⁠
Uncategorized

महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल २०१५-१६

वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवार, दिनांक १७ मार्च २०१६ रोजी विधानसभेला सादर केलेल्या राज्याच्या 2015-16 वर्षाच्या वार्षिक आर्थिक पाहणी अहवालामध्ये राज्याचा विकास दर देशात सर्वाधिक असा 8 टक्क्यांवर गेल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. जगात मंदीचे वातावरण असतांना आणि सततच्या दुष्काळामुळे कृषीक्षेत्राचे उत्पन्न मोठ्या प्रामात घटलेले असतांनाही हा दर वाढता राहिल्याबद्द्ल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले आहे. मागील तीन वर्षात राज्याचा विकास दर 6.6 वरून 5.6 पर्यंत खाली घसरलेला असतांना आता विकासदर वाढला आहे. देशात गुजराथ व बिहारचा विकासदर घसरलेला आहे तर देशाचा विकासदर 7.6 झालेला असताना राज्याचा दर वाढता राहिला आहे. जर पाऊस चांगला झाला असता तर कृषीचा विकास झाला असता आणि राज्याचा विकासदर 10 पर्यंत गेला असता असा अंदाज आर्थिक पाहणीने व्यक्त केला आहे. मॅन्फॅक्चरिंग म्हणजेच वस्तुनिर्माण क्षेत्राचा विकासदर गेली दोन वर्षे घसरून 4.6 वर आला होता तोही या वर्षात वाढून 6.2 वर गेला आहे. त्याच प्रामाणे सेवा क्षेत्राचा विकासाचा दरही 10 टक्केंवर गेला आहे. राज्याचे दरडोई उत्पन्न 2015-16 वर्षात 7.1 टक्केंनी वाढून एक लाख 34 हजार 81 रुपये झाले आहे असेही पाहणीने नोंदले आहे.economic survey of maharashtra 2015-16 in marathi

economic-survey-of-maharashtra-2015-16
Economic Survey of Maharashtra 2015-16

सुधीर मुनगंटीवार यंनी अहवाल मांडताना असे नमूद केले की ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा विकासाचा दर हा ग्रामीण भागात मागील वर्षाच्या 4.6 टक्केंवरून घसरून 2.6 ट्केक तर शहरी विभागात 3.7 टक्केंवरून घसरून 3.5 टक्केंवर खाली आला आहे. वित्तीय समावेशावर शासनाने भर दिल्यामुळे फेब्रुवारी 2016 पर्यंत प्रधानमंत्री जन धन योजने अंतर्गत 1.35 लाख नवीन बँक खाती उघडण्यात आली आहेत. विजेची स्थापित क्षमता 2014 अखेरीस 30917 मेगा वॅट इतकी होती ती वाढून डिसेंबर 2015 अखेरीस 32706 मेगा वॅट झाली आहे. रस्ते बांधणीतही राज्याने वेग घेतला असून रस्ते 13.5 टक्केंनी वाढून राज्यातील रस्त्यांची एकूण लांबी 99,368 किमोमीटर इतकी झाली आहे. economic survey of maharashtra 2015-16 in english

मागील काही वर्षांपासून सिंचन क्षमतेचे आकडे देताना किती हेक्टरचे सिंचन निर्माण झाले हे आकडे दिले जात नव्हते त्याच प्रमाणे यंदाच्या भाजपा शासनाच्या आर्थिक पाहणीतही तो आकडा उपलब्ध नाही. 2012-12 च्या आर्थिक पाहणीत सिंचन क्षमता 0.01 टक्के इतकीच वाढल्याची माहिती देण्यात आली होती. त्यावर विधीमंडळात मोठी चर्चा होऊन सत्तर हजार कोची रुपये सिंचनावर खर्च झाल्या नंतरही इतकेच अधिकचे सिंचन कसे निर्णाण झाले असा प्रश्न तयार झाला होता आणि त्यात संशयाची सुई तत्कालीन पाटबंधारे मंत्र्यांकडे गेली होती. त्या वर्षा पासून सिंचन क्षमता आर्थिक पाहणीत देणे बंदच झाले होते. तीच परंपरा यंदाही कामय राहिल्या बद्द्ल आश्चर्य व्यक्त होत आहे. यंदाचे पावसाचे मान बरेच कमी राहिल्यामुळे 28 जिल्हे व 254 तालुक्यात अपुरा पाऊस झाल्याची नोंद आर्थिक पाहणीने घेतली आहे. maharashtracha arthik pahani aahval 2015-16

Economic Survey of Maharashtra 2015-16 in Marathi
[gview file=”https://missionmpsc.com/wp-content/uploads/2016/03/economic-survey-of-maharashtra-2015-16-in-marathi.pdf”]

Economic Survey of Maharashtra 2015-16 in English
[gview file=”https://missionmpsc.com/wp-content/uploads/2016/03/economic-survey-of-maharashtra-2015-16-in-english.pdf”]

आर्थिक पाहणी अहवाल मराठीमध्ये डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

आर्थिक पाहणी अहवाल इंग्रजीमध्ये डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

मित्रांनो तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. अपडेट राहण्यासाठी लाईक करा – Mission MPSC

Related Articles

Back to top button