‘फोर्ब्स इंडिया’ने सर्वाधिक कमाई करणाऱ्या १०० भारतीय सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. या यादीत यंदाही दबंग खान अर्थात सलमानने पहिलं स्थान कायम राखलं आहे.
यावर्षी सलमानने एकूण २३२.८३ कोटी रुपयांची कमाई केली असून श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीत तो पहिल्या स्थानावर आहे. तर शाहरुख खाननेही दुसऱ्या क्रमांकावरील स्थान अबाधित ठेवलं आहे. १७०.५० कोटी वार्षिक कमाईसह किंग खान दुसऱ्या स्थानी आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली या वर्षीही तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. १००.७२ कोटी रुपये इतकी कमाई कोहलीने या वर्षात केली. २०१६ प्रमाणेच यावर्षी पहिल्या तीन क्रमांकावरील सेलिब्रिटी आपापल्या स्थानी कायम असले तरी यंदा त्यांच्या कमाईत मात्र घट झाली आहे. २० टक्क्यांनी या कमाईत घट झाल्याची नोंद फोर्ब्सने केली आहे. या यादीत चौथ्या स्थानावर अक्षय कुमार, पाचव्या स्थानावर सचिन तेंडुलकर, सहाव्या स्थानी आमिर खान, प्रियांका चोप्रा सातव्या स्थानी, महेंद्रसिंह धोनी आठव्या स्थानी, हृतिक रोशन नवव्या आणि रणवीर सिंग दहाव्या स्थानी आहे.