⁠  ⁠

MPSC च्या संकेतस्थळावरील चुकीची माहिती कशी बदलावी?

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 2 Min Read
2 Min Read

MPSC च्या संकेतस्थळावरील नोंदणी करतांना काही माहिती अनवधानाने चुकीची भरली गेली. परंतु तिथ एडीटचा ऑप्शन नसल्याने चुकीने भरलेली माहिती पुन्हा कशी अपडेट करावी?

मित्रांनो, बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम आलेला आहे. प्रोफाईल मधील बरीचशी माहिती बदलता येत नाही. पण जर का चुकीने काही माहिती भरल्या गेली असेल तर काय करावे हा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव हा विशेष लेख.

व्यवस्थित अर्ज कसा भरावा याविषयी अधिक माहितीसाठी यापूर्वीच आम्ही लिहलेला ‘एमपीएससीच्या नवीन संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज कसा करावा ?‘ हा लेख जरूर वाचा. तरीही अनवधानाने चुकीची काही माहिती भरली गेल्यास दुसऱ्यांदा रजिस्ट्रेशन करू नका. दोन वेगळ्या वेगळ्या प्रोफाईल्समुळे तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो.

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Mission MPSC

चुकीची माहिती तुम्ही रजिस्टर केलेल्या ई-मेल आयडीद्वारा [email protected] यावर पाठवावी अथवा http://suvidha.mahaonline.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन ‘Register Complaint‘ या टॅबवर क्लिक करावे.

Service Type मध्ये MPSC सिलेक्ट करून तुमची समस्या नोंदवावी. एमपीएससी तुमच्या विनंतीवर विचार करेल आणि जर त्यांना योग्य वाटलं तर ते तुम्हाला इमेलद्वारे परमिशन देतील तेव्हाच तुम्ही त्या माहितीत बदल करू शकाल.

जर समजा एखाद्या परीक्षेसाठी अर्ज उपलोड केला असेल तर मात्र माहिती बदलली कि मग पुन्हा एकदा अर्ज करावा लागेल आणि पुन्हा एकदा फी भरावी लागेल. काळजी करू नका जर दोन अर्ज त्यांना मिळाले तर लेटेस्ट अर्जच (शेवटी केलेला) विचारात घेतला जाईल.

ई-मेलद्वारा काही समस्या येत असल्यास सोमवार ते शुक्रवार स. 9.00 ते रात्री 8.00 , शनिवार व रविवार स. 9:30 ते रात्री 6.30 यावेळेत 022-61316402 या क्रमांकावर संपर्क साधावा.

यानंतरही काही समस्या अथवा सूचना असल्यास कॉमेंटमध्ये तुमची समस्या नोंदवावी.  लेख उपयोगी वाटल्यास जरूर शेअर करा.

MPSC, PSI STI, Police Bharti, SSC, UPSC, Banking यासारख्या सर्व स्पर्धा परीक्षांविषयी नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.

Share This Article