रॉजर फेडरर स्वित्झर्लंड टूरिझमचा ब्रँड अॅम्बेसेडर
स्विस मास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेनिसपटू रॉजर फेडररला स्वित्झर्लंड टूरिझमचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नेमण्यात आले आहे.
वर्षानुवर्षे स्वित्झर्लंडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फेडररने स्विस राष्ट्रीय पर्यटन मंडळाबरोबर दीर्घकालीन करार केला आहे.
याचा उद्देश स्वित्झर्लंडमध्ये पर्यटनाला प्रोत्साहन देणे हे आहे.
फेडरर आणि स्वित्झर्लंड जागतिक स्तरावर देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी एकत्र काम करतील.
हॅमिल्टनला जेतेपद
विश्वविजेत्या लुइस हॅमिल्टनने मॅक्स व्हेस्र्टापेनला मागे टाकत यंदाच्या हंगामातील पहिल्या बहारिन ग्रां. प्रि. फॉर्म्युला-वन शर्यतीचे जेतेपद पटकावले.
हॅमिल्टनच्या कारकीर्दीतील हे ९६वे फॉर्म्युला-वन जेतेपद आहे.
५६पैकी ५३व्या फेरीत व्हेस्र्टापेनने हॅमिल्टनला मागे टाकले. परंतु ही आघाडी तो टिकवू शकला नाही आणि एका वळणावर तो टॅ्रकमर्यादेच्या बाहेर गेला.
उत्तरार्धात व्हेस्र्टापेनने हॅमिल्टनला गाठण्याचा पुन्हा प्रयत्न केला. पण ०.७४५ सेकंदांच्या फरकाने व्हेस्र्टापेनला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पहिल्या शर्यतीनंतर हॅमिल्टनच्या खात्यावर २५ गुण आणि व्हेस्र्टापेनच्या खात्यावर १८ गुण जमा झाले आहेत.
व्हेस्र्टापेनला पिछाडीवर ठेवणे अशक्यप्राय वाटत होते. तो मला गाठणार याची खात्री होती. परंतु मला आव्हाने आवडतात. कारकीर्दीतील ही सर्वात आव्हानात्मक शर्यत होती.
जी.एस. लक्ष्मी : पहिली क्रिकेट सामनाधिकारी भारतीय महिला
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयसीसीच्या मॅच रेफरी बनून भारताचा माजी महिला क्रिकेटपटू जी.एस. लक्ष्मी एक नवा इतिहास रचला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने लक्ष्मीचा आंतरराष्ट्रीय पॅनेल ऑफ मॅच रेफरीमध्ये समावेश केला आहे.
अशा पॅनेलमध्ये सामील होणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
जी.एस. लक्ष्मी हा देशातील सर्वात यशस्वी घरेलू महिला क्रिकेट संघ रेल्वेबरोबर खेळत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर तिला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नसली तरी 1999 साली इंग्लंड दौर्यावर आलेल्या महिला क्रिकेट संघाची ती सदस्य होती.
23 मे 1968 रोजी आंध्र प्रदेशातील राजामुंद्री येथे जन्मलेल्या लक्ष्मी मोठी झाली आणि जमशेदपुरात मोठी झाली.
2004 साली, जी.एस. लक्ष्मी निवृत्त झाली आणि त्यानंतर लक्ष्मीने कोचिंग सुरू केले आणि दक्षिण मध्य रेल्वेमध्ये कार्यरत राहिले.
तेव्हापासून लक्ष्मी कूच बिहार ट्रॉफीमध्ये सेवा बजावत आहे.
केन-बेटवा नदी जोड प्रकल्पासाठी उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांसोबत करार
केन-बेटवा नदी जोड प्रकल्पासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालय, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांच्या सरकारांसोबत सामंजस्य करार झाला.
केन-बेटवा नदी जोड प्रकल्प
जलसंपदा मंत्रालयाकडून तयार केलेल्या राष्ट्रीय दृष्टीकोन योजना अंतर्गत, राष्ट्रीय जल विकास प्राधिकरण (NWDA) कडून हिमालयीन नद्याअंतर्गत 14 आणि द्वीपकल्पाच्या नद्याअंतर्गत 16 नदी जोड प्रकल्पांना ओळखले गेले आहे. त्यापैकी, केन-बेटवा नदी जोड प्रकल्प हे प्रथम ठरले आहे.
उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या प्रदेशाअंतर्गत येणार्या केन-बेटवा नदी जोड प्रकल्पाला भारत सरकारने राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित केले आहे. तसेच या प्रकल्पाअंतर्गत मध्यप्रदेशामधील पन्ना व्याघ्र संवर्धन प्रकल्पाला आणल्या गेले आहे. या प्रकल्पामध्ये पन्ना व्याघ्र संरक्षण क्षेत्राचा सुमारे 8,650 हेक्टर चा भूभाग समाविष्ट आहे.
बेटवा ही यमुना नदीची उपनदी आहे जी, उत्तर भारताच्या प्रदेशात मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश मधून वाहते. तर केन नदी ही सुद्धा यमुना नदीची उपनदी आहे, जी मध्य भारताच्या बुंदेलखंड प्रदेशातली मोठी नदी आहे आणि मध्यप्रदेश व उत्तरप्रदेश मधून वाहते.
प्रकल्पाचे स्वरूप.
प्रकल्पामध्ये 230 किलोमीटर लांबीचा कालवा आणि धरणांची मालिका आणि केन आणि बेटवा नद्यांना जोडणारेमाकोडिया आणि धौधन धरणे तयार केले जाणार आहे.यामधून मध्यप्रदेशातील3.5 लक्ष हेक्टर आणि बुलंदखंड सह उत्तर प्रदेशामधील14,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
पर्यावरणाच्या संदर्भात, हा प्रकल्प व्याघ्रअभयारण्यात असणारा पहिला नदीचा प्रकल्प बनणार. हे मध्यप्रदेशातील पन्ना व्याघ्रअभयारण्यजे मॉडेल व्याघ्र-संवर्धन राखीव म्हणून प्रसिद्ध आहे, त्याचा सुमारे 10टक्के भाग सामावून घेईल.