⁠  ⁠

नोट्स कशा काढाव्यात?

Mission MPSC
By Mission MPSC 5 Min Read
5 Min Read

वाचलेला घटक विषय व्यवस्थित समजून घेऊन स्वत:च्या शब्दांत थोडक्यात मांडून घेणे नोट्समध्ये अपेक्षित असते. अशा नोट्स स्वत:च्या भाषेत काढलेल्या असल्याने उजळणी करताना एक कंफर्ट झोन तयार होतो आणि जास्त आत्मविश्वासाने चिंतन हाऊ शकते. नोट्स कशा काढाव्यात, याचा एकच एक असा मॅजिक फॉर्म्युला नाही. प्रत्येकाच्या स्टाईलप्रमाणे नोट्स वेगवेगळ्या असू शकतात. बेसिक गोष्टी मात्र लक्षात हव्यात. एकाने काढलेल्या नोट्स दुसऱ्याला समजतीलच असेल नाही. यामुळे परिसरात कोणी एखादी परीक्षा पास झाल्यावर त्याचे घरी नोट्ससाठी चकरा मारू नये. How to Make Good Revision Notes for MPSC

How to Make-Good-Revision-Notes-for-mpsc

केलेल्या अभ्यासातील महत्त्वाचे मुद्दे, संकल्पना परीक्षेच्या शेवटच्या क्षणी वाचता याव्यात म्हणून शॉर्ट टिपण/नोट्स काढाव्यात. या नोट्समध्येच मग इतरत्रच्या वाचनातील, चर्चा-चिंतनातील नवे मुद्दे नोंदवून ठेवले की, उजळणी करतांना फक्त याच मटेरियलवर अभ्यास पूर्ण होऊ शकतो. यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससी देखील अधिकाधिक इंटर डिसिप्लिनरी होत चालली आहे. त्यामुळे एखाद्या घटकाचा अभ्यास करताना त्यांच्याशी संबंधित दुसऱ्या घटक विषयाच्या काही मुद्द्यांचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. उदा. अर्थशास्त्राच्या अभ्यासात उद्योग व लोकसंख्येच्या भौगोलिक वितरणाचा अभ्यास किंवा ऊर्जासुरक्षिततेबाबत अभ्यास करताना विज्ञान तंत्रज्ञानाबरोबरच भारताच्या परराष्ट्र धोरणाचाही विचार करावा लागतो. अशावेळी क्विक रेफरन्स म्हणून सगळ्या संबंधित घटकांविषयांच्या बेसिक नोट्स उपयोगी पडणार आहेत. how to make notes for revision

नोट्सची तुमची स्वतःची पद्धत असेल तरी खालील काही बेसिक गोष्टी जरूर विचारात घ्या

  • जे काही तुम्ही वाचले आहे, त्याची मुख्य संकल्पना, थीम काय आहे? हे समजावून घ्या.
  • मुख्य संकल्पनेशी वाचनातले मुद्दे कसे निगडित आहेत, त्याचे विश्लेषण करा.
  • या मुद्द्यांचे वर्गीकरण करणे शक्य आहे का? ते पाहून तसे वर्गीकरण करून घ्या.
  • विश्लेषण आणि वर्गीकरणाच्या आधाराने मुख्य संकल्पना, मुद्दे नोंदवत जाऊन तुमच्या नोट्स तयार होतील.
  • नोट्स काढतांना २-३ वेगळ्या वेगळ्या रंगांच्या पेनाचा वापर केल्यास अतिमहत्त्वाचे मुद्दे हाईलाईट्स करता येतात.
  • पहिल्या संदर्भ साहित्यातील या नोट्सच्या आधारावर दुसऱ्या संदर्भ साहित्याचे वाचन करायचे. या वाचनातून फक्त जास्तीचे मुद्देच रिपीट करणे शिल्लक राहणार आहे.

नोट्स काढण्याच्या या बेसिक अ‍ॅप्रोचनंतर काही महत्त्वाची पथ्ये पाळावी लागतील. जेणेकरून तुमच्या नोट्स तुमच्यासाठी कंप्लिट क्वीक रेफरन्सची भूमिका वठवू शकतील.

  • पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठीच्या नोट्स काढण्याचा अ‍ॅप्रोच वेगवेगळा असायला हवा. पूर्व परीक्षेत फॅक्ट्स आणि त्यांच्या विश्लेषणावर भर द्यायचा तर मुख्य परीक्षेसाठी बेसिक संकल्पना, त्यांचे विश्लेषण व त्या अनुषंगाने पूर्वच्या नोट्समधील गरजेच्या फॅक्ट्सचा समावेश नोट्समध्ये असायला हवा.
  • शक्य तितक्या कमी शब्दांत लेखन व्हायला हवे. पूर्ण वाक्य लिहीत बसायचे नाही. चिन्हे, चार्ट इत्यादींच्या वापरातून सुटसुटीतपणे, पण लगेच रिव्हाइज होतील अशा प्रकारे मुद्दे अ‍ॅरेंज करायचे.
  • नोट्समध्ये जास्त भारुडभारती नसावी अनावश्यक मुद्दे टाळावे. नोट्सचा मुख्य उद्देशच मुळात लेखन आणि वाचनात वेळेची बचत करणे हा आहे, हे नेहमी लक्षात ठेवा.
  • साधारणपणे वाचलेल्या १०० पानांच्या तुमच्या नोट्स १० पानांइतक्या असायला हव्यात. उजळणीदरम्यान पुन्हा मायक्रो नोट्स काढायची तुमची सवय असेल तर या मायक्रो नोट्स १-२ पानांपेक्षा जास्त असू नयेत.
  • पानांना व्यवस्थित क्रमांक देतच नोट्स लिहिल्या तर नंतर त्यांचा क्रम जुळवत बसण्याचा वेळखाऊ गोंधळ वाचतो.
  • नोट्स प्रत्येक पानावर चिंतनानंतर किंवा चर्चेनंतर तुम्हाला सुचलेले मुद्दे, मत मांडण्यासाठी थोडी जागा पहिल्यापासूनच मोकळी ठेवावी.
  • पूर्वसाठी नोट्स काढताना वेगवेगळ्या घटक विषयांची सरमिसळ करून नोट्स काढता आल्या तर जास्त चांगले. मुळात पूर्व परीक्षेच्या पेपरमध्ये एकाच घटकाचे प्रश्न संपवून पुढचा घटक अशी सरळसोट पद्धत नसते. त्यामुळे तथ्यांपुरत्यातच मर्यादित या नोट्समध्ये विषयांची सरमिसळ असेल तर परीक्षेचा माइंडसेट तयार व्हायला मदत होते.
  • नोट्स काढताना रंगीत पेन, स्केचपेन वापरता आला तर काही जणांना त्या लक्षात ठेवणे जास्त सोपे पडू शकते. महत्त्वाचे मुद्दे हायलाइट करण्यातूनही कमी वेळात नोट्सची उजळणी शक्य होते.
  • फ्लो चार्ट, टेबल, पाय चार्ट, आकृत्या अशा पॅटर्नसचा वापर करूनही नोट्स इंटरेस्टिंग आणि मितभाषी करता येतील.
  • रंगांचा आणि आकृत्यांचा वापर केलेल्या नोट्सचे वाचन आणि उजळणी करताना फोटोग्राफिक मेमरीचा वापर होत असतो. त्यामुळे त्या जास्त लक्षात राहतात.
  • मायक्रो नोट्स काढतानाच मोठ्या अक्षरात व रंगीत पेनांनी/स्केचपेनने लिहिल्या तर भिंतीवर चिकटवून त्यांची येता-जाता उजळणी करता येईल. तुमच्या सगळ्या अभ्यासाचा अर्क असल्याने तेवढीच उजळणी आणि पाठांतर त्या घटक विषयासाठी पुरेसे ठरू शकते.

(मूळ लेख अतुल लांडे यांनी लिहला असून ‘दैनिक दिव्य मराठी‘ मधून साभार घेण्यात आला आहे.) how do you make good revision notes ?

खाली काही नोट्सचे नमुने देत आहे. तुम्ही त्या ‘अॅज इट इज’ कॉपी करू नये.  तुम्हाल आयडीया यावी म्हणून देत आहोत.

anilmd-notes-1-ketan-borkar
image source – anilmd.wordpress.com
anilmd-notes-2-ketan-borkar
image source – anilmd.wordpress.com
anilmd-notes-7-ketan-borkar
image source – anilmd.wordpress.com
anilmd-notes-6-ketan-borkar
image source – anilmd.wordpress.com
anilmd-notes-5-ketan-borkar
image source – anilmd.wordpress.com
anilmd-notes-4-ketan-borkar
image source – anilmd.wordpress.com
anilmd-notes-3-ketan-borkar
image source – anilmd.wordpress.com

const-rajat

hist-rajat

ncrt-eco-9th-rajat

ncrt-geog-9th-rajat

Image Source – AnilMD’s Blog

यानंतर हि तुमचे काही प्रश्न असल्यास कॉमेंट जरूर करा. लेख आवडल्यास शेअर करा. धन्यवाद….!

Share This Article