Current Affairs 29 June 2020
पुण्यातील NCRA च्या शास्त्रज्ञांनी लावला मृत आकाशगंगेचा शोध
- पुणे जिल्ह्यातील जुन्नरच्या खोडद येथील जगातल्या सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बीण प्रकल्पाच्या अर्थात जीएमआरटीच्या मदतीने पुणे येथील एनसीआरएच्या शास्त्रज्ञानी दुर्मिळ अशा मृत आकाशगंगेचा शोध लावला आहे. ‘जे 16155452’ असं या आकाशगंगेच नाव आहे.
- या आकाशगंगेच्या अवशेषांतून रेडिओ लहरींचे उत्सर्जन होत आहे. या संदर्भातले संशोधन राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकशास्त्र केंद्राच्या(एनसीआरए) डॉ.सी.एच ईश्वरचंद्रा आणि आफ्रिकेतील डॉ.झारा आर यांनी केले आहे. ते नुकतेच प्रकाशित झालेल्या ‘आर्काईव्ह’ या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे.
- संपूर्ण आकाशगंगाच कृष्णविवराने गिळंकृत केल्यावर त्यातील इलेक्ट्रॉनच्या वारंवारितेमुळे रेडिओ तरंग उत्सर्जित होतात. अशा आकाशगंगेचे अवशेष सापडणे तसे दुर्मिळ असते. पण, त्याचबरोबर तिचा अभ्यास करण्याचे आव्हानही असते. या शास्त्रज्ञानी पुणे जिल्ह्यातील खोडद येथील जायंट मिटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप(जीएमआरटी) आणि साऊथ आफ्रिकन ऍस्ट्रॉनॉमिकल ऑब्झवेटरीच्या सहाय्याने तिचा शोध घेतला आहे.
- आकाशगंगेतील जटिल गाभा, प्रकाश आणि पदार्थाचे वेगाने होणारे उत्सर्जन(जेट) आणि उष्ण ठिकाणे आढळली नाहीत. काही लाख वर्षांपूर्वीच तिच्यातील इंधन संपुष्टात आले. 2017-18 मध्ये शास्त्रज्ञांनी या आकाशगंगेचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.
- या आकाशगंगेचे वैशिष्ठ म्हणजे, तिचा विस्तार 3 लाख प्रकाशवर्षं आहे, 7.6 कोटी वर्ष तीच वय आहे, 150 ते 1400 मेगाहर्टझ लहरींचे तिच्यातून उत्सर्जन होत आहे आणि सुमारे 30 टक्के भाग अजून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
भारतीय वंशाचे लिओ वराडकर आयर्लंडचे उपपंतप्रधान
- गेल्या फेब्रुवारीत झालेल्या निवडणुकीत कोणत्याच पक्षास स्पष्ट बहुमत न मिळाल्याने आयर्लंडमध्ये तीन पक्षांचे आघाडी सरकार स्थापन झाले.
- त्यासाठी ठरलेल्या सत्ता वाटपाच्या सूत्रानुसार आता मायकेल मार्टिन हे पंतप्रधान, तर मावळते पंतप्रधान लिओ अशोक वराडकर उपपंतप्रधान झाले.
- अडीच वर्षांनी डिसेंबर २०२२ मध्ये मूळचे भारतीय वंशाचे असलेले ४१ वर्षांचे वराडकर पुन्हा आयर्लंडचे पंतप्रधान होतील. फिने गेल या पक्षाचे नेते असलेले वराडकर सन २०१७ पासून ते फेब्रुवारीतील निवडणुकीपर्यंत पंतप्रधान होते.
- वराडकर यांचा जन्म आयर्लंडमध्येच झाला असला तरी त्यांचे वडील मूळचे कोकणातील मालवणचे आहेत.
- वराडकर यांचा फिने गेल, मार्टिन यांचा फिआन्ना पेल व ग्रीन पार्टी या तीन पक्षांनी मिळून आताचे आघाडी सरकार स्थापन केले आहे. फिने गेल व फिआन्ना गेल हे परस्परांचे कट्टर प्रतिस्पर्धी पक्ष असून, आयर्लंडमधील यादवी युद्धानंतर हे दोन पक्ष सत्तेत प्रथमच एकत्र आले
राष्ट्रीय सांख्यिकी दिन: 29 जून
- राष्ट्रीय सांख्यिकी प्रणालीच्या स्थापनेत प्रा. पी. सी. महालानोबीस यांनी दिलेल्या अमुल्य योगदानाची दखल घेत, दरवर्षी प्रा. महालनोबीस यांच्या जयंती दिनी म्हणजेच 29 जून रोजी सांख्यिकी दिन साजरा केला जातो. दैनंदिन जीवनात सांख्यिकीचा वापर लोकप्रिय करण्यासाठी आणि धोरणे आखण्यात सांख्यिकी कशाप्रकारे मदत करते याबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी भारत सरकार सांख्यिकी दिन साजरा करते.