Current Affairs 4 & 5 March 2018
1) ऑस्कर: ओल्डमॅन बेस्ट अॅक्टर, फ्रांसेस मॅकडोरमंड बेस्ट अॅक्ट्रेस
90व्या अकादमी अवॉर्ड अर्थात ऑस्कर सोहळ्याला कॅलिफोर्नियातील डोल्बी थिएटरमध्ये शानदार सुरुवात झाली आहे. हॉलिवूडमधील सर्वाधिक प्रतिष्ठेचा हा पुरस्कार सोहळा मानला जातो. पहिला ऑस्कर पुरस्कार सोहळा 1929 साली आयोजित करण्यात आला होता. तेव्हापासून ते आजपर्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणा-या या पुरस्कार सोहळ्याची परंपरा सुरू आहे. ऑस्करच्या शर्यतीत ‘द शेप ऑफ वॉटर’ ही फिल्म अव्वल ठरली आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार द शेफ ऑफ वॉटरला मिळाला आहे. या फिल्मला सर्वाधिक 13 नामांकने मिळाली होती. त्या खालोखाल ‘मडबाऊंड’ला 5 विभागात तर ‘गेट आऊट’ला 4 नामांकने मिळाली. ओल्डमॅन बेस्ट अॅक्टर आणि फ्रांसेस मॅकडोरमंड बेस्ट अॅक्ट्रेस ठरले आहे. यंदा ऑस्कर सोहळ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर अभिनेत्री डेनियला वेगा हिच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला.
- सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता पुरस्कार सॅम रॉकवेल याने जिंकला आहे. ‘थ्री बिलबोर्ड्स आऊटसाइड इंबिंग’साठी त्याला हा पुरस्कार मिळाला आहे.
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार अॅलिसन जॉने हिने पटकावला आहे. आय, टॉन्या चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार मिळाला.
- सर्वोत्कृष्ट विदेशी भाषेतील चित्रपटाचा पुरस्कार चिली भाषेतील ‘अ फँटॅस्टिक वुमन’ चित्रपटाला मिळाला.
- सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन आणि सेट डेकोरेशनचा पुरस्कार ‘द शेप ऑफ वॉटर’ला मिळाला आहे.
- सर्वोत्कृष्ट ध्वनिमिश्रण आणि सर्वोत्कृष्ट ध्वनिसंकलन या दोन पुरस्कारांवर ‘डंकर्क’ चित्रपटाने आपले नाव कोरले आहे.
- सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा (डॉक्युमेंट्री फिचर) पुरस्कार ‘इकरस’ ला मिळाला आहे.
- सर्वोत्कृष्ट वेशभूषेसाठीचा पुरस्कार ‘फॅन्टम थ्रेड’ ला मिळाला आहे.
- सर्वोत्कृष्ट रंगभूषा, केशभूषा पुरस्कार ‘डार्केस्ट अवर’ला मिळाला आहे.
२) भारत 5-जी सुरू करणाऱ्या देशांत समाविष्ट होणार
भारत लवकरच ५ जी दूरसंचार सेवा सुरू करणाऱ्या पहिल्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसणार आहे. सरकार त्यासाठी स्पेक्ट्रमवर काम करत आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर मोबाईलवर प्रति सेकंद १ हजार एमबी या वेगाने सुविधा मिळणार आहे, अशी माहिती दूरसंचारच्या सचिव अरूणा सुंदरराजन यांनी मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये दिली. ५ जीसाठी ३ हजार ५०० मेगाहर्ट्ज व २६ गीगाहर्ट्ज बँडच्या स्पेक्ट्रमवर काम केले जात आहे. आता ४ जी सेवा २ हजार ६०० मेगाहर्ट्जहून कमी फ्रिक्वेन्सी बँडने दिली जाते. फ्रिक्वेन्सी बँड वाढल्यामुळे सिग्नलचे कव्हरेज क्षेत्र आणखी कमी होते. परंतु नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने डेटा ट्रान्समिशनचा वेग वाढवता येणार आहे. सरकारने २०१६ मध्ये ७०० मेगाहर्ट्ज बँडचा लिलाव केला होता. त्याचा वापरही ५ जी सेवेसाठी केला जाऊ शकतो. वास्तविक त्याची किंमत जास्त आहे. त्यामुळे कंपनीने बोली लावली नव्हती.दूरसंचार कंपन्या ऑटोमेटेड कार, रोबोटिक शस्त्रक्रिया, शिक्षणासारख्या क्षेत्रात ५ जी तंत्रज्ञानाचा प्रायोगिक वापर करून पाहू लागल्या आहेत.
३) शहजार रिझवी पदार्पणात विक्रमासह ठरला वर्ल्ड चॅम्पियन
अायएसएसएफच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या युवा नेमबाज रिझवीने २४३.३ गुण मिळवून सुवर्णपदक पटकावले. त्याने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये हे एेतिहासिक यश संपादन केले. या गटात भारताच्या जितू राॅयला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. रिझवीने फायनलमध्ये जर्मनीच्या क्रिस्टियन रिट्जला पिछाडीवर टाकून अव्वल स्थान गाठले. त तसेच या गटात भारताच्या अाेमप्रकाशने चाैथे स्थान गाठले. रविवारपासून मेक्सिकाेत अायएसएसएफच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेेला सुरुवात झाली.
४) राष्ट्रपतींच्या गाड्यांनाही आता लागेल नंबर प्लेट
राष्ट्रपती व उपराष्ट्रपती, तसेच राज्यांचे राज्यपाल आणि उपराज्यपाल या देशातील सर्वोच्च घटनात्मक पदांवरील व्यक्तींप्रमाणेच परदेशी राष्ट्रप्रमुखांच्या भारत भेटीच्या वेळी वापरल्या जाणाºया मोटारींचीेही ‘आरटीओ’कडे नोंदणी करून, या मोटारींवर ‘नंबर प्लेट’ लावली जाणार आहे. यामुळे शासक आणि जनता असा भेदभाव न राहता मोटार वाहन कायद्याची सर्वांसाठी समान अंमलबजावणी होईल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिल्ली उच्च न्यायालयात एका जनहित याचिकेच्या सुनावणीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली आहे. परदेशी राष्ट्रप्रमुखांच्या भारत भेटीच्या वेळी वापरल्या जाणाºया १४ मोटारींची नोंदणी करण्याचे काम सुरू आहे.
स्वातंत्र्यानंतर काही काळ या अतिविशिष्ठ व्यक्तींच्या मोटारींवर अन्य वाहनांप्रमाणेच ‘आरटीओ’च्या नोंदणी क्रमांकाची ‘नंबर प्लेट’ लावली जायची. मात्र कालांतराने ‘नंबर प्लेट’ ऐवजी त्या जागी फक्त सिंहांची ४ तोंडे असलेले भारताचे सोनेरी राजचिन्ह लावण्याची प्रथा सुरू केली गेली. ‘न्यायभूमी’ या स्वयंसेवी संस्थेने याविरुद्ध जनहित याचिका केली आहे. अशा मोटारींवर ‘नंबर प्लेट’ न लावणे हे मोटार वाहन कायद्याचे उघड उल्लंघन आहे. कारण कायद्यात अशा मोेटारींना नोंदणी न करण्याची व ‘नंबर प्लेट’ न लावण्याची कोणतीही सूट दिलेली नाही. शिवाय यावरून या पदांवरील व्यक्ती या लोकसेवक नव्हे, तर शासक असल्याची भावना यातून दिसून येते, तसेच राजचिन्ह लावल्याने अशा मोटारी दहशतवाद्यांचे सहज लक्ष्य ठरू शकतात.
5) ६४ कंपन्यांच्या मत्ता विक्रीस बंदी
नीरव मोदी, मेहूल चोक्सी सूत्रधार असलेल्या १२ हजार ७०० कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहार प्रकरणावरून बोध घेत राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने (एनसीएलटी) ६४ कंपन्या व व्यक्तींना त्यांच्या मत्ता (अॅसेट्स) विकण्यापासून मज्जाव केला आहे. यामध्ये नीरव मोदी, मेहूल चोक्सी यांच्यासह काही व्यक्ती, कंपन्या, लिमिटेड लाएबिलिटी कंपन्या (एलएलपी) यांचा समावेश आहे. केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने कंपनी कायदा कलम २२१ व २२२ अन्वये लवादाकडे याचिकाही दाखल केली आहे. चौकशी सुरू असलेल्या व्यक्ती व कंपन्या यांची मत्ता गोठवणे आणि या मत्तांच्या विक्रीवर प्रतिबंध घालण्यासाठी ही दोन्ही कलमे वापरली जातात. याद्वारे मत्ताविक्रीबंदी केलेल्यांमध्ये गीतांजली जेम्स, गिली इंडिया, नक्षत्र ब्रँड्स व फायरस्टार डायमंड या कंपन्यांचा समावेश आहे.
MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.