महाराष्ट्राचा अर्थसंकल्प-२०१९
- राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला गेला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर केला.
- राज्याचा २०१९-२० या वर्षांसाठीचा १९ हजार ७८४ कोटी रुपये महसुली तुटीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. सातवा वेतन आयोग लागू केल्यामुळे महसुली तूट वाढल्याचे त्यांनी कबुली दिली.
- प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेसाठी १ हजार २१ कोटी, राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी २ हजार ९८ कोटी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी ७६४ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.
- चालू आर्थिक वर्षांत महसुली तूट ही १५ हजार कोटींच्या घरात जाणार असतानात, पुढील आर्थिक वर्षांत ही तूट २० हजार कोटींच्या आसपास जाईल, असा अंदाज वित्तमंत्र्यांनीच व्यक्त केला.
- या अर्थसंकल्पात 5449 दुष्काळी गावामध्ये मदत पोहोचवण्यासाठी विविध तरतूदी सरकारने केल्या आहेत.
- दुष्काळग्रस्त भागात थकीत वीज देयकांअभावी बंद असलेल्या ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्यासाठी वीज बिलाची 5 % रक्कम शासन देणार.
- आतापर्यंत 1 लाख 30 हजार शेततळी बनवली गेली आहेत. यासाठी आणखी 5 हजार 187 कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.
- कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी 3 हजार 498 कोटींचा निधी.
- आदिवासी विकास विभागाच्या अनुसूचित जनजाती उपयोजनेअंतर्गत विविध योजनांसाठी 8 हजार 431 कोटींची तरतूद.
- राज्यातील प्रदूषित नदी व तलाव संवर्धन तसेच अन्य बाबींसाठी पर्यावरण विभागासाठी रू. 240 कोटींची तरतूद.
- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान या योजनेसाठी रूपये 2 हजार 98 कोटींची तरतूद.
- ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या कल्याणासाठीच्या विविध योजनांसाठी 2 हजार 892 कोटींची तरतूद.
- स्मार्ट सिटी अभियानात 8 शहरांसाठी यंदा 2 हजार 400 कोटींची तरतूद.
- मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र, मेक इन इंडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रात 3 लक्ष 36 हजार कोटींची थेट विदेशी गुंतवणूक.
- राज्यातील रस्ते विकासासाठी यंदा 8 हजार 500 कोटींचा निधी. मागील साडे चार वर्षात 12 हजार 984 कि.मी. लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती.
- राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आता उत्पन्नाची मर्यादा 8 लाख रुपये.
- मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र, मेक इन इंडियाच्या माध्यमातून 12 लक्ष कोटी रूपयांचे सामंजस्य करार.
- २०१८ मध्ये ४ लाख ६१ हजार ८०७ कोटी रुपयांच्या कर्ज अपेक्षित होते. राज्यावरील एकूण कर्ज ४ लाख १४ हजार ४१११ कोटी रुपये एवढे झाले आहे. राज्याच्या सकल उत्पन्नाशी हे प्रमाण १४.८२ टक्के आहे.
- महसुली जमा आणि खर्चाच्या अंदाजावर २०१८-१९ चा १४ हजार ९६० कोटी रुपयांचा महसुली तुटीचा अर्थसंकल्प मांडला होता.
- राज्यावरील कर्जाचे प्रमाण राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या 14.82 % एवढे आहे. मागील पाच वर्षात कर्जाचे हे प्रमाण 15 टक्क्यांहून कमी करण्यात सरकारला यश लाभले आहे.
- पोलीसांसाठी राज्यात 1 लक्ष निवासस्थाने बांधण्याचे उद्दिष्ट. यंदा 375 कोटींची तरतूद.
- अमरावती, गोंदिया, नाशिक, चंद्रपूर, जळगांव, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग विमानतळ विकास मोहिम वेगात
- राज्यातील किल्यांचे जतन व संवर्धन उपक्रमासाठी निधीची तरतूद. रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना. प्रत्येकी 14 किल्यांचा 2 टप्प्यात विकास.
- लोकसभा निवडणूक वर्षात अंतरिम अर्थसंकल्प मांडणारे मुनगंटीवार हे चौथे वित्तमंत्री आहेत. याआधी जयंत पाटील (२००४), दिलीप वळसे-पाटील (२००९) आणि अजित पवार (२०१४) यांनी वित्तमंत्री या नात्याने अंतरिम अर्थसंकल्प मांडला होता.
नागपुरची श्वेता उमरे ‘राष्ट्रीय युवा संसद महोत्सवात’ देशात प्रथम
- राष्ट्रीय युवा संसद महोत्सवात नागपुरच्या श्वेता उमरे यांनी बाजी मारत देशात पहिला क्रमांक पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज श्वेता उमरे यांना ‘राष्ट्रीय युवा ससंद पुरस्कार’प्रदान करण्यात आला.
- केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आज ‘ राष्ट्रीय युवा संसद महोत्सव- 2019’ च्या पहिल्या तीन विजेत्यांना पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
- या महोत्सवात सहभागी झालेल्या देशातील 56 युवकांमधून सर्वोत्तम तीन पुरस्कार विजेत्या मुलीच ठरल्या असून नागपूरच्या श्वेता उमरे यांना पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2 लाख रुपये , सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बेंग्लुरु (कर्नाटक)ची एम.एस.अंजनाक्षी द्वितीय तर पटना (बिहार)ची ममता कुमार तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली.
‘महारेरा’ ला राष्ट्रीय ई- गर्व्हनन्स पुरस्कार
- महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणास (महारेरा) डिजिटल क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल आज राष्ट्रीय ई- गर्व्हनन्स पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. हा पुरस्कार केंद्रीय राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) जितेंद्र सिंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार महारेराचे अध्यक्ष गौतम चॅटर्जी आणि विभागाचे सचिव वसंत प्रभू यांनी स्वीकारला.
- चॅटर्जी यांनी सांगितले, केंद्र शासनाने स्थावर संपदा नियमन विकास कायदा २०१६ मध्ये पारीत केलेला आहे. महाराष्ट्र शासनाने यासाठी महारेराची स्थापना २०१७ केली. महारेराच्यावतीने या कायदयाची अमलबजावणी पूर्णत: डिजिटल स्वरुपात होत आहे.
- १९,५०० पेक्षा अधिक स्थावर संपदांची नोंदणी महारेराकड़े झालेली असून २० लाख लोकांना त्यांची घरे मिळालेली आहे. महारेराकड़े २० हजार पेक्षा अधिक रियल इस्टेट ऐंजटची नोंदणी आहे. आतापर्यंत महारेराकडे ६,००० तक्रारी नोंदविण्यात आलेल्या असून यापैकी ४,००० पेक्षा अधिक तक्रारीच्या निपटारा झालेला आहे.
विकिमीडिया कॉमन्सने ओलांडली पुस्तकांची शंभरी
- मराठी भाषा दिनी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांची एकाचवेळी २१ पुस्तके “‘मराठी विकिस्रोत”‘ या मुक्त ग्रंथालयात दाखल झाली. यामुळे विकिमीडिया कॉमन्स या मुक्त ज्ञानस्रोताने मराठी पुस्तकांची शंभरी ओलांडली आहे. या प्रकल्पात एकूण ११२ पुस्तके उपलब्ध झाली असून आता जगभरातील वाचक ही पुस्तके कधीही कोणत्याही साधनाचा वापर करून वाचू शकतील.
- आतापर्यंत नामवंत लेखकांची ९० पुस्तके उपलब्ध होती. त्यामध्ये विख्यात शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, मंगला नारळीकर, पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ, व्यवस्थापन गुरु शरू रांगणेकर आदींचा समावेश आहे.
- भारतीय लेखकांसाठी असलेल्या नियमाप्रमाणे लेखकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यासाठी मराठी भाषेतील सर्व प्रताधिकार मुक्त साहित्य उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.
तांदूळ निर्यातीमधील भारताचे स्थान घसरले
- आखाती राष्ट्रे, ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडामधून सर्वाधिक मागणी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारतीय तांदूळ विक्रीमध्ये असलेले वर्चस्व यावर्षी भारताला गमवावे लागले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षांतील एप्रिल ते डिसेंबर २०१८ या कालावधीत बासमती तसेच बिगर बासमती तांदुळाच्या निर्यातीत घट झाली आहे.
- भाववाढीनंतर बासमती तांदुळाच्या निर्यातीत गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत १.७० टक्के घट झाली. ही घट तुलनेत छोटी वाटत असली तरी शेजारील थायलंड, पाकिस्तान आणि व्हिएतनाम या तांदूळ निर्यातदार राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विस्तारण्यासाठी पूरक परिस्थिती निर्माण झाली आहे.
- गेल्यावर्षी ६५ लाख टन एवढी बिगर बासमती तांदुळाची निर्यात झाली होती. चालू आर्थिक वर्षांत ५६ लाख टन एवढी बिगर बासमती तांदुळाची निर्यात झाली.
- या वर्षांत डिसेंबर अखेरीपर्यंत देशभरातून २८.६० लाख टन एवढी बासमतीची निर्यात झाली. गेल्या आर्थिक वर्षांत बासमती तांदुळाची निर्यात २९.१० लाख टन एवढी झाली होती. बिगर बासमती तांदुळाच्या निर्यातीतही १४ टक्क्यांनी घट झाली.
- पाकिस्तान, थायलंड, व्हिएतनाम या देशांनी जागतिक बाजारात तांदुळाची निर्यात वाढविली आहे.
डिसीपी रोशन यांना स्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट अवॉर्ड
- नागपूर शहर पोलीस विभागातील परिमंडळ-४ चे उपायुक्त राजतिलक रोशन यांना पोलीस सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबाबत स्कॉच ग्रुपतर्फे ‘स्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. २५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथील कॉन्स्टीट्युशन क्लब येथे आयोजित समारंभात त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- बेपत्ता मुलांना शोधण्यसाठी डीसपी रोशन यांनी एक टेक्निक शोधून काढली आहे. त्याचा चांगला परिणाम दिसून आला.