⁠  ⁠

10वी/पदवीधरांना केंद्र शासनाची नोकरीची संधी ; DRDO मध्ये जम्बो भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

DRDO Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, DRDO ने विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 मार्च 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 90
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) पदवीधर प्रशिक्षणार्थी: 15
2) तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार: 10
3) ट्रेड (ITI) शिकाऊ: 65
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर शिकाऊ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयातील पदवी असणे आवश्यक आहे. तर, तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ पदांसाठी अर्ज करणाऱ्यांकडे संबंधित विषयात डिप्लोमा असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, ट्रेड (ITI) शिकाऊ उमेदवारांसाठी संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

इतका पगार मिळेल:
पदवीधर प्रशिक्षणार्थी: रु. 9000
तंत्रज्ञ शिकाऊ: रु 8000
ट्रेड अप्रेंटिस: रु 7000
या पत्त्यावर अर्ज पाठवा :
DRDO च्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना त्यांचे अर्ज या पत्त्यावर सर्व आवश्यक कागदपत्रांसह पाठवावे लागतील-
पत्ता- Advanced Systems Laboratory (ASL) कांचनबाग, PO, हैदराबाद-500058

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.drdo.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article