेत. भारताने इराणकडून तेल आयात बंद करावी असा अमेरिकेचा आग्रह आहे.
  • मात्र सरकारच्या निर्णयानुसार, आयात खनिज तेलाकरिता नोव्हेंबरपासून भारतीय चलन अर्थात रुपयात व्यवहार केले जातील. यामुळे अप्रत्यक्षपणे अमेरिका तसेच युरोपीय बँकांनाही आव्हान दिले जाणार आहे. देशाच्या विदेशी चलन गंगाजळीवर अतिरिक्त भार पडणार नाही. रुपयाच्या विनिमय मूल्याच्या मजबुतीकरिता ही बाब उपकारक ठरणार आहे.
  • भारतीय तेल कंपन्या सध्या स्टेट बँक जसेच जर्मनीस्थित बँकांच्या माध्यमातून इराणबरोबर आयात तेलासाठीचे व्यवहार करतात. मात्र नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या व्यवहारात स्टेट बँक सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आखातातील काही देश, तेलाच्या बदल्यात भारताकडून काही वस्तूंची आयात रुपयातील चलन विनिमयाने करीत आहेत.

telegram ad 728

हॉकी विश्वचषकासाठी ए. आर. रेहमान – गुलजार जोडी पुन्हा एकत्र

  • ज्येष्ठ गीतकार गुलझार आणि संगीतकार ए. आर. रेहमान ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. नोव्हेंबर महिन्यात भुवनेश्वर येथे होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठीचं Official Title Song गुलजार-रेहमान जोडी करणार आहे. २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर दरम्यान भुवनेश्वर येथील कलिंगा मैदानात ही स्पर्धा रंगणार आहे.
  • ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन याची माहिती दिली आहे. अब बस हॉकी, असे या गाण्याचे बोल असणार आहेत. या गाण्यामध्ये रेहमान स्वतः काम करणार असून २७ नोव्हेंबर रोजी रंगणाऱ्या उद्घाटन सोहळ्यातही रेहमान स्वतः हे गाण सादर करणार आहे. आतापर्यंत रेहमान-गुलजार जोडीने अनेक सुपरहिट गाणी रचलेली आहेत. त्यामुळे हॉकी विश्वचषकाच्या गाण्याला प्रेक्षक किती प्रतिसाद देतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

मुंबईच्या सुधारित विकास आराखड्यातील फेरबदलांना मंजुरी; सुनियोजित विकासाला चालना मिळणार

  • मुंबईच्या नागरी पुनर्निर्माणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या सुधारित विकास आराखड्याला राज्य शासनाने यापूर्वीच मंजूरी दिली आहे. मात्र, आता यामधील विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील फेरबदलांचीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन त्यालाही अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील सुनियोजित विकासाला चालना मिळणार आहे.
  • मुंबई महानगराचे नवनिर्माण योग्य प्रकारे व्हावे यासाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा सुधारित विकास आराखडा-२०३४ हा सर्व संबंधित घटकांच्या आकांक्षा लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. महानगर पालिकेच्या माध्यमातून राज्य शासन यावर काम करीत आहे. हा आराखडा सात महिन्यांत मंजूर करण्यात आला आहे. या आराखड्याच्या माध्यमातून विकासाला मोठा वाव मिळणार आहे.

add header new

नियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC

टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा – Mission MPSC Telegram Channel

Related Articles

Back to top button