---Advertisement---

चालू घडामोडी : २४ मार्च २०२१

By Chetan Patil

Updated On:

current affairs 24 march 2021
---Advertisement---

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा : गनेमत-अंगडला सुवर्णGanemat Angad

‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील भारतीय नेमबाजांचे वर्चस्व कायम राखताना गनेमत सेखाँ आणि अंगड विर सिंग बाजवा जोडीने स्कीट मिश्र सांघिक गटात सुवर्णपदक कमावले आहे.
डॉ. कर्णी सिंग नेमबाजी केंद्रावर २० वर्षीय गनेमत आणि २५ वर्षीय अंगड जोडीने पात्रता स्पर्धेत सर्वाधिक १४१ गुणांची कमाई केली.
जेतेपदावर नाव कोरताना कझाकस्तानच्या ओल्गा पॅनारिना आणि अ‍ॅलेक्झांडर येचशेन्को जोडीविरुद्ध ३३-२९ अशी सरशी साधली.
गनेमत ही विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत स्कीट प्रकारामध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली.
स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी तिने हा पराक्रम दाखवला असून, हे तिचे स्पर्धेतील तिसरे पदक आहे.
सुवर्णपदकाच्या लढतीत जागतिक क्रमवारीत ६२व्या क्रमांकावर असलेल्या अंगडने दिमाखदार कामगिरीचे प्रदर्शन केले

ऑल इंग्लंड बॅडमिटन : मलेशियाच्या जीयाला विजेतेपदvse 1

मलेशियाच्या ली जी जियाने अंतिम सामन्यात डेन्मार्कच्या गतविजेत्या व्हिक्‍टर ऍपक्‍सलसेनचा पराभव करत ऑल इंग्लंड बॅडमिंटन ओपन स्पर्धेच्या पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले.
एक तास 14 मिनिटे चाललेल्या या सामन्यात ली जीने ऍलक्‍सलसेनला 30-29, 20-22, 21-19 असा पराभव केला.
या सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये ली जी जियाने ऑक्‍सलसेनला मात दिली.
त्यानंतर पुढच्या सेटमध्ये अेॅक्‍सलसेनने दमदार पुनरागमन केले. निर्णायक सेटमध्ये ली जी जियाने आघाडी मिळवत सामना आणि किताब नावावर केला.

---Advertisement---

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now