अधिकारी होण्यासाठी राहिली मुलापासून दूर; घराच्यांच्या पाठिंब्यामुळे अनुची IAS पदासाठी झेप !
UPSC Success Story : युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) परीक्षा उत्तीर्ण करणे आणि IAS किंवा IPS अधिकारी बनणे हे लाखो भारतीयांचे स्वप्न आहे. देशभरातील १० लाखांहून अधिक विद्यार्थी दरवर्षी या परीक्षेला बसतात . त्यातील काही विद्यार्थी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS अधिकारी बनतात. त्यापैकी एक IAS अधिकारी अनू कुमारी, वाचा तिच्या यशाची कहाणी….
अनू जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. तेव्हा ती एका लहान मुलाची आई देखील होती. संसारगाडा सांभाळत अभ्यासात मन लागत नसल्याने दोन वर्षं तयारीसाठी मुलापासून दूर राहिली. या निर्णयाला घरच्यांनी देखील पाठिंबा दिला.
आयएएस अधिकारी अनू कुमारी मूळच्या हरियाणातील सोनीपत येथील आहेत. तिने दिल्ली विद्यापीठातून भौतिकशास्त्रात बीएससी (ऑनर्स) पदवी प्राप्त केली आहे आणि आयएमटी, नागपूर येथून एमबीए (फायनान्स आणि मार्केटिंग) केले आहे. सुरूवातीला आयएएस अधिकारी अनु कुमारी एका खाजगी कंपनीत काम करत होत्या. त्यांनख चांगला पगार मिळत देखील मिळत होता. जेव्हा तिने नोकरी सोडून आयएएस अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय आयुष्याला कलाटणी देणारा होता. तिची नोकरी चांगली होती, पण अंतर्गत समाधान मिळत नव्हते. म्हणूनच त्यांनी लग्नानंतर काही दिवसांनी तिने नोकरी सोडली आणि यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. अनेकांनी तिला यूपीएससीला बसण्याचा विचार सोडून देण्याचे सुचवले पण आयएएस अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न असल्याने त्याने कोणाचेही ऐकले नाही. त्या अभ्यास करत राहिल्या. पण पहिल्याच प्रयत्नात अपयशी ठरल्या, पण त्यांनी हार मानली नाही. दुसऱ्या प्रयत्नात, त्यांनी ऑल इंडिया रँक २ मिळवले आणि २०१७ मध्ये त्यांचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.