1) भारतीय संशोधकांकडून प्रकाशाच्या वेगापेक्षा जलद इलेक्ट्रॉनचा शोध
मुंबईतील टाटा मुलभूत विज्ञान संस्थेतील प्रा. जी. रवींद्रकुमार यांच्या टीमने प्रकाशाच्या वेगाला काचेत चकवा देत त्यापेक्षा जलद जाणाऱ्या इलेक्ट्रॉनचा शोध लावाला आहे. यासाठी त्यांनी काचेचा वापर करून प्रकाशाचा वेग नियंत्रित करण्यावर यश मिळवून त्या वेगापेक्षा जास्त वेगाने धावणारे चेरेनकोव लहारी तेथून पार केल्या. तसेच या लहरींच्या उगमापासून त्यांचा अस्तापर्यंताच्या सर्व नोंदणीही केल्या. याचमुळे या संशोधनात नाविन्य आले आहे. त्यांचा हा प्रबंध नुकताच ‘फिजिकल रिव्ह्यू लेटर्स’ या नामांकित नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. यानंतर जगभरातून या प्रयोगाबद्दल उत्सुकता व्यक्त होत आहे. प्रा. जी. रवींद्रकुमार यांच्या टीमच्या या संशोधनामुळे भविष्यात इलेक्ट्रोन इमेजिंग आणि वैद्यकशास्त्रात मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. हा फायदा इतका उपयुक्त असेल की, शस्त्रक्रियेसाठी सध्या वापरल्या जाणाऱ्या लेझर तंत्रज्ञानापेक्षा अधिक अद्ययावत तंत्रज्ञान वापरून शरीरातील उतींवर उपचार करणे शक्य होणार आहे. याच टीमने याआधी लेझर वापरून जगातील सर्वाधिक क्षमतेच्या ‘टेराहर्टझ’ किरणांची निर्मिती केली आहे. त्यांच्या या संशोधनावर अधिक काम केल्यास भविष्यात या किरणांच्या सहाय्याने बंद पुस्तकाचे वाचन करता येणेही शक्य होणार आहे. याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीनेही या किरणांचा मोठा वापर होऊ शकणार आहे.
2) कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचं निधन
कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचं आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. जयेंद्र सरस्वती यांचा जन्म १८ जुलै १९३५ मध्ये झाला होता. ते कांचीपुरम पीठाचे ६९ वे शंकराचार्य होते. ते १९५४ मध्ये शंकराचार्य बनले होते. चंद्रशेखेरेन्द्रा सरस्वती यांनी त्यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं होतं. त्यांचं मूळ नाव महादेव सुब्रमण्यम होते. शंकराचार्य झाल्यानंतर त्यांचं नामकरण जयेंद्र सरस्वती असं करण्यात आलं होतं. वेदांवर त्यांचं प्रभुत्व होतं. २००३ मध्ये त्यांना शंकराचार्याची उपाधी घेऊन ५० वर्ष पूर्ण झाली होती. अयोध्येत राम मंदिर व्हावे म्हणूनही ते आग्रही होते. १९८३ मध्ये जयेंद्र सरस्वती यांनी शंकर विजयेंद्र सरस्वती यांना आपला उत्तराधिकारी घोषित केलं होतं.
३) जगातील सर्वात मोठे विमान स्ट्रॅटोलाँचची यशस्वी चाचणी
जगातील सर्वात मोठे विमान स्ट्रॅटोलाँचची धावपट्टीवरील चाचणी यशस्वी ठरली आहे. ही चाचणी कॅलिफोर्नियातील मोझेव एअर अँड स्पेस पोर्टवर घेण्यात आली. याचबरोबर विमानाच्या उड्डाणाचा मार्ग मोकळा झाला आहे. हे विमान २०१९ मध्ये पहिले उड्डाण करेल. अंतराळात रॉकेट नेण्याचे काम करणार आहे. २४ तासांत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात साधनसामग्री पोहोचवेल. सध्याच्या अंतराळ मोहिमेपेक्षा ही कमी खर्चीक आहे. या विमानाच्या विंगस्पॅनची लांबी ३७५, तर रुंदी १२.५ फूट आहे. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलेन या प्रकल्पात कार्यरत आहेत. विमानास २८ चाके, ६ इंजिन आणि २ कॉकपिट आहेत. विमानाच्या कॉकपिटमध्ये ३ केबिन क्रूसाठी जागा आहे. विमानास एकूण ६ इंजिन असून प्रत्येक इंजिनाचे वजन ४ हजार किलो आहे.
4) जाॅर्डनचे किंग अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसैन भारत दौऱ्यावर
जाॅर्डनचे किंग अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसैन हे मंगळवारी नवी दिल्लीत पाेहाेचले. ते १ मार्चपर्यंत भारताचा दाैरा करतील. हा त्यांचा दुसरा भारत दाैरा अाहे. ते यापूर्वी २००६मध्ये भारतात अाले हाेते. या वेळी त्यांच्यासाेबत ३०० सदस्यांचे प्रतिनिधी मंडळही अाले अाहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी व अब्दुल्ला यांच्यात गुरुवारी द्विपक्षीय बैठक हाेईल. या बैठकीत संरक्षण, माहिती-तंत्रज्ञान, अाराेग्यसेवा अादी क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी एक ब्ल्यू प्रिंट तयार केली जाऊ शकते. मध्य-पूर्वेतील जाॅर्डन हा भारताचा असा भागीदार देश अाहे, जाे इस्रायल व पॅलेस्टाइनसह अरब देशांत संतुलन कायम ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावताे. किंग अब्दुल्ला हे स्वत: दहशवादाविराेधात उभे ठाकले अाहेत. ते अल-कायदा व इसिससारख्या दहशतवादी संघटनांविरुद्ध लढण्यासाठी भारताची मदत करू शकतात.
5) भारतीय संघाची दक्षिण अफ्रिकेला 5.6 लाखांची आर्थिक मदत
भारतीय आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने पाण्याच्या समस्येशी झगडणा-या केपटाऊन शहराला पाण्याच्या बाटल्या पोहोचवण्यासाठी तसंच बोअरवेलसाठी जवळपास 8500 डॉलर्स म्हणजेच 5.6 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. टी-20 मालिकेतील तिस-या आणि अखेरच्या सामन्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनी 1,00,000 रँड (दक्षिण आफ्रिकेचे चलन, 5.6 लाख रुपये) ‘द गिफ्ट ऑफ द गिव्हर्स फाऊंडेशन’ला दान केले. ही आफ्रिकन खंडातील सर्वात मोठी आपत्ती निवारण संस्था आहे.
MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.