महाराष्ट्र
लातूरकरांना पाणी पुरवणाऱ्या ‘जलदूत’ची उद्या अंतिम खेप
# तहानलेल्या लातूरकरांची तहान भागविण्यासाठी गेले साडेतीन महिने कृष्णेचे पाणी घेऊन जाणारी जलदूत एक्स्प्रेस सोमवारी (८ ऑगस्ट) अंतिम खेप करून विश्रांती घेणार आहे. मिरजेतून लातूरला रेल्वेच्या २५ वाघिणीतून दररोज २५ लाख लिटर पिण्याचे पाणी देण्याचा उपक्रम पहिल्यांदाच हाती घेण्यात आला होता. लातूरला समाधानकारक पाणी साठा झाल्याने जलदूत थांबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य गावांना गेल्या वर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. लातूरला पाणी पुरवठा करण्यासाठी जवळ पाण्याचा उद्भवच उपलब्ध नव्हता. यामुळे ३४८ किलोमीटर अंतरावरील मिरज स्थानकावरून कृष्णा नदीतील पाणी पुरवठा रेल्वेने करण्याचा पर्याय पुढे आला. युध्द पातळीवर मूलभूत सुविधा उपलब्ध करून प्रशासनाने रेल्वेने पाणी पुरवठा करण्याचा प्रयोग यशस्वी केला.
चंद्रपूर जिल्ह्य़ात उद्यापासून ‘से नो टू’ मोहीम
# अवैध दारूविक्री, अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार, तसेच आता शाळकरी व महाविद्यालयीन तरुणाई अंमली पदार्थांच्या आहारी जात असल्याचे भयावह वास्तव समोर आल्यानंतर त्यांना हा मार्ग कसा वाईट आहे, हे समजावून सांगण्यासाठी सोमवारपासून जिल्हा पोलिस दलाच्या वतीने ‘से नो टू’ ही प्रबोधन मोहीम राबविण्यात येणार आहे. या जिल्ह्य़ातील संपूर्ण दारूबंदीमुळे महिलांवरील अत्याचार कमी झाले, तसेच अनेक व्यसनमुक्त झाले, ही वस्तुस्थिती आहे. तसेच बंदीमुळे अवैध दारू विक्रीसोबतच ब्राऊन शुगर, चरस, गांजा, अफीम या अंमली पदार्थांची तस्करी वाढली असून शाळा-महाविद्यालयीन तरुणाई
क्रीडा
भारतीय महिला तिरंदाजांची कोलंबियावर सरशी
# ऑलिम्पिक खेळांमध्ये भारतीय महिला गटाने तिरंदाजीमध्ये कोलंबियाच्या संघाला चौथ्या सेटमध्ये ५२-४४ अशी मात देत हा सामना जिंकला आहे. लक्ष्मीरानी माझी, दीपिका कुमारी आणि बोम्बायला देवी या त्रिकुटाने हे यश संपादन केले आहे.
ग्रेट ब्रिटनचा जलतरणपटू अॅडम पीटीचा नवा विश्वविक्रम
# रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सुप्रसिद्ध जलतरणपटू अॅडम पीटीने नवा इतिहास रचला आहे. ग्रेट ब्रिटनच्या या विक्रमवीर जलतरणपटूने रिओमध्ये स्वत:चाच जागतिक विक्रम मोडीत काढून नव्या विक्रमाची नोंद केली. अॅडम पीटीने पुरूषांच्या 100 मी ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात 57.55 सेकांदाची वेळ नोंदवून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. अॅडमने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये 57.98 सेकंदाची वेळ नोंदवला होती.