दक्षिण आफ्रिकेच्या डेमी नेल पीटर्सने ‘मिस युनिव्हर्स २०१७’चा किताब जिंकला आहे. लास वेगासमध्ये झालेल्या सोहळ्यात तिला हा मुकूट मिळाला. जमैकाची डेविना बॅनेट आणि कोलंबियाची लौरा गोन्जालेज यांचे आव्हान तिच्यासमोर होते. या स्पर्धेत जगभरातील ९२ सौंदर्यवतींनी भाग घेतला होता. डेमी नेल पीटर्सला २०१६ ची मिस युनिव्हर्स फ्रान्सची आयरिस मिट्टीनेएर हिने प्रदान केला. याआधी १९७८ मध्ये दक्षिण आफ्रिकेने मिस युनिव्हर्स किताब जिंकला होता. डेमी नेल पीटर्स व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रातील पदवीधर आहे. यंदाच्या मिस युनिव्हर्स २०१७ साठी भारताच्या श्रध्दा शशीधरने प्रतिनिधीत्व केले होते. श्रद्धा ‘यामाहा फॅसिनो मिस दीवा २०१७’ची विजेती आहे.
---Advertisement---
LATEST Post
Published On:
Published On: