वस्तू व सेवाकर (जीएसटी) ची २३ वी बैठक
च्युइंगपासून चॉकलेट, सौंदर्य उत्पादने, केसांचे टोप आणि मनगटी घड्याळे, फर्निचर, दुचाकी, तीनचाकी तसेच ट्रॅक्टरचे टायर्स अशा वस्तूंसह १७८ वस्तूंवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यामुळे या वस्तू आता स्वस्त होणार आहेत. केवळ ५० वस्तूंवरच आता २८ टक्के जीएसटी ठेवला असल्याचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत जीएसटीमध्ये केलेला हा सर्वांत मोठा बदल आहे.
गुवाहाटी येथे अरुण जेटली यांच्या नेतृत्वाखाली वस्तू व सेवाकर (जीएसटी) परिषदेच्या झालेल्या २३व्या बैठकीत सर्वोच्च २८ टक्क्यांच्या कर टप्प्यात येणाऱ्या २२८ पैकी १७८ वस्तूंवरील कराचे दर कमी करून १८ टक्क्यांवर आणणारा निर्णय घेण्यात आला. आता २८ टक्के जीएसटी लागू असलेल्या वस्तूंची संख्या केवळ ५० इतकी राहिली आहे. यापूर्वी गेल्या पाच महिन्यांत झालेल्या बैठकांतून जवळपास १०० वस्तूंच्या मूळ कर दरात फेरबदल परिषदेने केले आहेत
दैनंदिन वापरातील १७८ वस्तूंवरील कर २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे. एसी आणि नॉन-एसी अशा सर्व रेस्टॉरंटवर आता केवळ ५ टक्के कर लावण्यात आला आहे. सध्या नॉन-एसी रेस्टॉरंटच्या बिलावर १२ टक्के, तर एसी रेस्टॉरंटच्या बिलावर १८ टक्के कर होता. मात्र पंचातारांकित हॉटेलांमधील रेस्टॉरंटच्या दरात ही कपात नसेल.
रेस्टॉरंटवरील बिलावर आता इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) मिळणार नाही. प्रतिदिन ७,५00 रुपये खोली भाडे आकारणाऱ्या तारांकित हॉटेलांवर १८ टक्के जीएसटी लागेल. त्यांनाही आयटीसी सवलत मिळणार नाही. या हॉटेलांतील रेस्टॉरंटस्वरही ५ टक्के कर लागेल तसेच त्यांनाही आयटीसी सवलत मिळणार नाही.
अपडेट राहण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल – Mission MPSC
अनेक वस्तुंवरील जादा करामुळे ग्राहक तसेच व्यापारी, उद्योजक नाराज होते आणि त्यांनी त्यात कपात करण्याची मागणीही केली होती. आजच्या निर्णयानंतर २८ टक्के जीएसटी करकक्षेत आता फक्त ५० वस्तू व सेवा राहिल्या आहेत. आधी ही संख्या २२८ होती. आता केवळ लक्झरी आणि सिगारेट व पानमसालासारख्या घातक वस्तूंवर २८ टक्के जीएसटी लागेल. वेट ग्राइंडर्स, कंडेन्स्ड मिल्क, रिफाइन्ड शुगर, पास्ता करी पेस्ट, डायबेटिक फूड, मेडिकल ग्रेड आॅक्सिजन, छपाईची शाई, हँड बॅग, टोप्या, चष्म्यांच्या फ्रेम, बांबूपासून तयार केलेले फर्निचर तसेच चिलखती वाहनांवरील कर १२ टक्के करण्यात आला आहे.
या वस्तूंवर राहणार २८ टक्के कर
पानमसाला, एअरेटेड वॉटर, ब्रुवेज, सिगार व सिगारेट, सर्व तंबाखू उत्पादने, सिमेंट, पेंट, सुगंधी द्रव्ये (परफ्यूम), एसी, डिश वॉशिंग मशीन, वॉशिंग मशीन, रेफ्रिजेटर, व्हॅक्यूम क्लिनर, कार, दुचाकी वाहने, विमाने आणि यॉट इत्यादी.
२८ टक्क्यांवरून १८ टक्के
च्युइंगगम, चॉकलेट, कॉफी, कस्टर्ड पावडर, संगमरवर व ग्रॅनाइट, दंत आरोग्य उत्पादने, पॉलिश व क्रीम, स्वच्छता परिधान (सॅनिटरी वेअर), चामडी कपडे, कृत्रिम फर, केसांचे टोप, कूकर, स्टोव्ह, आफ्टर शेव्ह, डिओड्रंट, डिटर्जंट, वॉशिंग पावडर, रेझर, ब्लेड, कटलरी, स्टोअरेज वॉटर हिटर, बॅटºया, गॉगल, प्लायवूड, मनगटी घड्याळे, चटया.