⁠  ⁠

Current Affairs – 5 October 2018

Rajat Bhole
By Rajat Bhole 3 Min Read
3 Min Read

 

S-400 सिस्टिममुळे भारत होणार ‘पॉवरफुल

  • एस-४०० ही जगातील सर्वात अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टिम आहे. शत्रूचे कुठल्याही प्रकारचे हवाई हल्ले निष्प्रभ करण्याची क्षमता या तंत्रज्ञानामध्ये आहे. युद्धाच्या प्रसंगात ही सिस्टिम भारतासाठी हवाई सुरक्षा कवचाचे काम करेल. शत्रूची शक्तिशाली बॅलेस्टिक मिसाइल, फायटर विमाने हवेतच नष्ट करण्याची क्षमता या सिस्टिममध्ये आहे. रशियाने विकसित केलेल्या एस-४०० ट्रायम्फ मिसाइल सिस्टिमला नाटोने एसए-२१ ग्रोलर असे नाव दिले आहे.
  • जमिनीवरुन हवेत मारा करणारी लांब पल्ल्याची ही जगातील सर्वात धोकादायक मिसाइल सिस्टिम आहे. अमेरिकेने विकसित केलेल्या टर्मिनल हाय अॅल्टिट्यूड एरिया डिफेन्स सिस्टिमपेक्षा एस-४०० जास्त परिणामकारक आहे.
    एस-४०० बहुउद्देशीय रडार, स्वयंचलित शोध यंत्रणा, विमान विरोधी क्षेपणास्त्र, लाँचर्स तसेच कमांड कंट्रोल सेंटरने सुसज्ज सिस्टिम आहे. युद्धाच्या प्रसंगात ही सिस्टिम फक्त पाच मिनिटात तैनात करता येईल. तीन वेगवेळया प्रकारची मिसाइल डागण्याची क्षमता एस-४०० मध्ये आहे.
  • ४०० किलोमीटरच्या रेंजमधील सर्व प्रकारच्या टार्गेटसना भेदण्याची क्षमता या सिस्टिममध्ये आहे. एस-४०० फायटर तसेच टेहळणी विमाने, बॅलेस्टिक आणि क्रूझ मिसाइलचा लक्ष्यभेद करु शकते. ही सिस्टम एकाचवेळी १०० लक्ष्यांचा माग काढू शकते. अमेरिकेचे रडारला न सापडणारे एफ-३५ हे अत्याधुनिक फायटर विमानही या सिस्टिमच्या नजरेतून सुटू शकत नाही.
  • २००७ सालापासून रशियाने एस-४०० चा वापर सुरु केला. मॉस्कोच्या सुरक्षेसाठी ही सिस्टिम तैनात आहे. २०१५ साली रशियन नौदल आणि फायटर विमानांच्या सुरक्षेसाठी सीरियामध्ये ही सिस्टिम तैनात करण्यात आली.

 

september mpsc ebook

 

देशभरात पेट्रोल आणि डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त

  • इंधनावरील एक्साइज ड्युटी केंद्र सरकारकडून १ रुपया ५० पैसे कमी करण्यात आली आहे, तर ओएमसी अर्थात तेल कंपन्यांकडून १ रुपया कपात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशभरातील ग्राहकांना पेट्रोल प्रति लिटर अडीच रुपयांनी स्वस्त मिळणार, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिली. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आम्ही तातडीने या निर्णयाची अंमलबजावणी करतो आहोत असेही जेटली यांनी स्पष्ट केले.
  • या निर्णयामुळे केंद्र सरकारला उत्पादन शुल्कात १० हजार ५०० कोटींचा तोटा होणार असल्याचेही जेटली यांनी यावेळी जाहीर केले.

telegram ad 728ICICI बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचा राजीनामा

  • आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चंदा कोचर सध्या सुट्टीवर आहेत. त्यांच्या विरोधात व्हिडीओकॉनला दिलेल्या कर्ज प्रकरणात चौकशी सुरु आहे. अशात आता त्यांच्या राजीनाम्याचे वृत्त समोर आले असून त्यांच्या जागी संदीप बक्षी हे आता आयसीआयसीआय बँकेचे MD आणि CEO असतील. या दोन्ही पदांचा राजीनामा चंदा कोचर यांनी दिला आहे. संदीप बक्षी यांना पाच वर्षांसाठी हे पद देण्यात आले आहे.
  • व्हिडीओकॉन समूह तसेच नूपॉवर कंपनीला २०१२ मध्ये ICICI बँकेने ३, २५० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर हे नूपॉवरचे अध्यक्ष आहेत. या कंपनीत व्हिडीओकॉन समूहाची ६४ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. पतीशी संबंधित कंपनीला कर्ज वितरणात प्राधान्य दिल्याचा आरोप चंदा कोचर यांच्यावर आहे.

add header new

नियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC

टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा – Mission MPSC Telegram Channel

Share This Article