⁠  ⁠

विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 4 Min Read
4 Min Read

या लेखाद्वारे एमपीएससीतर्फे घेतल्या जाणाऱ्या विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेची माहिती आपण करून घेऊयात.

विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षेच्या अधिक माहितीसाठी यापूर्वी प्रसिद्ध केलेला पुढील लेख आवश्य वाचा [button color=”orange” link=”https://missionmpsc.com/information-about-sales-tax-inspector-examination-1/” align=”center” target=”_blank” radius=”10″ outer_border=”true” icon=”momizat-icon-attachment”]विक्रीकर निरीक्षक परीक्षेचे स्वरूप – १[/button]

पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक आणि मंत्रालय साहाय्यक पदांकरता परीक्षा स्वतंत्रपणे राबवल्या जातात. या परीक्षांचा पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम आणि मुख्य परीक्षेतील पेपर क्रमांक १ चा अभ्यासक्रम सारखाच आहे. परंतु मुख्य परीक्षेतील पेपर क्रमांक २ च्या अभ्यासक्रमाचा आकृतिबंध संबंधित पदाच्या जबाबदारीनुसार आणि कामाच्या स्वरूपानुसार वेगवेगळा आखलेला आढळून येतो. विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेतील पेपर क्रमांक २ मध्ये अर्थशास्त्र आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर विशेष भर दिल्याचे जाणवते.

मुख्य परीक्षा अभ्यासक्रमाचा आकृतिबंध आयोगाच्या संकेतस्थळावर मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम सविस्तर दिलेला आहे.

[button color=”orange” link=”https://missionmpsc.com/competitive-exams-and-social-media/” align=”center” target=”_blank” radius=”10″ outer_border=”true” icon=”momizat-icon-share”]स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयाचा वापर कसा करावा ?[/button]

पेपर क्रमांक १ : मराठी व इंग्रजी अभ्यासक्रम – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार, उताऱ्यावरील प्रश्न.

पेपर क्रमांक २ : सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी अभ्यासक्रम राष्ट्रीय तथा जागतिक चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, महाराष्ट्राचा भूगोल व आधुनिक इतिहास, भारतीय राज्यघटना, माहितीचा अधिकार अधिनियम-२००५, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान, नियोजन- पहिली ते दहावी पंचवार्षिक योजना, ७३वी आणि ७४वी घटनादुरुस्ती, शहरी आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास, आर्थिक सुधारणा व कायदे, एलपीजी धोरण, जागतिक व्यापार संघटना, मूल्यवर्धित करप्रणाली, वस्तू आणि सेवा कर, त्या अनुषंगाने होऊ घातलेले बदल, आंतरराष्ट्रीय व्यापार व भांडवल चळवळ, जागतिक व्यापार महासंघ, जागतिक बँक, पतमूल्यांकन संस्था आणि पद्धत, सार्वजनिक वित्त व्यवस्था- करप्रणाली, अर्थसंकल्प, तूट व तुटीचे प्रकार, राजकोषीय धोरण आणि सुधारणा, शून्याधारित अर्थसंकल्प व इतर संकल्पना इत्यादी घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

sales-tax-inspector-main-examination-1
विक्रीकर निरीक्षक मुख्य विश्लेषण

सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी या पेपरमध्ये १०० प्रश्न सोडवावे लागतात. त्यातील उपघटकांवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे विभाजन पुढीलप्रमाणे आहे-

विश्लेषणाची निकड २०१४ सालच्या विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेत बुद्धिमापन आणि अंकगणितावर आधारित १५ पकी १२ प्रश्न ताíकक क्षमतेवर आणि केवळ ३ प्रश्न अंकगणितावर विचारण्यात आले होते. अर्थशास्त्र आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर ८५ पकी तब्बल ४८ प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामुळे या विषयाचे महत्त्व इथे ठसठशीतपणे अधोरेखित होते.

[button color=”orange” link=”https://missionmpsc.com/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af/” align=”center” target=”_blank” radius=”10″ outer_border=”true” icon=”momizat-icon-file3″]स्पर्धा परीक्षांसाठी न्यूजपेपरमध्ये काय वाचावे आणि काय वाचू नये?[/button]

संदर्भ साहित्य सूची

मराठी आणि इंग्रजी : या विषयाची तयारी करताना माध्यमिक शालेय स्तरावरील व्याकरणाच्या पुस्तकांचा वापर करावा. आयोगाचे मागील वर्षांचे पेपर अभ्यासावे. इंग्रजी विषयाची तयारी करताना स्टाफ सिलेक्शन कमिशन-SSC परीक्षेचेमागील वर्षांचे पेपर अभ्यासल्यास नक्कीच फायदा होईल.

इतिहास : ‘एनसीइआरटी’चे सातवी ते बारावीच्या इतिहासाचे क्रमिक पुस्तक, राज्य मंडळाचे पाचवी, आठवी आणि अकरावीचे इतिहासाचे क्रमिक पुस्तक, इंडिया इयर बुकमधील संस्कृतीविषयक पाठ.

भूगोल : ‘एनसीइआरटी’चे सहावी ते बारावीचे भूगोलाचे क्रमिक पुस्तक‘, इंडिया इयर बुकमधील पाठ. नागरिकशास्त्र : ‘एनसीइआरटी’ची राज्यशास्त्र विषयाची पुस्तके.

आर्थिक व सामाजिक विकास : ‘एनसीइआरटी’चे अकरावी आणि बारावीची क्रमिक पुस्तके, भारताची व महाराष्ट्राची आíथक पाहणी, इंडिया इयर बुकमधील पाठ, वार्षकि अंदाजपत्रक.

अंकगणित-तर्कक्षमता आणि संगणक आणि माहिती तंत्रज्ञान : या विषयावरील प्रश्नांचा सराव करण्यासाठी बँक क्लार्क व परिविक्षाधीन अधिकारी किंवा स्टाफ सिलेक्शन बोर्डाच्या गतवर्षांच्या सोडवलेल्या प्रश्नासंचांचा वापर करता येईल.

माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ : प्रत्यक्ष अधिनियम, इंटरनेट आणि यशदाचे संकेतस्थळ इत्यादींचा वापर करायला हवा.

प्रश्नांची संख्या

sales-tax-inspector-main-examination-2
विक्रीकर निरीक्षक मुख्य विश्लेषण

अर्थशास्त्र आणि भारतीय अर्थव्यवस्था- ४८ प्रश्न.

चालू घडामोडी- ५ प्रश्न.

बुद्धिमत्ता चाचणी- १५ प्रश्न.

महाराष्ट्राचा भूगोल- ६ प्रश्न.

महाराष्ट्राचा आधुनिक इतिहास- ६ प्रश्न.

भारतीय राज्यघटना- ११ प्रश्न.

माहिती अधिकार अधिनियम २००५- ४ प्रश्न.

संगणक आणि माहिती तंत्रज्ञान- ८ प्रश्न.

नियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक

(हा लेख चंद्रशेखर बोर्डे सरांनी दैनिक लोकसत्ताच्या ‘करियर वृत्तांत‘ या सदरात लिहला असून तेथून साभार घेण्यात आला आहे.)

Share This Article