⁠  ⁠

चालू घडामोडी : २४ मे २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

Current Affairs 24 May 2020

जागतिक बँकेतील पदावर आभास झा

world bank

जागतिक बँकेत भारतीय अर्थशास्त्रज्ञ आभास झा यांची दक्षिण आशियातील हवामान बदल व आपत्ती व्यवस्थापन जोखीम व्यवस्थापन विभागात प्रक्रिया व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.जागतिक पातळीवर हवामान बदल व आपत्ती व्यवस्थापनाच्या ज्या प्रगत पद्धती आहेत, त्या दक्षिण आशियात वापरण्यासाठी त्यांचे मोठे योगदान असणार आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा व बांगलादेश यांना अम्फान वादळाचा तडाखा बसलेला असतानाच त्यांची या विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. हवामान बदल व इतर काही समस्यांवर उच्च प्रतीची विकासात्मक प्रक्रिया स्वरूपाची उत्तरे सुचवण्याची जबाबदारी त्यांच्या विभागावर आहे. सिंगापूर येथे झा यांची नियुक्ती झाली असून दक्षिण आशियातील नैसर्गिक आपत्तींवर प्रक्रियात्मक व्यवस्थापकीय उपाय सुचवण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे.

हेर्थाचा युनियन बर्लिनवर दणदणीत विजय

football 1

यजमान हेर्था संघाने ७४ हजार प्रेक्षक क्षमतेच्या रिकाम्या स्टेडियममध्ये आपल्या कामगिरीचा सर्वोत्तम नजराणा पेश करत युनियन बर्लिनवर ४-० असा दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे हेर्थाने बुंडेसलीगा फुटबॉलच्या गुणतालिकेत १०व्या स्थानी झेप घेतली आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदरात कपात

RBI 1

टाळेबंदीचा फटका सहन करणाऱ्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारच्या साहाय्याची मालिका थांबत नाही तोच रिझव्‍‌र्ह बँकेने दोन महिन्यातील दुसरी व्याजदर कपात करून अस्थिर उत्पन्नाचा सामना करणाऱ्या कर्जदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी सकाळीच रेपो दरात थेट ०.४० टक्के कपात केल्याची घोषणा केली. यामुळे मध्यवर्ती बँकेकडून अन्य वाणिज्यिक बँकांना आकारला जाणारा व्याजदर ४ टक्के असा गेल्या वर्ष २००० नंतरच्या किमान स्तरावर येऊन ठेपला आहे.
यामुळे कर्जदारांच्या विविध कर्जाबरोबरच ठेवींवरील व्याजदरही कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने रिव्हर्स रेपो दर कपातीसह कर्जदारांना आणखी तीन महिने त्यांचे मासिक हप्ते न भरविण्याविषयीची मुभा देऊ केली आहे.
महागाई वाढणार
कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या स्थितीमुळे वस्तूंच्या मागणी आणि पुरवठय़ावर विपरित परिणाम झाला असून त्याचे सावट महागाईवर पडण्याची भीती गव्हर्नरांनी व्यक्त केली. अन्नधान्याच्या वस्तूंच्या किंमती वाढण्याची शक्यता असून पहिल्या सहामाहीत तर हेच चित्र कायम असण्याबाबतचे वक्तव्य गव्हर्नरांनी केले. टाळेबंदी सदृश स्थितीमुळे सरकारचे महसुली उत्पन्नही कमी होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली.
विकास दर उणे स्थितीत..
कोविड-१९ चा सर्वाधिक विपरित परिणाम हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर होण्याचा अंदाज गव्हर्नरांनी व्यक्त के ला. चालू आर्थिक वर्षांत विकास दर उणे स्थितीत राहण्याची भीती गव्हर्नरांना व्यक्त केली. वित्त वर्ष २०२०-२१ च्या दुसऱ्या अर्ध वर्षांत अर्थव्यवस्था उभारी घेण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली. करोना व त्या पार्श्वभूीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे देशातील कृषी क्षेत्राची वाढ सकारात्मक असेल, असेही ते म्हणाले.

IMF प्रमुखांकडून रघुराम राजन यांचे नाव बाह्य सल्लागार गटामध्ये सामील

IMF प्रमुखांकडून रघुराम राजन यांचे नाव बाह्य सल्लागार गटामध्ये सामील

रघुराम राजन यांचे नाव IMF प्रमुखांकडून बाह्य सल्लागार गटामध्ये सामील करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (International Monetary Fund – IMF) व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिवा यांनी आपला नवीन बाह्य सल्लागार गट निर्माण केला आहे.
सदर गटाचे काम सक्षमपणे पार पडण्यासाठी जगभरातील नामांकित व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आणि इतर मान्यवर नव्या बाह्य सल्लागार गटामध्ये समाविष्ट आहेत. रघुराम राजन ३ वर्षे RBI गव्हर्नर पदावर कार्यरत होते.
सध्या ते शिकागोच्या प्रतिष्ठित विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
IMF चे विस्तारित रूप International Monetary Fund असे आहे.
२७ डिसेंबर १९४५ रोजी आंतरराष्ट्रीय नाणे निधीची स्थापना झाली.
वॉशिंग्टन डी. सी. येथे IMF चे मुख्यालय स्थित आहे. क्रिस्टलिना जॉर्जिवा या सध्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत आहेत
गीता गोपीनाथ या मुख्य अर्थशास्त्रज्ञ पदाची धुरा सांभाळत आहेत.

Share This Article