संसदेचे हिवाळी अधिवेशन १५ डिसेंबर ते ५ जानेवारीदरम्यान होत आहे. मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज समितीची बैठक केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली व त्यात हिवाळी अधिवेशनाच्या तारखा निश्चित करण्यात आल्या. इंदिरा गांधी, पी. व्ही. नरसिंह राव व मनमोहन सिंग यांच्या काळात अधिवेशने लांबणीवर टाकली गेली होती. अधिवेशनाच्या तारखा या निवडणुकांच्या वेळीच येऊ नयेत यासाठी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने २०११ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन लांबणीवर टाकले होते, कारण त्या वेळी पाच राज्यांत निवडणुका होत्या. २००८ मध्येही पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका ऑक्टोबरमध्ये दोन टप्प्यांत घेतल्या होत्या.