---Advertisement---

Current Affairs 29 April 2019

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

चीनमधील २०० अमेरिकी कंपन्या येणार भारतात

  • अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार युद्ध सुरू असताना चीनसाठी एक नकारात्मक वृत्त आहे. अमेरिकेतील जवळपास २०० कंपन्या लोकसभा निवडणुकीनंतर आपले प्रकल्प चीनमधून भारतात स्थलांतरित करणार आहेत.
  • अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध दृढ करू पाहणाऱ्या यूएस- इंडिया स्ट्रॅटेजिक अ‍ॅण्ड पार्टनरशिप फोरमने ही माहिती दिली आहे.
  • या स्वयंसेवी समूहाने म्हटले आहे की, चीनऐवजी अन्य पर्याय शोधू पाहणाऱ्या या कंपन्यांसाठी भारत एक शानदार पर्याय आहे. या समूहाचे अध्यक्ष मुकेश अघी यांनी सांगितले की, अनेक कंपन्या आमच्याशी चर्चा करीत आहेत आणि विचारत आहेत की, भारतात गुंतवणूक करून कशाप्रकारे चीनला पर्याय शोधला जाऊ शकतो. निवडणुकानंतर भारतात स्थापन होणाऱ्या नव्या सरकारला हा समूह सुधारणांबाबतचा सल्ला देणार आहे. मुकेश अघी सांगितले की, भारत- अमेरिका यांच्यातील मुक्त व्यापाराचे आम्ही समर्थन करतो.

सुनील कुमार, गुरप्रीतची रौप्यकमाई

  • आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या ग्रीको-रोमन प्रकारातील ७७ किलो वजनी गटात भारताच्या गुरप्रीत सिंगने आणि ८७ किलो वजनी गटात सुनील कुमारने रौप्यपदक पटकावले.
  • स्पर्धेच्या अंतिम फेरीत गुरप्रीतसमोर कोरियाच्या ह्य़ेऑनवू किमचे आव्हान समोर होते. या लढतीत किमने ८-० असे वर्चस्व राखल्यामुळे गुरप्रीत सिंगला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
  • भारताच्या सुनील कुमारने ८७ किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारली. परंतु सुनीलला इराणच्या हुसेन अहमद नुरीशी झुंज देताना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सुनीललादेखील रौप्यवर समाधान मानवे लागले

हरप्रीतला रौप्य आणि ग्यानेंद्रला कांस्य

  • आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या शानदार अभियानाची भारतीय मल्लांनी एकूण १६ पदकांची लयलूट करीत सांगता केली. रविवारी स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी ग्रीको-रोमन मल्लांनी एक रौप्य आणि एक कांस्य पदकाची कमाई केली.
  • ८२ किलो वजनी गटात हरप्रीत सिंगने रौप्यपदक मिळवले, तर ६० किलोमध्ये ग्यानेंद्रने कांस्य पदक प्राप्त केले. भारताच्या एकंदर १६ पदकांमध्ये एक सुवर्ण, सहा रौप्य आणि नऊ कांस्यपदकांचा समावेश आहे.

वीस रुपयांचीही नवी नोट लवकरच चलनात

  • दहा रुपयांची नवी नोट सादर केल्यानंतर आता लवकरच वीस रुपयांचीही नवी नोट चलनात येणार आहे. फिकट पिवळ्या रंगातील या नोटेच्या एका बाजूला महात्मा गांधींचे चित्र असून, दुसऱ्या बाजूला अजिंठा-वेरूळ लेण्यांचे चित्र असणार आहे.
  • या नोटेवर रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी असेल. वीस रुपयांची नवीन नोट सादर झाल्यानंतर सध्या अस्तित्वात असलेल्या नोटाही चलनात राहणार असल्याचे रिझर्व्ह बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले.
  • नव्या नोटेवरही स्वच्छ भारत अभियानाचे बोधचिन्ह अंकित करण्यात येणार आहे. या नोटेचा आकार ६३ सेमी रूंद आणि १२९ सेमी लांब असेल. ही नोट सादर झाल्यानंतर कमी मूल्याच्या चिल्लरची सध्या भासणारी टंचाई दूर होण्याची चिन्हे आहेत.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

1 thought on “Current Affairs 29 April 2019”

Comments are closed.