---Advertisement---

Current Affairs – 3 September 2018

By Rajat Bhole

Updated On:

---Advertisement---

न्या. रंजन गोगोई होणार भारताचे नवे सरन्यायाधीश

  • भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती रंजन गोगोई यांची शिफारस सध्याचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
  • या पदावर सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्तींना संधी देण्याची परंपरा आहे. यात न्या. गोगोई यांचे नाव सर्वात आघाडीवर असून त्यांच्याच नावाची सरन्यायाधीशांनी आपला उत्तराधिकारी म्हणून शिफारस केल्याचे सूत्रांनी नमूद केले.
  • न्या. गोगोई हे २८ फेब्रुवारी २००१ रोजी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले. त्यानंतर १२ फेब्रुवारी २०११ रोजी ते पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. एप्रिल २०१२पासून ते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत.
  • न्या. गोगोई हे आसाममधील असून सध्या त्यांच्यावर एनसीआर (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन) अपडेट करण्याची जी प्रक्रिया सुरू आहे, त्या प्रक्रीयेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Asian Games 2018 : एशियाडच्या इतिहासात भारताची सर्वोत्तम कामगिरी

---Advertisement---
  • गेल्या १४ दिवसांपासून सुरु असलेला एशियाड स्पर्धांच्या खेळांचा थरार आज संपला. भारताने १४व्या दिवशी २ सुवर्ण पदके कमावत भारतीय चाहत्यांना शेवटच्या दिवशी गोड आठवणी दिल्या.
  • भारताने यंदाच्या स्पर्धांमध्ये सर्वाधिक ६९ पदके मिळवली. या आधी गुआंगझू येथे झालेल्या २०१० सालच्या आशियाई स्पर्धांमध्ये भारताला ६५ पदके मिळवण्यात यश आले होते. तर १९८२ साली नवी दिल्लीत झालेल्या स्पर्धांमध्ये भारताने ५७ पदकांची कमाई केली होती. तीच कामगिरी करण्यात भारताला २०१४च्या इंचियॉन आशियाई स्पर्धांमध्ये यश आले होते. याशिवाय, २००६ साली झालेल्या दोहा स्पर्धेत (५३), १९६२ सालच्या जकार्ता स्पर्धांमध्ये (५२) आणि १९५१ सालच्या नवी दिल्लीतील स्पर्धांमध्ये (५१) भारताला पदकांची अर्धशतक गाठता आले होते.
  • यंदाच्या स्पर्धांमध्ये भारताने १५ सुवर्णपदके पटकावत आपल्या सर्वाधिक सुवर्ण पदकांच्या कामगिरीची बरोबरी केली.

add header new

नियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC

टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा – Mission MPSC Telegram Channel

 

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now