झोपडपट्टीतील कामाच्या अनुभवामुळे घेतला UPSC परीक्षेचा निर्णय; डॉ. प्रियांका शुक्ला बनली कलेक्टर !
UPSC Success Story : डॉ. प्रियांका शुक्ला हिला आधीपासूनच समाजकार्याची आवड होती. त्यामुळे तिने वैद्यकीय शिक्षण घ्यायचे ठरवले. एकेदिवशी एका झोपडपट्टीत वैद्यकीय कामासाठी झोपडपट्टीत गेले असताना आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग घडला. तिने एका महिलेला घाणरडे पाणी पित असताना पाहिलं. ती महिला तेच पाणी ती तिच्या मुलालाही पाजत होती.
तिने महिलेला दूषित पाणी आहे. बाळाला देऊ नकोस…बाळ आजारी पडेल असे सांगितले पण झोपडपट्टीतील त्या महिलेने डॉक्टरला प्रश्न केला की, तू काय कलेक्टर आहेस का,मी तुझं का ऐकू ? हे वाक्य तिला मनाला लागलं आणि तिने त्याचं वेळी ठरवले की आपण कलेक्टर बनवून दाखवायचे.
प्रियंकाच्या पालकांची देखील आधीपासून इच्छा होती की तिने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आयएएस व्हावे. परंतू तिला डॉक्टर व्हायचं होतं. ती मूळ उत्तर प्रदेशची असून प्रियांकाने किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएसचा अभ्यास केला. एमबीबीएसची पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी लखनौमध्ये सराव सुरू केला. पण, जीवनात घडलेला हा वरील प्रसंग प्रियांका यांचे जीवन बदलणारा ठरला. मनाशी ठाम निश्चय करून युपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. तिला पहिल्याच प्रयत्नात युपीएससीच्या परीक्षेत यश मिळाले नाही. पण २००९ मध्ये, तिने युपीएससीची (नागरी सेवा परीक्षा) उत्तीर्ण केली आणि प्रियांका (IAS) कलेक्टर बनली.
याशिवाय प्रियंका नृत्यांगना देखील आहेत. ती कविताही लिहिते. तिला गाण्याची आणि चित्रकलेचीही आवड आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते तिला दोनदा सन्मानित करण्यात आले आहे. तिला राष्ट्रपती पदक देखील मिळाले आहे. सध्या त्या छत्तीसगडमध्ये आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.