चालू घडामोडी – ८ एप्रिल २०१६
देश-विदेश
कर्नाटक भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी येडियुरप्पा
कर्नाटकमधील भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी शुक्रवारी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची नियुक्ती करण्यात आली. चौथ्यांदा येडियुरप्पा पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. Current Affairs 2016
एका वर्षात १६ वाघांचा मृत्यू!
मध्य प्रदेशात गेल्या वर्षभरात शिकार व इतर कारणांमुळे तब्बल १६ वाघांचा मृत्यु झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यांपैकी बहुसंख्य वाघांचा मृत्यु नैसर्गिकरित्या झाल्याचे मध्य प्रदेश वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले असले, तरी सरकारच्या अपयशामुळेच या वाघांचा मृत्यु झाल्याचा आरोप या क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या एका स्वयंसेवी संस्थेने केला आहे.Current Affairs for mpsc
पठाणकोटप्रकरणी भारतीय पथकाच्या दौऱ्यास पाकचा नकार
भारत आणि पाकिस्तानातली शांतता प्रक्रिया स्थगित झाली आहे, अशी घोषणा करीत पठाणकोट हल्ल्याच्या तपासासाठी भारतीय पथकाला पाकिस्तानात येऊ देण्यास पाकिस्तानने गुरुवारी नकार दिला. यामुळे भारत-पाकिस्तान संबंधांत तणाव निर्माण झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश धोरणालाही हादरा बसला आहे.Current Affairs in marathi
महाराष्ट्र
शनिचौथऱ्यावर आता महिलांनाही प्रवेश
शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाण्यापासून कोणालाही रोखणार नाही. सर्वांना प्रवेश देण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देवस्थानच्या विश्वस्तांनी घेतला आहे. या निर्णयाचे संपूर्ण राज्यात स्वागत करण्यात येत असून, यापुढे पुरुष किंवा महिला असा भेदाभेद न करता कोणलाही शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन अभिषेक करता येणार आहे. विश्वस्त समितीच्या अध्यक्ष अनिता शेटे आणि इतर सर्व विश्वस्तांनी एकमताने हा निर्णय घेतला.maharashtra Current Affairs
राज्यात लघु जलविद्युत क्षमतेत केवळ ६ मेगावॅटची वाढ
राज्यात लघु जलविद्युत प्रकल्प खासगीकरणाच्या माध्यमातून राबवण्याचे धोरण राबवताना अनेक वष्रे उलटली, तरी अजूनही या प्रकल्पांच्या उभारणीसाठी चालना मिळालेली नाही. राज्यात ७३३ मेगावॅट क्षमतेचे लहान जलविद्युत प्रकल्प सुरू करण्यास वाव असताना आतापर्यंत केवळ २८४.३० मेगाव्ॉट क्षमतेचे विद्युत प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. वर्षभरात या क्षमतेत केवळ ५.९० मेगाव्ॉटची वाढ झाल्याचे चित्र आहे.india Current Affairs
मार्डच्या डॉक्टरांचा उद्यापासून राज्यव्यापी संप
राज्यातील शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने (मार्ड) शुक्रवारपासून राज्यव्यापी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मागण्या पूर्ण न झाल्यामुळे संपावर जाण्याचा निर्णय मार्डच्या डॉक्टरांनी घेतला आहे. या संपामुळे शासकीय रुग्णालयातील सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
क्रीडा
ऑस्ट्रेलियाचा भारतावर दणदणीत विजय
ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाला सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पध्रेत गुरुवारी ऑस्ट्रेलियाने पराभवाचा दणका दिला. भारताच्या खिळखिळ्या बचावाचा फायदा उचलताना ऑस्ट्रेलियाने ५-१ असा दणदणीत विजय साजरा केला. आठ वेळा अझलन शाह चषक उंचावणाऱ्या ऑस्ट्रेलियाने गतवर्षी जेतेपदाच्या सामन्यात न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवाला मागे टाकून पुन्हा जेतेपदासाठी कंबर कसली आहे.
भारतीय संघाची दोन स्थानांची घसरण
आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेने (फिफा) गुरुवारी जाहीर केलेल्या क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघाची दोन स्थानांची घसरण झाली आहे. भारतीय संघ १४२ गुणांसह १६२व्या स्थानावर आहे. इराणने (४२) दोन स्थानांची झेप घेऊन आशियाई देशांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया (५०) आणि दक्षिण कोरिया (५६) या संघांचा क्रमांक येतो. अर्जेटिनाने बेल्जियमकडून अव्वल स्थान हिरावून घेतले आहे, तर विश्वविजेत्या जर्मनीची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. चिली आणि कोलंबिया अनुक्रमे तिसऱ्या व दुसऱ्या स्थानावर आहे.sportsCurrent Affairs
अर्थव्यवस्था
प्रमुख बॅंकांकडून व्याजदर कपात
रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात कपात केल्यानंतर आणि व्याजदरांबाबतच्या आकडेमोडीची नवीन यंत्रणा सुरू केल्यानंतर बॅंकांनी व्याजदर कपात सुरू केली आहे. स्टेट बॅंकेने आपले गृहकर्जांचे दर 0.10 टक्क्याने कमी करून 9.45 टक्क्यांपर्यंत आणले आहेत. महिला कर्जदार असल्यास हाच दर 9.40 टक्के इतका झाला आहे. नवीन दर एक एप्रिलपासून लागू झाले आहेत. बॅंकेने आपल्या वेबसाइटवर ही माहिती प्रसिद्ध केली आहे. आयसीआयसीआय बॅंकेचे गृहकर्जही स्टेट बॅंकेइतक्याच दराने उपलब्ध होणार आहे. मात्र, पाच कोटी रुपयांपुढील गृहकर्जासाठी 9.65 टक्के व्याजदर असेल.economics Current Affairs