डॉक्टर ते आयएएस ; मुद्राचा प्रेरणादायी प्रवास वाचा…
IAS Success Story : अनेकांना आयएएस होण्याचं स्वप्न असतं. पण सगळ्यांचीच स्वप्न पूर्ण होतात असं नाही, काहींना लगेच यश मिळतं तर काहींना अनेक प्रयत्न करावे लागतात. डॉक्टर बनून आयएएस अधिकारी बनणारी मुद्रा गायरो ही सगळ्यांसाठी आदर्श आहे.
मुद्राचे वडील अरुण गायरोला यांना स्वतः भारतीय प्रशासकीय सेवेत काम करण्याची इच्छा होती. त्यांना आयएएस अधिकारी बनून देशाची सेवा करण्याची इच्छा होती. या संदर्भात त्यांनी परीक्षा पण दिली होती. पण त्यांना अपयश आले. त्यामुळे आपल्या मुलीने ही इच्छा पूर्ण करावी, हा विचार मनाशी बाळगला.मुद्रा ही उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील कर्णप्रयागची रहिवासी. शालेय जीवनात ती नेहमीच अभ्यासात टॉपर असायची.
तिला दहावी बोर्डाच्या परीक्षेत ९६ टक्के आणि बारावीमध्ये ९७ टक्के गुण मिळाले होते.तिने डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला आणि दंतचिकित्सक म्हणून चांगलं यश मिळवलं. तिने बीडीएसच्या अभ्यासातही सुवर्णपदक पटकावले आहे. मुद्राला डेंटिस्ट व्हायचे होते.ती बीडीएसमध्येही सुवर्णपदक विजेती होती. आपण वडिलांचे स्वप्न पूर्ण करू या विचाराने तिने युपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.पहिल्या फेरीत ती मुलाखत फेरीपर्यंत पोहोचली, परंतू अंतिम यादी येऊ शकली नाही. तिने पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात केली. ती २०२१ मध्ये उत्तीर्ण झाली.
ज्यामध्ये तिला आयपीएस कॅडर मिळाले. पण वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे मुद्राच्या मनात कुठेतरी अजून ती खंत होती. त्यानंतर तिने तिसऱ्यांदा परीक्षा दिली आणि शेवटी वडिलांची इच्छा पूर्ण केली. पण त्यानंतर काही दिवसातच त्यांचे निधन झाले. पण लेकीने आय.ए.एस बनून स्वप्न पूर्ण केले. मित्रांनो, जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणीही या परीक्षेत पास होऊ शकतं.