⁠  ⁠

ESIC मध्ये 3847 पदांची जम्बो भरती, 10वी ते पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने UDC, MTS, Steno पदांसाठी एकूण ३८४७ पदांसाठी मेगा भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ESIC च्या अधिकृत वेबसाइट esic.nic.in वर भेट देऊ शकतात, अधिसूचना डाउनलोड करू शकतात आणि अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया १५ जानेवारी २०२१ पासून सुरू होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 आहे.

एकूण जागा : ३८४७

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : 

1. अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) 1726 पदे
शैक्षणिक पात्रता :- i) उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा समकक्ष पदवी धारण केलेली असावी. ii) त्याला/तिला ऑफिस सुइट्स आणि डेटाबेसेसच्या वापरासह संगणकाचे कामकाजाचे ज्ञान असले पाहिजे.

2. स्टेनोग्राफरसाठी 163 पदे
शैक्षणिक पात्रता :- मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12वी उत्तीर्ण आणि संगणक टायपिंगचा वेग आवश्यक.

3. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 1930 पदे
शैक्षणिक पात्रता :- मान्यताप्राप्त मंडळाकडून 10वी उत्तीर्ण.

केवळ स्टेनो पदांसाठी कौशल्य चाचणी नियम:

शब्दलेखन: 10 मिनिटे @ 80 शब्द प्रति मिनिट.
ट्रान्सक्रिप्शन: 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी) (केवळ संगणकावर).

वयोमर्यादा :

– अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) आणि स्टेनोग्राफरसाठी वयोमर्यादा- किमान 18 वर्षे आणि कमाल 27 वर्षे.

– मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) साठी वयोमर्यादा – किमान 18 वर्षे आणि कमाल 25 वर्षे.

– राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.

अर्ज फी
SC, ST, PWD, विभागीय उमेदवार, महिला उमेदवार आणि माजी सैनिक उच्च विभाग लिपिक (UDC), लघुलेखक आणि मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) च्या विविध पदांसाठी भरतीसाठी. 250 अर्ज शुल्क भरावे लागेल. त्याच वेळी, इतर सर्व श्रेणींसाठी अर्ज शुल्क 500 रुपये आहे.

निवड प्रक्रिया:

प्रिलिम्स परीक्षा, मुख्य परीक्षा आणि संगणक कौशल्य चाचणीमधील कामगिरीच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. इतर कोणतीही माहिती उमेदवार जारी केलेल्या अधिसूचनेवरून तपासू शकतात. अधिसूचनेची थेट लिंक अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

पगार :

अप्पर डिव्हिजनल क्लार्क आणि स्टेनोग्राफर पदावर निवड होणाऱ्या उमेदवाराला 25 हजार 500 ते 81 हजार 110 रुपये वेतन सातव्या वेतन आयोगानुसार दिलं जाणार आहे. तर मल्टी टास्किंग स्टाफ पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला 18 हजारे ते 56 हजार 900 रुपये वेतन दिलं जाईल.

 महत्त्वाच्या तारखा

1. अर्ज प्रक्रियेची सुरुवातीची तारीख- 15 जानेवारी 2022
2. अर्ज प्रक्रिया शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2022

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ फेब्रुवारी २०२२

अधिकृत संकेतस्थळ : www.esic.nic.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्जासाठी : येथे क्लीक करा

Share This Article