⁠  ⁠

चालू घडामोडी – २८ एप्रिल २०१६

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 4 Min Read
4 Min Read
देश-विदेश

जगातील आदिवासींमध्ये कुपोषण, अर्भक मृत्यूदर अधिक, शिक्षण व उत्पन्न मात्र कमी
भारतासह जगातील बहुतांश देशातील आदिवासी हे त्या त्या देशातील गैरआदिवासींपेक्षा मागे असल्याचा निष्कर्ष ‘लॅन्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकात नुकताच प्रकाशित झाला आहे. २३ देशातील आदिवासींची आकडेवारी एकत्र करून हा अभ्यास करण्यात आला असून जगाच्या पाठीवरील आदिवासींमध्ये प्रामुख्याने कुपोषण, अर्भक मृत्यूदर अधिक आहे. शैक्षणिक पातळी व उत्पन्न आदिवासींमध्ये कमी आहे.chalu ghadamodi mpsc

वैद्यकीय प्रवेशासाठीची ‘नीट’ यंदापासूनच
विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय पातळीवरील ‘नीट’ परीक्षा याच शैक्षणिक वर्षापासून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. ‘नीट’ यंदापासून लागू करायची झाल्यास पहिल्या टप्प्यात एक मे रोजी आणि दुसऱ्या टप्प्यात २४ जुलै रोजी परीक्षा घेण्यात येईल आणि या दोन्ही परीक्षांचा निकाल १७ ऑगस्टला लावण्यात येईल, असा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयापुढे ठेवण्यात आला होता. त्याला न्यायालयाने मंजुरी दिली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.chalgu ghadamodi spardha pariksha

‘इस्रो’कडून ‘आयआरएनएसएस-१जी’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही-सी३३ यान अवकाशात सोडण्यात आले आणि त्याने आयआरएनएसएस-१जी हा उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला. आयआरएनएसएस-१जी हा सात उपग्रहांच्या मालिकेतील शेवटचा उपग्रह आहे. मालिकेतील पहिला उपग्रह जुलै २०१३ मध्ये प्रक्षेपित करण्यात आला होता. सदर उपग्रहाच्या मोहिमेचा कालावधी १२ वर्षांचा आहे.police bharati chalu ghadamodi

महाराष्ट्र

ताम्रपाषाण युगातील अवशेष सांगलीत आढळले
सांगली जिल्ह्याचा तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडी गावात अग्रणी नदीकाठी ताम्रपाषाण युगातील लोकसंस्कृती नांदत असल्याचे आढळून आले आहे. या ठिकाणी सुमारे चार हजार वर्षांपूर्वी कृषी संस्कृती असल्याचा दावा इतिहास संशोधक प्रा. डॉ. निरंजन कुलकर्णी यांनी केला आहे. या गावात असलेल्या पांढरीवर मृदभांडी, मातृकामूर्ती आणि मुलांच्या खेळण्याचे अवशेष आढळून आले आहेत. इतिहास संशोधनात ताम्रपाषाण युग हे कृषी संस्कृतीच्या उदय आणि विकासाचे सर्वोच्च युग मानले जाते. इसवीसन पूर्व २००० ते इसवीसन पूर्व ९०० या काळात हे युग अस्तित्वात होते. या काळात प्रामुख्याने शिकारीचे युग संपून मानव हा समूहाने राहू लागला. शेती व्यवसायाच्या जोडीला तो पशुपालनाकडेही याच काळात वळला.

क्रीडा

दीपिकाची जागतिक विक्रमाशी बरोबरी
भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारीने शांघाय येथे सुरू असलेल्या विश्वचषक स्पध्रेतील रिकव्‍‌र्ह प्रकारात जागतिक विक्रमाशी बरोबरी केली. राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णपदके नावावर केलेल्या दीपिकाने ७२ प्रयत्नांत ६८६ गुणांची कमाई करून लंडन ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या कि बो बाईच्या (कोरिया) जागतिक विक्रमाशी बरोबरी केली. २०१५मध्ये गुवांगझाऊ येथे झालेल्या पात्रता फेरीत बाईने कोरियाच्याच पार्क संग-ह्युनने (६८२) ११ वर्षांपूर्वी नोंदवलेला विक्रम मोडला होता. बाईने २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते.

सहज विजयासह सायना, सिंधूची आगेकूच
सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटूंनी महिला एकेरीत आपापल्या प्रतिस्पर्धीवर सोपा विजय मिळवीत आशिया अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पुरुष दुहेरीतही मनू अत्री व बी सुमित रेड्डी यांना पराभव पत्करावा लागला. पाचव्या मानांकित जपानच्या हिरोयुकी इंडो आणि केनिची हयाकावा जोडीने भारतीय जोडीवर २१-१५, २१-१३ अशी कुरघोडी केली.mpsc psi sti chalu ghadamodi

अर्थशास्त्र

निर्देशांकाचा वर्षांतील उच्चांक
तेजीच्या लाटेवर स्वार असलेल्या भांडवली बाजाराने बुधवारी त्यात आणखी भर घातली. ५६.८२ अंश वाढीने सेन्सेक्स २६,०६४.१२ वर तर १७.२५ अंश वाढीने निफ्टी ७,९७९.९० पर्यंत पोहोचला. मुंबई निर्देशांकाचा २०१६ मधील हा आतापर्यंतचा तर निफ्टीचा नोव्हेंबर २०१५ नंतरचा बुधवारचा वरचा स्तर होता.

‘अॅपल’ला मंदीचा धक्का
भारतात मोठय़ा संधी आहेत हे खरे असले तरी कमी वेगवान नेटवर्क व अनौपचारिक व विस्कळीत विक्री व्यवस्था यामुळे ‘अॅपल’ला पूर्ण क्षमतेने व्यवसाय करणे जमले नाही, त्यातच आता तिचा महसूल हा गेल्या तेरा वर्षांत म्हणजे २००३ नंतर प्रथमच घसरला आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांनी स्पष्ट केले.

TAGGED:
Share This Article