---Advertisement---

चालू घडामोडी : ६ नोव्हेंबर २०१९

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Current Affairs 6 November 2019

आगामी वर्षात अर्थव्यवस्थेला उभारी

71926610

जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आलेली मरगळ आणि अर्थव्यवस्थेमध्ये बराच काळ सुरू असलेली अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आगामी वर्षाकडे सर्व स्थानिक कंपन्या अत्यंत आशावादाने पाहात आहेत. येत्या वर्षात उद्योग भरारी घेतील आणि अर्थव्यवस्था सुधारेल, याबाबत उद्योजक आशावादी आहेत, असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.

‘एचएसबीसी’ने या संदर्भात मंगळवारी अहवाल प्रकाशित केला. नव्या बाजारपेठेकडे कंपन्या उत्साहाने पाहत असल्याचे अहवालात म्हटले आहे. याखेरीज अहवालात म्हटले आहे, ‘नवी उत्पादने आणि सेवेसाठी उच्च दर्जाचा पुरवठा आणि तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्याची योजना आणि एकूणच बाजारपेठेकडे पाहण्याचा दृष्टीकोन कंपन्यांचा आशावादी आहे. सर्व्हेमध्ये ९६ टक्के कंपन्यांनी पुढील वर्षी उद्योग भरारी घेतील, असे मत व्यक्त केले आहे.’ जगभरातील ३५ बाजारपेठांमधील ९१०० कंपन्या आणि उद्योजकांचा या सर्व्हेमध्ये समावेश करण्यात आला आहे. यापैकी आशिया खंडातील १२ बाजारपेठांमधील ३२०० उद्योगांचा समावेश आहे. देशामधील कंपन्यांनीही येत्या पाच वर्षात विक्रीमध्ये १५ टक्के वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. निर्यातीमध्ये वाढही कंपन्यांनी दर्शवली आहे. ९८ टक्के कंपन्यांनी विदेशातील कंपन्यांशी आपला व्यवहार वाढेल, अशी आशा व्यक्त केली आहे.

पॅरिस करारातून अमेरिकेची माघार

Donald Trump

पॅरिस हवामान करारातून अमेरिका माघार घेत असल्याची अधिकृत सूचना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांना दिली आहे. या करारातून माघार घेत असल्याचे त्यांनी पूर्वीच जाहीर केले असले तरी त्यावर अखेर सोमवारी शिक्कामोर्तब करण्यात आले.
या करारातून माघार घेण्याची घोषणा ट्रम्प यांनी जून २०१७ मध्येत केली होती पण त्याची प्रक्रिया सोमवारी संयुक्त राष्ट्रांना अधिकृत सूचना देऊ न सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता अमेरिका नोव्हेंबर २०२० मध्ये या करारातून मुक्त होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पियो यांनी सांगितले की, अमेरिकेने पॅरिस हवामान करारातून माघार घेण्याची प्रक्रिया सोमवारी सुरू केली आहे. या करारातील अटीनुसार अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांना या करारातून बाहेर पडत असल्याची सूचना पाठवली आहे. त्यानंतर एक वर्षांने अमेरिका या करारातून संपूर्णपणे बाहेर पडेल. न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणिसांना करारातून माघार घेत असल्याबाबत पहिली सूचना ४ नोव्हेंबर २०१९ रोजी दिली होती. पॅरिस करार १२ डिसेंबर २०१५ रोजी झाला होता. त्यावर अमेरिकेने २२ एप्रिल २०१६ रोजी स्वाक्षरी केली होती व ३ सप्टेंबर २०१६ रोजी कराराचे पालन करण्यास अनुमति दिली होती. करारातून माघार घेण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयावर डेमोक्रॅटिक पक्षाने टीका केली आहे. फ्रोन्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रान यांनी यांनी सांगितले की, अमेरिकेचा हा निर्णय दुर्दैवी आहे.

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त डॉ. आनंदप्रकाश दीक्षितांचे निधन

साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ हिंदी साहित्यिक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी हिंदी विभागप्रमुख डॉ. आनंदप्रकाश दीक्षित यांचे (९४) दीर्घ आजाराने मंगळवारी निधन झाले.
एका पुस्तकाचे लेखन त्यांनी सुरू केले होते. या पुस्तकाचे लवकर प्रकाशन व्हावे, ही त्यांची इच्छा होती. मात्र, प्रकृती साथ देत नसल्यामुळे मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. हिंदी आणि संस्कृत या विषयांमध्ये एम. ए. पदवी प्राप्त केलेल्या दीक्षित यांर्नी हिंदी भाषेमध्ये प्रबंध सादर करून पीएचडी संपादन केली.
साहित्यशास्त्र, सौंदर्यशास्त्र, काव्य या विषयांमध्ये त्यांना रुची होती. हिंदी,मराठी, इंग्रजी, बंगाली, गुजरातीमधील काव्य हे त्यांच्या अभ्यासाचे विषय होते. ‘रससिद्धांत स्वरूप विश्लेषण’, ‘त्रेता : एक अंतर्यात्रा’, हिंदी रीति-परम्परा विस्मृत संदर्भ’ ही त्यांची पुस्तके हिंदी साहित्यामध्ये महत्त्वाची मानली जातात.

४ जी इंटरनेटच्या वेगात भारत पिछाडीवर

Related image

भारतात माेबाइल फाेन वापरणाऱ्या लाेकांची संख्या शेजारच्या पाकिस्तान, नेपाळ अाणि श्रीलंकेतील एकूण माेबाइल युजर्सच्या तुलनेत कितीतरी जास्त अाहे, परंतु माेबाइल इंटरनेट वेगाच्या बाबतीत मात्र भारत या तीन देशांपेक्षा पिछाडीवर अाहे.
ब्राॅडबँड वेगाची चाचणी करणाऱ्या उकला कंपनीने याबाबतचा अहवाल प्रसिध्द केला अाहे. त्यानुसार सप्टेंबर २०१९ मध्ये भारत माेबाइल ब्राॅडबँड वेगाच्या बाबतीत १२८ व्या स्थानावर हाेता.
उकलाच्या जागतिक वेग चाचणी निर्देशांकामध्ये अांतरराष्ट्रीय स्तरावर सरासरी डाऊनलाेड वेग प्रती सेकंद २९.५ मेगाबिट असल्याचे दिसून अाले. तर अपलाेड स्पीड ११.३४ एमबीपीएस हाेता. जागतिक यादीत माेबाइल नेटवर्कवर दक्षिण काेरियाने ९५.११ एमबीपीएस डाऊनलाेड स्पीड अाणि १७.५५ एमबीपीएस अपलाेड स्पीड नाेंद करीत पहिले स्थान पटकावले. फिक्स्ड लाइन ब्राॅडबँड स्पीडमध्ये भारत सप्टेंबरमध्ये अापल्या दक्षिण अाशियातील शेजारी देशांच्या तुलनेत पुढे ७२ व्या स्थानावर हाेता, असे प्रसिध्द करण्यात अालेल्या अहवालामध्ये नमूद करण्यात अाले अाहे.
भारतात डाऊनलाेड स्पीड ११.१८ एमबीपीएस अाणि अपलाेड स्पीड ४.३८ एमबीपीएस नाेंद झाली. २०१९ च्या दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीत भारताच्या ११ माेठ्या शहरांमध्ये एअरटेल सगळ्यात वेगवान माेबाइल अाॅपरेटर ठरला. पाकिस्तानमध्ये १४.३८ एमबीपीएसचा डाऊनलाेड स्पीड अाणि १०.३२ एमबीपीएस अपलाेड स्पीडसह ११२ व्या स्थानावर अाहे. २०१९ च्या दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीत भारत डाऊनलाेड स्पीडमध्ये पिछाडीवर राहिला, परंतु देशात ४ जी नेटवर्क उपलब्धतेत भारताची स्थिती चांगली हाेती. भारतात ४ जी नेटवर्क उपलब्धता ८७.९ % हाेती. तेच पाकिस्तान व बांगलादेशात ४ जी नेटवर्कची उपलब्धता क्रमश: ५८.९ % व ५८.७ % हाेती.

नेमबाजपटू दिपक कुमार टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र

Deepak Kumar

दोहा शहरात सुरु असलेल्या १४ व्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या दिपक कुमारने कांस्यपदकाची कमाई केली आहे. या कामगिरीसह दिपकने टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा दिपक दहावा भारतीय नेमबाजपटू ठरला आहे.
पात्रता फेरीत २२७.८ गुणांची कमाई करत दिपकने अंतिम ८ जणांमध्ये प्रवेश मिळवला. यानंतर पदकांच्या शर्यतीत ६२६.८ गुणांची कमाई करत दिपकने कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं. २०१८ साली झालेल्या नेमबाजी विश्वचषकात दिपकने कांस्यपदकाची कमाई केली होती.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now