---Advertisement---

चालू घडामोडी : ३० ऑक्टोबर २०१९

By Tushar Bhambare

Published On:

ACC-Women's-Emerging-Teams-Asia-Cup
---Advertisement---

Current Affairs 30 October 2019

आशिया चषक भारताने जिंकला

– भारतीय महिलांनी पहिल्याच ACC Women’s Emerging Teams Asia Cup स्पर्धेचे जेतेपद नावावर केले. भारताच्या ९ बाद १७५ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ १३५ धावांत माघारी परतला.

– पावसाच्या व्यत्ययामुळे लंकेपुढे १५० धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पण, भारतानं हा सामना डकवर्थ लुईस नियमानुसार १५ धावांनी जिंकला.

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील यांचे निधन

D B Patil
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील

– ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, कोल्हापूर या आपल्या संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब बळवंत तथा डी. बी. पाटील यांचे मंगळवारी हृदयविकाराने कोल्हापुरात निधन झाले, ते ८५ वर्षांचे होते.

– डी. बी. पाटील महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माजी मुख्याध्यापक होते. तसेच त्यांना राष्ट्रीय स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता.

पडसलगीकर नवे राष्ट्रीय उप-सुरक्षा सल्लागार

Ajit Doval Datta Padsalgikar
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल व राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार दत्ता पडसलगीकर

– राज्याचे माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी पडसलगीकर हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना सहाय्य करतील.

– पडसलगीकर यांनी यापूर्वी ‘आयबी’मध्ये संचालकपदावरही आपली सेवा बजावली आहे. प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पडसलगीर हे परिचयाचे आहेत. दोन दशकांहून अधिक काळ पडसलगीकर यांनी गुप्तहेर खात्यात कर्तव्य बजावताना अनेक किचकट मोहिमा हाताळल्या.

कोण आहेत पडसलगीकर ?

– पडसलगीकर हे १९८२च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत

– २०१६ मध्ये पडसलगीकर यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी

– त्यापूर्वी सुमारे १० वर्षे आयबीमध्ये त्यांनी सेवा बजावली

– नागपूर, कराड आणि नाशिकमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली

– उस्मानाबाद, साताऱ्याच्या अधीक्षकपदाची जबाबदारी

– मुंबईत पोलीस उपायुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिलं

– पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान

– प्रामाणिक आणि सचोटीचे अधिकारी म्हणून ख्याती

फेडररचे १०वे विजेतेपद

federer
टेनिसपटू रॉजर फेडरर

– स्वित्र्झलडचा मातब्बर टेनिसपटू रॉजर फेडररने रविवारी स्विस बॅसेल खुल्या टेनिस स्पर्धेचे १०व्यांदा विजेतेपद मिळवले, तर एकूण कारकीर्दीतील त्याचे १०३ वे विजेतेपद ठरले.

– २००६मध्ये वयाच्या २५व्या वर्षी फेडररने पहिल्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. तर गेल्या पाच वर्षांत (२०१४ पासून) चौथ्यांदा त्याने जेतेपदाचा चषक उंचावला. 

– पुरुषांमध्ये सर्वाधिक विजेतेपदे मिळवणाऱ्यांच्या यादीत फेडरर दुसऱ्या स्थानी असून जिमी कॉनर्स १०९ विजेतेपदांसह अग्रस्थानी आहे.

युरोपिअन युनियनचे प्रतिनिधीमंडळ काश्मीर दौऱ्यावर

– जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्याच्या पार्श्वभूमीवर युरोपिअन युनियनच्या संसदेचे २८ सदस्यांचे प्रतिनिधीमंडळ काश्मीरला भेट देणार आहे.

– युरोपिअन युनियनच्या संसदेचे २८ सदस्यांचे प्रतिनिधीमंडळ जम्मू-काश्मीरमधील सध्याच्या स्थितीचा आढावा घेणार आहे. कलम ३७० हटवल्यानंतर आजवर भारताकडून कोणत्याही परदेशी शिष्टमंडळाला जम्मू-काश्मीरचा दौरा करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

– पंतप्रधान मोदींची या प्रतिनिधीमंडळाने घेतल्यावर मोदी की, “जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यामध्ये त्यांना इथला विकास आणि शासनाची प्राथमिकता दिसून येईल तसेच इथली सांस्कृतीक आणि धार्मिक विविधता देखील चांगल्या प्रकारे कळू शकेल.”

– दरम्यान, युरोपिअन युनियनच्या संसदेचे हे प्रतिनिधीमंडळ याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना भेटले. तसेच आज उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची देखील भेट घेणार आहे.

दिल्लीत महिलांसाठी  मोफत बससेवा सुरू

– महिलांना मोफत प्रवासाची योजना महिलांच्या सक्षमीकरणास फायद्याची असून त्यातून समाजातील लिंगभेद दूर होण्यास मदत होईल असे सांगून केजरीवाल म्हणाले की, भावाकडून बहिणींना ही भाऊबीजेची भेट समजा. एके अ‍ॅपवर केजरीवाल यांनी या योजनेबाबत त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

– नवीन योजनेअंतर्गत महिलांना दहा रुपये दर्शनी किमतीची मोफत तिकिटे जारी करण्यात आली. ती गुलाबी रंगाची असून त्याच्या पैशांची प्रतिपूर्ती सरकार वाहतूकदार संस्थेला करणार आहे.

– यापुढील काळात महिलांना मोफत बस प्रवासाची ही योजना विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांना लागू करण्याचा विचार आहे, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

चालू घडामोडींच्या नियमित अपडेटसाठी तुम्ही Mission MPSC ला फेसबुक, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now