⁠
Uncategorized

चालू घडामोडी : २८ ऑक्टोबर २०२०

Current Affairs : 28 October 2020

फेसबुक इंडियाच्या अंखी दास यांचा राजीनामा

ANKHi

फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या भारतातील पब्लिक पॉलिसी विभागाच्या प्रमुख अंखी दास यांनी राजीनामा दिला आहे.
अंखी दास या ऑक्टोबर २०११ पासून फेसबुक इंडियासाठी काम करत होत्या. फेसबुकच्या आधी त्या भारतातील मायक्रोसॉफ्टमध्ये पब्लिक पॉलिसी हेड होत्या.
जानेवारी २००४ मध्ये त्या मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू झाल्या होत्या.

जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदीची मुभा

New map of Jammu and Kashmir: Is this what it will look like? - Oneindia  News

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय नागरिकांना अधिवासाच्या दाखल्याशिवाय जमीन खरेदी करता येईल. यासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना काढली.
नव्या केंद्रशासित प्रदेशातील विकासाला चालना देण्यासाठी केंद्राने हा आदेश काढला आहे.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द (अनुच्छेद ३७०) करण्याचा प्रस्ताव संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये मंजूर करण्यात आला. त्यानंतर केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन भूप्रदेशांचे विभाजन करून त्यांना केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा
अनुच्छेद ३७० रद्द झाल्यामुळे उर्वरित भारतात लागू होणारे सर्व कायदे व नियम जम्मू-काश्मीरलाही लागू झाले व दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दाही संपुष्टात आला. यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या ‘नागरिकांना’ तिथली जमीन मालकी हक्काने खरेदी करण्याचा अधिकार होता. केंद्राने अधिसूचना काढल्यामुळे उर्वरित भारतातील कोणलाही जम्मू-काश्मीरमध्ये मालकीहक्काने जमीन खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अमेरिकी सर्वोच्च न्यायालयात बॅरेट यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब :

अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयात विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शिफारस केलेल्या अ‍ॅमी कॉनी बॅरेट यांची नियुक्ती झाली आहे.
तत्पूर्वी रिपब्लिकनांचे वर्चस्व असलेल्या सिनेटने बॅरेट यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले होते.
तर अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीला एक आठवडा उरला असताना ही निवड झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत टपाली मतदान जास्त असून त्यात काही वाद झाले व ते प्रकरण न्यायालयात गेल्यास आपल्याला अनुकूलता राहावी यासाठी ट्रम्प यांनी तातडीने त्यांच्या मर्जीतील बॅरेट यांची सर्वोच्च न्यायालयात वर्णी लावल्याचा आरोप होत आहे.
सिनेटमध्ये बॅरेट यांच्या नावावर 52 विरुद्ध 48 मतांनी शिक्कामोर्तब झाले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाची एकजूटही बॅरेट यांची नियुक्ती रोखू शकली नाही कारण रिपब्लिकन पक्षाचे सिनेटमध्ये बहुमत आहे.

मुख्य माहिती आयुक्तपदी यशवर्धन सिन्हा यांची निवड

मुख्य माहिती आयुक्तपदी यशवर्धन सिन्हा यांची निवड - Marathi News | Section  of Yashwardhan Sinha as Chief Information Commissioner | Latest national  News at Lokmat.com

परराष्ट्र सेवेतील माजी अधिकारी यशवर्धन सिन्हा हे नवे मुख्य माहिती आयुक्त (सीआयसी) असतील.
तसेच या पदासाठी 154 जणांचे दावे होते, तसेच पाच माहिती आयुक्तपदांसाठी 355 जण इच्छुक होते. सिन्हा हे सध्याच माहिती आयुक्तपदी आहेत.
तर दुसरे म्हणजे सिन्हा हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात जम्मू आणि काश्मीरचे राज्यपालपद भूषविलेले दिवंगत जनरल एस. के. सिन्हा यांचे चिरंजीव आहेत.
नव्या पाच माहिती आयुक्तांमध्ये मोदी सरकारने महाराष्ट्रातील पत्रकार उदय माहूरकर यांची निवड केली आहे.

नर्मदेत देशातील पहिल्या सी-प्लेन सेवेस

image 2

स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी आता हवाईमार्गे केवडियाला जाऊ शकाल.
केवडिया ते अहमदाबाददरम्यान १३६ किमी अंतर सी-प्लेनने लवकर गाठता येईल. १ नोव्हेंबरपासून सर्वसामान्यांसाठी ही सेवा सुरू होऊ शकते.
यासाठी देशातील पहिले सी-प्लेन सोमवारी मालदीवहून कोची, गोवामार्गे केवडियात दाखल झाले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती ३१ ऑक्टोबर रोजी असून हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा होतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सी-प्लेन सेवेचे लोकार्पण होणार आहे. १९ प्रवासी क्षमता असलेले सी-प्लेन सरदार सरोवर नर्मदा धरणाजवळील तलाव क्रमांक ३ वर उतरवले जाणार आहे. यानंतर चाचणी उड्डाणासाठी २.३० वाजता रवानाही झाले. केवडियापासून (नर्मदा जिल्हा) साबरमती रिव्हर फ्रंट -अहमदाबादचे अंतर १३६ किमी आहे. सी-प्लेनद्वारे फक्त ४५ मिनिटांत हे अंतर गाठता येईल. सी-प्लेन हवाई ट्रीप दररोज सकाळी आठ वाजता अहमदाबादपासून सुरू होईल. दररोज सी-प्लेन हवाईमार्गे आठ ट्रीप पार पाडेल. यासाठी प्रतिव्यक्ती ४८०० रुपये तिकीट दर ठरवण्यात आले आहेत. या प्लेनमधून १४ प्रवासी जाऊ शकतील.
अहमदाबाद-केवडियादरम्यान उड्डाणासाठी आलेले सी-प्लेन ५० वर्षे जुने
या सी-प्लेनची निर्मिती १९७१ मध्ये कॅनडात झालेली आहे.

Related Articles

Back to top button